धनत्रयोदशी आणि भारतीय अर्थव्यवस्था
Reading Time: 2 minutesआज सोनियाचा दिनु…….!!!
आज धनत्रयोदशी! सर्वांच्या आवडत्या सणाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आयुर्वेदामध्ये आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. आज आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचं पूजन केले जाते. तर धर्मशास्त्रानुसार आजच्या दिवशी सुवर्ण म्हणजेच सोन्याची खरेदी करणे शुभ समजले जाते. माणसाच्या आयुष्यात आरोग्याची किमंत सुवर्णमूल्यापेक्षा जास्त आहे. आजच्या दिवसाचं महत्व लक्षात घेता, आजच्या दिवशी धर्मशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांचे सूर परस्परांशी जुळून आले आहेत . पण या सुवर्ण खरेदीचे सूर अर्थशास्त्राशी जुळतात का? हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आणि विचार करण्याजोगा आहे.