मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutes

मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कार्यक्षमता

मोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. पण हा मोबाईल तुमचं आर्थिक नियोजन बिघडवायला कारणीभूत ठरतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत. मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

मोबाईल आणि कार्यक्षमता-

 • मोबाईलच्या वापरामुळे अनेक कंपन्यांमधले वरिष्ठ अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही कंपन्यांमध्ये “वर्किंग अवर्स” मध्ये मोबाईल वापरायला परवानगी नाही. तर, काही कंपंन्या असा नियम लागू करण्याचा विचारात आहेत. 
 • “करिअर बिल्डर” या जॉब पोर्टल वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार एकूण १९% (५ पैकी १) एम्प्लॉयर्सच्या मते, ऑफिसमध्ये असताना मोबाईल वापरल्यामुळे ऑफिसमधल्या वेळेच्या एकूण ५ तास कर्मचारी दिवसातील पाच तासांपेक्षा कमी वेळ कामात लक्ष देतात. तर ५५% एम्प्लॉयर्सच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामावर झालेल्या परिणामाला टेक्स्ट मेसेजेस जबाबदार आहेत. 
 • ऑफिसमध्ये असताना केलेल्या सोशल मीडियाच्या वापरामुळे ऑफिसमधल्या कामावर  कळत नकळत परिणाम होत असतोस. तर, ऑफिसमधून येणाऱ्या फोन कॉल्समुळे वैयक्तिक आयुष्यही डिस्टर्ब होत असतं. 
 • या साऱ्याचा परिणाम कळत नकळत आपल्या कार्यक्षमतेवर होत असतो. 
 • अति मोबाईल वापरामुळे नैराश्य, डोळ्यांवर ताण येणं किंवा थकल्यासारखं वाटणं असे प्रकार होत असतात.  या गोष्टींचाही नकळतपणे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. 
 • रिपोर्टमधली काही महत्वाची आकडेवारी पुढीलप्रमाणे- 
  • एसएमएस / मेसेज: ५५%
  • इंटरनेट: ४१% 
  • चॅटिंग: ३९%
  • सोशल मीडिया: ३७%
  • ईमेल: २६%
 • या रिपोर्टनुसार स्मार्टफोन वापरणारे ६५% कर्मचारी वैयक्तिक स्मार्टफोनवर ऑफिसचा ईमेल आयडी वापरत नाहीत.  
 • जे लोक ऑफिसमध्ये त्यांचा स्मार्टफोन व इंटरनेट वापरतात ते कामाच्या दरम्यान कामाऐवजी इतर साईट्सवर वेळ घालवतात. 
 • यामध्ये प्रामुख्याने, पर्सनल मेसेजेस (६५%) हवामान (५१%), न्यूज (४४%) स्पोर्ट्स (२४%) आणि शॉपिंग साइट्स (२४%) यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये पॉर्न साईट्स (६%) आणि डेटिंग साईट्सचाही (३%) समावेश आहे.

मोबाईल आणि आर्थिक नियोजन:- 

 • आजकाल मोबाईल केवळ गरजेची नाही, तर फॅशनची गोष्ट झाली आहे. 
 • अनेकजण एकापेक्षा जास्त मोबाईल फोन वापरतात.
 • रु. १०००० पेक्षा कमी किमतीचे फोन वावरणं म्हणजे अनेकांना कमीपणाचे वाटतं, तर आयफोन, सॅमसंग, ओपो या कंपन्यांचे महागडे फोन वापरणं हे अनेकांच्या आयुष्यामधलं एक मोठं स्वप्न आहे. 
 • फक्त मोबाईल नाही तर, त्याचं कव्हरही स्टायलिश हवं, इअर फोन त्याला साजेसे हवेत,  त्यामुळे या गोष्टींवरही वाट्टेल तसा पैसा खर्च केला जातो. 
 • आयफोन, सॅमसंग नोट यासारखे ब्रँडेड फोन ईएमआय (EMI) वर खरेदी केले जातात. 
 • बरं मोबाईल खिशात असला म्हणजे झालं असं नाही, तर त्यामध्ये चांगली इंटरनेट सुविधा देणारा नेटपॅक रिचार्जही आवश्यक. कारण इंटरनेटशिवाय मोबाईल म्हणजे जणू आत्म्याशिवाय शरीर, अशी मानसिकता समाजात रुजली आहे. 
 • मोबाईलमुळे वाढलेलं मासिक बजेट आर्थिक नियोजनाची घडी विस्कळीत करत असतं. आर्थिक नियोजन बिघडतंय हे माहिती असूनही मोबाईलसाठी वारंवार खर्च केला जातो.  

मोबाईल नावाची नशा दारू सिगारेटपेक्षाही भयंकर रूप धारण करत चालली आहे. या गोष्टीचा विचार विचार करा. मोबाईल गरजेचा आहेच पण त्याला आपल्या गरजेपुरताच मर्यादित ठेवा. त्याची सवय बनू देऊ नका. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!