कर्जरोखे (Debt Fund) योजनांचे कामकाज कसे चालते?
Reading Time: 5 minutesम्युच्युअल फंडाच्या डेट फंड किंवा कर्जरोखे संबंधित योजनांची सोप्या शब्दात व्याख्या करायची झाल्यास आपण म्हणू की व्याजाने पैसे देणे. यात म्युच्युअल फंड, कर्जदाराकडून मिळालेले व्याज किंवा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना भांडवलवृद्धीच्या स्वरूपात देतात. म्युच्युअल फंडात १२ प्रकारच्या डेट फंड किंवा कर्जरोखे प्रकारच्या योजना असतात. या सर्व १२ प्रकारची वर्गवारी त्या योजनेमध्ये असलेल्या निरनिराळ्या कर्जरोख्यांच्या एकत्रित मुदतपूर्ती कालावधीवर अवलंबून असते.