Gift deed: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

Reading Time: 5 minutesभारतीय संस्कृतीत नातेवाईक आणि मित्रांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. आपण अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना लग्न, वर्धापन दिन आणि वाढदिवशी अनेकदा भेटवस्तू देतो. छोट्या-छोट्या प्रसंगी आपण रोख रक्कम आणि मोठ्या किंवा काही प्रसंगी जमीन, घर, सोने-चांदीचे दागिने वगैरे वगैरे भेट म्हणून देतो. परंतु बहुतेक लोकांना माहित नसते की मिळालेल्या सर्व भेटवस्तू करमुक्त नसतात.