सार्वभौम सुवर्ण बाँड १७ जानेवारीपर्यंत विक्रीस उपलब्ध

Reading Time: 3 minutes सार्वभौम सोन्याचे रोखेची (२०१९ -२०२० मालिका आठ) विक्री सध्या सुरु आहे. ही विक्री १७ जानेवारी रोजी बंद होईल. सरकार सोन्याला  प्रति ग्रॅम, रु. ४,०१६/- वर सोन्याचे बंधपत्र जारी करीत आहे. ऑनलाइन अर्ज करणारे आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम रु ५०/- ची सूट मिळते. तर अशा गुंतवणूकदारांना सोन्याच्या बाँडची किंमत  रु. ३,९६६/- प्रति ग्रॅम असेल. कराच्या बाबतीत, परिपक्वतावर भांडवली नफा करमुक्त असतो. सोन्याच्या बाँडवर हा एक विशेष फायदा आहे.