Arthasakshar Mobile Security
Reading Time: 4 minutes

तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

आजकाल मोबाईल वापरत नाही असा माणूस शोधावाच लागेल. चॅटिंग पासून बजेटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी मोबाईलमुळे अगदी सहज शक्य झाल्या आहेत. पण तुम्ही तुमच्या मोबाईल सुरक्षा (Mobile Security) काळजी घेता का?  पूर्वी मोबाईल फोन फक्त कॉल करण्यासाठी, संदेश पाठविण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी वापरले जात होते. परंतु सध्याच्या स्मार्टफोनच्या स्मार्ट युगात मोबाईलवरून बँकेचे व्यवहारही अगदी सहज करता येतात. गुंतवणूक असो किंवा फंड ट्रान्स्फर सगळ्या गोष्टी मोबाईलच्या एका क्लिकवर सहजपणे करता येतात.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

  • ३१ जुलै १९९५ रोजी भारतामध्ये “मोबाईल” नावाच्या जादुई यंत्राचे आगमन झाले. त्यावेळचे दूरसंचार मंत्री सुखराम यांना पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री जोती बसू यांनी पहिला फोन लावला, म्हणजेच मोबाईलला भारतात येऊन आता २० वर्ष पूर्ण होतील. या २० वर्षांमध्ये मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या ७६ कोटी झाली आहे. पुढील २० वर्षात ही संख्या ९० कोटीपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. 
  • मोबाईलचा वापर फोनव्यतिरिक्त अनेक कारणांसाठी केला जातो. त्यासाठी विविध प्रकारची ॲप्स आपण डाउनलोड केली जातात. सर्वात लोकप्रिय ॲप्स म्हणजे सोशल मीडिया ॲप्स. सध्या भारतामध्ये ३.५० कोटीपेक्षा जास्त लोक सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये ९०% लोक मोबाईलवरून सोशल मीडियाचा वापर करतात. 
  • नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली. गुगल पे, भीम, फोन पे, पेटीएम यासारखी पेमेंट ॲप्स, याचबरोबर बँकांनी सुरु केलेली त्यांची स्वतंत्र ॲप्स यामुळे मोबाईल बँकिंगचा वापर सुरु झाला आणि पुढे तो लोकप्रियही झाला. आजकाल अगदी फेरी विक्रेतेही गुगल पे, पेटीएम यासारख्या ॲपने व्यवहार करतात. 
  • सोशल नेटवर्किंग साईटवर आपले व आपल्या कुटुंबियांचे फोटोज किंवा व्हिडीओज, चेक इन – चेक आउट्स, लोकेशन, प्रवासाचा तपशील, इत्यादी. अशा अनेक गोष्टींबद्दल कळत नकळत सर्व माहिती आपण पोस्ट करत असतो. आपलं अकाउंट हॅक झालं, तर काय होईल? अशी शंकाही अनेकांच्या मनात येत असेल, पण त्याचा गांभीर्याने विचार न करता आपलं वैयक्तिक आयुष्य आपण सर्वांसमोर उघडं  करत असतो. 
  • रोख रक्कम जवळ बाळगताना चोरांची भीती असते, तशीच भीती ऑनलाईन व्यवहारांमध्येही असते. वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांमुळे आपल्या बँक अकाऊंटचा बॅलन्स कधीही शून्यावर येऊ शकतो, ही चिंता अनेकांना सतावत असते. पण त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते का? 
  • आपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले  वैयक्तीक फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात भीती निर्माण करत असतात. 
  • ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. 

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

मोबाईल सुरक्षा (Mobile security) – 

१. सायबर सिक्युरिटी ॲप्स आणि हॅकर्स- 

  • सायबर सिक्युरिटी ॲप्स आणि हॅकर्स यांची लढाई टॉम अँड जेरीसारखी सतत चालू असते. हॅकर्सविरूद्ध जिंकणे, हँकिंगला आळा घालणे ही काही एका रात्रीत करता येण्यासारखी गोष्ट नाही. 
  • जितकी नवीन सिक्युरिटी सॉफ्टवेअर तितकेच नवनवीन क्लुप्त्या शोधून त्यावर मात करणारे हॅकर्स, पुन्हा त्यांचा सामना करणारे सायबर एक्सपर्ट्स ही लढाई अविरत चालूच राहते. 
  • मोबाईल हॅक झाल्यावर तुमच्या मोबाईल मधल्या कॉन्टॅक्टस लिस्टपासून ओटीपी पर्यंतचा सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस हॅकरला मिळतो. थोडक्यात तुमचा मोबाईल हॅकरच्या ताब्यात जातो. 

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

२. संशयास्पद लिंक्स 

  • व्हॉट्स अपवर अथवा एसएमएस मधून येणाऱ्या विविध लिंक्स, टिकटॉक किंवा तत्सम ॲप्सच्या माध्यमातून होणारे सायबर अटॅक्स, अशा अनेकप्रकारे आपला मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. 
  • अनेकजण मोबाईलवरून आपले वैयक्तिक तसेच ऑफिसचे इमेल्सही तपासतात. आपल्या इमेल्समध्ये मोठ्या कंपनीमधून अप्लाय केल्याशिवाय येणारी नोकरीची ऑफर, लॉटरी इमेल्स, गिफ्ट व्हाउचर, व्हिडीओ, इत्यादीच्या  लिंक्स, अशा अनेकप्रकारच्या लिंक्स असतात ज्यांना क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. 
  • व्हॉट्स अप किंवा सोशल मीडिया अनइन्स्टॉल करणे किंवा पुन्हा कधीही व्हिडिओ लिंकवर क्लिक न करणे, हे या समस्येचे उत्तर नक्कीच नाही. आपल्याला संशयास्पद लिक्स ओळखता आल्या पाहिजेत. यासंदर्भात माहिती करून घेणे आवश्यक आहे. इंटरनेट सर्च केल्यास असे कितीतरी माहितीपूर्ण ब्लॉग्ज वाचायला मिळतील. 

