मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutes मोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का?