Reading Time: 2 minutes
  • परवाच वाचलेली गोष्ट. वॉरेन बफेट आणि चार्ली मुंगर ही गुंतवणूक क्षेत्रातील अद्वितीय जोडी आपल्यापैकी सर्वांनाच ठाऊक असावी. पण 45 वर्षांपुर्वी या दोघंबरोबरच आणखी एक, तिसरा भागीदारही होता, रिक गुरैन(Rick Guerin) नावाचा! हे तिघे मिळुन एकत्र गुंतवणुक करीत असत. 
  • मात्र 1974 साली आलेल्या एका मोठ्या मंदीच्या तडाख्यांत रिक यांनी आपल्याकडील बर्कशायर हॅथवेचे शेअर्स वॉरेन आणि चार्ली यांना उण्यापुऱ्या 40 डॉलर्स/शेअर भावाने विकुन टाकले. या बर्कशायर हॅथवेचा आजचा भाव आहे 3,14,477.00 USD !!!   …होय, ते स्वल्पविरामच (Commas) आहेत, दशांशस्थळे (decimals) नव्हेत.
  • या आठवणीबद्दल छेडले असता श्री वॉरेन बफेट म्हणाले..
    “…Charlie and I always knew that we would become incredibly wealthy, We were not in a hurry to get wealthy; we knew it would happen, Rick was just as smart as us, but he was in a hurry.”


    अशीच सेम टु सेम ‘स्टोरी’ Apple Computer बद्दल पण आहे.
  • आज कोणा पोराटोरालाही माहित असलेली ही कंपनी 01 एप्रिल 1976 या ‘fools Day’ च्या मुहुर्तावर जेंव्हा स्थापन झाली तेव्हा तिचे तीन प्रमुख भागीदार होते. सर्वश्री स्टीव्ह जॉब्ज, स्टीव्ह व्होझनियॅक आणि रोनाल्ड वॲने. यातील दोन्ही स्टीव्ह्ज हे संगणक तज्ञ होते आणि कंपनीत 10% भागिदारी असलेले रोनाल्ड यांनी कंपनीकरिता लोगो बनविणे, भागिदारीचा मसुदा व कायदेशीर दस्तऐवज बनविणे अशी कामे केली.
  • कंपनी स्थापन होवुन जेमतेम दोन आठवडेच होत नाहीत तो या श्रीमान रोनाल्ड यांना संगणकीय कामांचे ज्ञान नसलेने कंटाळा आला व त्यांनी कंपनीतील आपला सगळाच्या सगळा, 10% हिस्सा, 800 डॉलर्सना विकून टाकला.
  • आज ह्या 10% हिश्श्याचे मोल 100,000,000,000 डॉलर्स पेक्षा जास्त आहे

यातुन आपण काय अन्वयार्थ घ्यायचा??

  • मंदीच्या वावटळीत आपल्याकडील असलेले चांगले शेअर्स, मग ते थेट विकत घेतलेले असोत किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या आपल्याकडे असलेले, विकायचा आततायीपणा करु नये.  सिप (SIP) बंद करु नयेत. बफेट सर सुचवितात तसे ..Don’t be in a hurry…
  • मला माहिती आहे, प्रत्येकाच्या नशीबांत बफेट किंवा स्टीव्ह जॉब्ज होणे अर्थातच नाही, पण निदान रिक अथवा रोनाल्ड यांच्यासारखी ‘दैव देते…’ प्रकारची पश्चातापाची वेळ तरी यायला नको.
  • आपल्या संगीतात एक ‘तिहाई’ नावाचा प्रकार असतो, तबला वादनात तोच प्रकार थोडासा विस्तृत करुन ‘चक्करदार’ वाजवतात म्हणजे काय?? एकच स्वराकृती वा अक्षरसमुह सलग तिनदा तंतोतंत तशीच, लयबद्धपणे वाजवायची आणि शेवटचे तिसरे आवर्तन बरोब्बर समेवर संपवायचे…तिसरे अचुक सम गाठण्याचा आनंद हा केवळ स्वर्गीय असतो, अवर्णनीय असतो…
  • आता हा तत्वचिंतकाचा आव आणुन पाजलेला उपदेशाचा डोस वाटेल कदाचित, पण माझी मनापासुनची भावना सांगितल्याशिवाय रहावत नाही. गुंतवणूक ही जीवन संगीतातील एक प्रदीर्घ ‘चक्करदार’ आहे. शांत सुरवातीनंतर काही मात्रा(Beats) लक्षाच्या (Goals) मागेपुढे असतात. मधे कधीतरी वाट हरवल्यासारखे, भरकटल्यासारखे वाटुन विचलीत व्ह्यायलाही होते. पण काही आवर्तनांतर उत्तम वादक असा काही समेवर येतो.. की बस्स रे बस्स…
  • जसे प्रत्येक मात्रेनंतर समेवर यायचा अट्टाहास गायक वादकांनी धरल्यास सगळी उत्कंठाच संपून ते संगीत अगदी नीरस बेचव ठरेल, अगदी तसेच, आपणही प्रत्येक दिवशी, दर आठवड्यात, अल्पकाळांत आपल्याला मिळालेल्या परताव्याची(returns) उजळणी करत बसणे, हे निरर्थक आहे

आधी नीट गृहपाठ करुन मग लयबद्धपणे गुतंवणुकीची आवर्तने केल्यास…ऊद्दीष्ट्पुर्तीची ‘सम गाठण्याचा’ सुवर्णक्षण नक्कीच अनुभवायला मिळतो..

– प्रसाद भागवत

9850503503

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…