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

आपल्या मोबाईलला हँकिंगपासून कसे वाचवाल? 

  • आपला मोबाईल म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्याचा आरसा असतो. त्यामुळे त्याची सुरक्षा ही गोष्ट खूप महत्वाची परंतु दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट आहे. 
  • काही गोष्टी मूलभूत पण अत्यंत महत्वाच्या असतात. पण त्या आपण करतो का, हा मुख्य प्रश्न आहे. गोष्टी अगदी साध्या असतात. उदा. –
    • आपला फोन व त्यावरील ॲप्स आपण नियमित अपडेट करतो का?  
    • अनेक प्रकारच्या ॲप्सनी आपल्या मोबाइलमधली मेमरी पूर्ण भरलेली असते. पण त्याचवेळी एखादे विश्वसनीय “सिक्युरिटी ॲप” आपण डाउनलोड केलेले आहे का? असतील तर,  ती अपडेट केली आहेत का? 
  • गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल प्ले स्टोअरमध्ये अशी काही विश्वसनीय ॲप्स आहेत जी मालवेअर आणि फिशिंग अटॅक पासून आपल्या मोबाईलचे रक्षण करतात. 
  • यामध्ये  “फ्री व पेड” असे दोन्ही प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. पेड व्हर्जन उत्तम असते आणि फ्री व्हर्जन चांगले नसते, असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. 
  • प्रत्येक ॲपमध्ये फ्री व्हर्जनमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुरक्षा मिळतात याबद्दल माहिती दिलेली असते. तसेच प्रत्येक सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काबद्दलही सविस्तर माहिती असते. आवश्यकता नसेल, तर फ्री व्हर्जनही तुम्ही वापरू शकता. 
  • काहीवेळा एखादा व्हायरस “सिक्युरिटी ॲप” असल्याचं भासवून तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊ शकतो. त्यामुळे कोणतेही ॲप गुगल प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करा. 
  • अनोळखी इमेल आयडी वरून येणाऱ्या कोणत्याही लिंक क्लिक करू नका किंवा कोणतीही फाईल डाउनलोड करू नका. 
  • इमेल महत्वाचे वाटत असल्यास त्यामधील लिंकवर क्लिक करण्याऐवजी ती टाईप करून संबंधित वेबपेज ओपन करा. 
  • वेबसाईट ओपन करताना लिंकच्या शेवटी .in, .Com, .edu, .org, इ. असल्याची खात्री करा.
  • इमेल्समध्ये मोठ्या कंपनीमधून अप्लाय केल्याशिवाय येणारी नोकरीची ऑफर, लॉटरी इमेल्स, गिफ्ट व्हाउचर, व्हिडीओ, पैसे जमा झाल्याचा अथवा जमा होण्यासाठी पाठवलेली लिंक इत्यादी लिंक्सवर शक्यतो क्लिक करू नका. 
  • बँकेचे पासवर्ड कधीही मोबाईलवर स्टोअर करून ठेवू नका. 

आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?

मोबाईल हॅक झाल्याचे कसे समजेल? 

  • आपल्या सर्व प्रयत्नांनंतरही हॅकर्स आपल्या डिव्हाइसवर कब्जा करू शकतात. 
  • जर आपल्या मोबाइलवर सुरक्षा ॲप नसेल तर, हे समजणे जवळजवळ अशक्य आहे. परंतु कधीकधी मोबाईल फोन जास्त न वापरता फोनची बॅटरी लवकर संपणे हा देखील हॅकिंगचा संकेत असू शकतो. मोबाइल क्रिप्टो मायनिंगसाठी वापरला जात असल्यास असा अनुभव येतो. क्रिप्टो मायनिंग म्हणजे क्रिप्टोकरन्सीमध्ये वापरले जाणारे एक मालवेअर आहे.
  • मोबाईल हॅक झाल्याची काही लक्षणे –
    • मोबाईल सतत हँग होणे, 
    • काही ॲप्स अचानक क्रॅश होणे, 
    • मोबाईल ऑटो रिस्टार्ट  होणे, 
    • एखादं ॲप बंद करूनही पुन्हा चालू होणे किंवा बंद करता न येणे, 
    • इंटरनेट डेटाचा जास्त वापर होणे, 
    • आऊटगोईंग कॉल लॉगमध्ये आपण डायल न केलेला नंबर दिसणे किंवा एखादा न केलेला मेसेज आउटबॉक्समध्ये दिसणे.
    • ही काही मोबाईल हॅक झाल्याची लक्षणे असू शकतात. परंतु हे सर्व मोबाईलमधील तांत्रिक अडचणींमुळेही होऊ शकते. त्यामुळे या मागे हँकिंग हेच कारण आहे असे समजून घाबरून जाऊ नका किंवा  काहीतरी तांत्रिक अडचण असेल, या भ्रमातही राहू नका. 

आपल्या मोबाईलची सुरक्षा आपल्याच हातात असते. तुमच्या मोबाईमध्ये तुमच्या खाजगी फोटोंसोबत, काही महत्वाची माहिती, अनेक फोन नंबर्स जतन केलेले असतात. याशिवाय तुम्ही आर्थिक व्यवहारही करत असता. त्यामुळे आपला मोबाईल सुरक्षित आहे का? या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करा आणि आपल्या मोबाईलला हॅकिंगपासून वाचवा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Mobile Security in Marathi, What is mobile security marathi mahiti, Mobile safety and security in marathi, mobile safe kasa thevaycha marathi info

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.