दसऱ्याला करा दहन या दहा आर्थिक सवयींचे!

Reading Time: 4 minutesआज दसरा! दसरा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि युद्ध जिंकले, त्यामुळे आज रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. खरंतर रावण हा अत्यंत हुशार, शूर आणि श्रीमंत होता. परंतु त्याचा अहंकार, अट्टाहास त्याच्यासाठी काळ बनून आला. त्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. त्यामुळे शेवटी तो विनाशाच्या मार्गाला गेला. रावणाची प्रतिमा दहन करण्यामागे, “आपल्या मनातील वाईट भावनांचे दहन करणे” हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मनात अशा अनेक भावना, इच्छा असतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. तसंच, आपल्या काही सवयी आपल्या आर्थिक स्थितीसाठीही घातक ठरू शकतात. आजच्या लेखात जाणून घ्या रावणाच्या दहा तोंडांप्रमाणे असणाऱ्या आपल्या दहा सवयी, ज्यांचं दहन करणं आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

Reading Time: 2 minutesकोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा नामंजूर होणे अवलंबून असते. हा स्कोअर खराब असल्यास आपण कर्ज घेण्यास पात्र ठरण्यासाठी तो सुधारायला साधारण ४ ते १२ महिने लागू शकतात.