Mortgage Loan: तारण कर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार
Reading Time: 3 minutesतारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन , घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते. कर्जदार कराराने बांधला गेल्याने ठराविक मुदतीत ठरलेली रक्कम मुद्दल व त्यावरील व्याजासह समान मासिक हप्त्यात (Equated monthly installments) देण्याचे बंधन कर्जदारावर असते.