Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?
Reading Time: 4 minutesआपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत.