Credit Card: क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutesक्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे महिन्याचे स्टेटमेंटसुद्धा क्रेडीट कार्डच्या ऑफर्सने भरलेले असते आणि तुमचं मन तिकडे नकळतपणे ओढलं जात असतं.