Reading Time: 2 minutes

हिरा ग्रूप घोटाळा

चकाकतं ते सोनं नसतं ! पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की लोकं नेहमी दिखाव्याला बळी पडतात आणि आपल्या आयुष्याची जमापूंजी घालवून बसतात. तरीही झटपट पैसे मिळविण्याचं वेड काही लोकांच्या डोक्यातून जात नाही. संचयनी, शारदा चीट फंड घोटाळा अशी अनेक प्रकरणे आजपर्यंत  झाली आहेत. आता या यादीत नव्याने भर पडली आहे ती ‘हिरा ग्रूप’ घोटाळ्याची.

 • हिरा ग्रूप घोटाळा हा खूप मोठा घोटाळा आहे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दाखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
 • हिरा ग्रूपच्या संचालिका ‘नौहिरा शेख’ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आणि हिरा ग्रूपचा  घोटाळा चर्चेमध्ये आला.
 • हिरा ग्रूपने विविध राज्यातील नागरिकांची जवळजवळ ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. एकट्या मुंबईमध्ये १ हजाराहून अधिक नागरिकांनी हिरा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत.
 • मुस्लिम धर्मामध्ये बँकेत पैसे ठेवणं आणि त्याचं व्याज घेणं याला मान्यता नाही. संधीसाधू लोक अशा धार्मिक रूढी व परंपरांचं भांडवल करून त्याचा फायदा उठवतात. नौहिरानेही या परंपरेचं भांडवल केलं.
 • हिरा ग्रूपची स्थापना २००८ मध्ये झाली. या ग्रूपच्या, हिरा फ़ुटेक्स लि., हिरा गोल्ड एक्झिम लि., हिरा टेक्सटाईल लि., हिरा रिटेल प्रा. लि., इत्यादी २० हून अधिक कंपन्या आहेत. तसेच दुबई, शारजाह, सौदी अरेबिया, घाना या देशांमध्ये कंपन्यांची ऑफिसेस असून तेथे सोनं, वस्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स आणि खाद्य आदी वस्तूंची खरेदी व विक्रीसंबधीत व्यवहार होतात असं चित्र गुंतवणूकदारांसमोर उभं करण्यात आलं.
 • हिरा ग्रूपतर्फे मुस्लिमांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘खास’ योजनेबद्दल मुस्लिम नागरिकांना अधिकृत माहिती देऊन यामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले व लोकांना व्याजाऐवजी कंपनीच्या नफ्यातील वाटा देण्याचे अमिष दाखविण्यात आले.
 • यानंतर केवळ भारतातीलच नाही तर आखाती देशातील मुस्लिम नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात लाखो रुपये गुंतवले.
 • पहिल्या वर्षी सर्व गुंतवणूकदारांना कंपनीकडून मोबदला देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात नौहिरा यशस्वी झाली आणि त्यानंतर तिने हळूहळू आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली.
 • लोकांचे पैसे घेऊन नौहिरा पसार झाली. काही दिवसांनी मुंबईमधील अनेक ऑफिसेसना टाळा लावण्यात आला. तसेच नोटाबंदीनंतर कंपनीची आर्थिक स्थिती अधिक बिकट झाल्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना आर्थिक मोबदलाही दिला नाही.
 • मागील सहा महिन्यांपासून अनेकांना पैसे येणे बंद झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी पुढे येऊन आवाज उठवला. या प्रकरणी कंपनीविरोधात पहिला गुन्हा हैद्राबादमध्ये नोंदवला गेला व त्यानंतर नौहराला अटक करण्यात आली. परंतु नौहिराची जामिनावर मुक्तता करण्यात आली. नौहिरा शेख राजकीय पक्षांशी संबधीत असल्याचीही चर्चा आहे.
 • २३ ऑक्टोबरला जे.जे.मार्ग पोलीस ठाण्यात कंपनीची संचालिका नौहिरा शेख आणि पणन अधिकारी (Marketing Officer) सलीम अन्सारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हा शाखेने देखील गुन्हा दाखल करून घेतला असून या शाखेचे पथकदेखील पोलिसांसोबत तपास करणार आहे.
 • गेल्या कित्येक वर्षात हिरा ग्रूपमधील कंपन्यांनी रिटर्न फाईल केलेले नाहीत व कंपनीचं ऑडिटही  गेल्या कित्येक वर्षात करण्यात आलेलं नाही.
 • नॅशनल अवॉर्ड विनर गुंतवणूक ऍक्टिविस्ट ‘सुचेता दलाल’ यांनीही ओपन लेटर मध्ये ‘हिरा ग्रूप एक स्कॅम आहे’, असं म्हटलं आहे.
 • तसंच नौहिरा शेखचे सासरे मोहम्मद अन्वरउल्ला यांनी ABN चॅनेलशी बोलताना, “हिरा ग्रूपमध्ये पैसे गुंतवू नका व आधी गुंतवले असल्यास शक्य तितक्या लवकर ते काढून घ्या”, असं आवाहन केलं आहे.

कपड्यांची खरेदी करतानाही अनेकजण दोन/चार दुकानं फिरून मगच कपडे खरेदी करतात.

पण आपले लाखो रुपये गुंतवताना मात्र सर्व गोष्टी तपासण्याची जराही तसदी घेत नाहीत.

परिणामतः आयुष्यभराची कमाई काही क्षणात गमावून बसतात. नक्की काय कारणे आहेत यामागे?

झटपट पैसा मिळविण्याची घाई का चंगळवादी जीवनशैलीची ओढ?

ऐषोआरामात जगण्याची इच्छा असण्यात काहीच चूक नाही.

चूक आहे ती बेसावध राहण्यात.

झटपट पैसे मिळवून देणारा कुठलाही शॉर्टकट अस्तित्वात नाही.

त्यामुळे गुंतवणूक करताना थोडीशी सावधानता बाळगा .

आपले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यातच सामंजस्य आहे.

संदर्भ: https://bit.ly/2O9eEC5

         https://bit.ly/2RjFQQz

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2RiTvH )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutes तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो.