Reading Time: 4 minutes

आपण हस्तांतरित (ट्रान्सफर) केलेली रक्कम लाभार्थी व्यक्तीपर्यंत पोहोचली की नाही, हे पाहण्यासाठी पूर्वी आपल्याला खूप दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. पण बँकिंग क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाशी ओळख झाल्यामुळे आणि डिजिटल प्रगतीमुळे पैसे ट्रान्सफर करण्याचे कार्य सोपे झाले आहे.

इलेक्ट्रॉनिक किंवा ई-ट्रान्स्फर फंड म्हणजे एका बँकेच्या खात्यातून त्या किंवा दुसऱ्या बँकेच्या खात्यात संगणकाच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित (ट्रान्सफर) करणे; म्हणजे थेट बँकेत न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले व्यवहार करता येतात. ऑनलाईन पैसे हस्तांतरण करण्याचे व्यवहार समान बँक खाते किंवा वेगळ्या बँक खात्यामध्येही करता येतात.

ऑनलाईन बँक ट्रान्स्फर:-

आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट), एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) आणि आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) म्हणजे तात्पुरती भरणा सेवा या तीन महत्वाच्या सेवा बँकांद्वारे पुरवल्या जातात. या तीन सेवांबद्दल व त्यांच्या वापराबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे पैसे हस्तांतरित करताना अनेक अडचणी येतात. एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची प्रमाणित वेळ असते. पण आयएमपीएसने पैसे हस्तांतरित करायचे असतील, तर त्याला वेळेची मर्यादा नसते.

आरटीजीएस ट्रान्सफर (RTGS Transfer):

 • आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ही रिझर्व बँक ऑफ इंडियाद्वारे व्यवस्थापित केलेली इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम आहे. याद्वारे रिअल टाइम आधारावर ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर करता येते.
 • आरटीजीएसमध्ये, निधी हस्तांतरण रिअल टाइम आधारावर होते.तसेच ही भारतात सर्वात वेगवान इंटरबँक मनी ट्रान्सफर सुविधा आहे.
 • आरटीजीएस मनी ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांना ज्या बँकअकाउंटला पैसे ट्रान्स्फर करायचे आहेत, त्या बँकेचा आयएफएससी कोड, खाते क्रमांक, बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव इत्यादी माहितीअसणे आवश्यक आहे.
 • याद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा केवळ देशांतर्गत बँक व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. आरटीजीएसने पैसे हस्तांतरित केल्यानंतर प्राप्तीकर्त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज केवळ ३०मिनिटांमध्ये येतो.
 • आरटीजीएसद्वारे एका वेळी निधी हस्तांतरण मर्यादा किमान २ लाख रुपये आहे.
 • आरटीजीएस हस्तांतरित करण्याची प्रमाणित  वेळ:
  • आरटीजीएस नेट बँकिंगद्वारे  निधी हस्तांतरण करण्याची आरटीजीएस व्यवहार वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:०० ते  संध्याकाळी ४:३० पर्यंत आणि  शनिवारी सकाळी ९:०० ते २:०० पर्यंत आहे (बँक हॉलिडे सोडून).
  • जर कोणत्याही कारणामुळे ट्रान्सफर केलेले पैसे बेनिफिशिअरीच्या खात्यात जमा झाले नाहीत तर निधी मूळ बँकेकडे साधारणतः  एका तासाच्या आत किंवा संबंधित दिवसभरातील कामकाज संपण्यापूर्वी परत येईल.
 • आरटीजीएस शुल्क :
बँक रक्कम मर्यादा

२ लाख ते ५ लाख रु.

रक्कम मर्यादा

५ लाखांपेक्षा जास्त

एसबीआय  शाखा २५ रु. ५० रु.
एसबीआय – मोबाईल बँकिंग  २०रु. ४०रु.
एचडीएफसी २५ रु. ५० रु.
आयसीआयसीआय बँक २५ रु. ५० रु.
बँक ऑफ बरोडा २८ रु. – ३३ रु. ५५ रु. – ६१ रु.
पंजाब नॅशनल २५ रु.- ३० रु. ५०रु.- ५५ रु.
कोटक बँक २५ रु. ५० रु.
कॅनरा बँक २७ रु. – ३० रु. ५२ रु. – ५५ रु.
एचएसबीसी बँक २५ रु. ५० रु.

 

एनईएफटी हस्तांतरण  (NEFT Transfer):

 • एनईएफटी मुळे देशभरात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणे सुलभ व लवकर होते. एनईएफटी मध्ये देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात.
 • एनईएफटी सुविधा ६३,००० बँकांद्वारे संपूर्ण देशभर तसेच नेपाळला देखील पुरवली जाते. 
 • निधी ऑनलाईन हस्तांतरित करण्याची परवानगी देते.   क्रेडिट कार्डवरील रकमेच्या पेमेंटसाठी देखील याचा वापर केला जातो.
 • एनईएफटीची निधी हस्तांतरित करण्याची वेळ ही आरटीजीएस प्रमाणे ठराविक वेळेत नसते. पण ही मुदत तासाच्या आधारावर प्रमाणित केली जाते. एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम  दोन तासांच्या आत लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते.
 • एनईएफटी व्यवहाराची वेळ:
  • बँक हॉलिडे सोडून सोमवार ते शुक्रवार सकाळी ८:०० ते  संध्याकाळी ६:३० पर्यंत आहे आणि शनिवारी सकाळी ८:०० ते  दुपारी १:०० वाजेपर्यंत असते.
 • एनईएफटी व्यवहार:
  • रोख रक्कम हस्तांतरित करताना कमाल मर्यादा  ५०,००० रु. प्रति व्यवहार आहे. तसेच ग्राहकांना वैयक्तिक सर्व  माहिती पुरवणे आवश्यक आहे.
  • एका खात्यातून लाभार्थी (beneficiary) खात्यात पैसे पाठविण्यापासून ते निधी हस्तांतरित करण्यासाठी, तपशीलांसह फॉर्म (खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, आयएफएससी कोड, हस्तांतरित रक्कम आणि खाते प्रकार) इत्यादी माहिती भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म बँकेत एनईएफटी शाखांवर उपलब्ध आहे आणि इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवांचा वापर करून ऑनलाइन देखील मिळू शकेल.
 • एनईएफटी शुल्क :
बँक रक्कम मर्यादा

१०,००० पेक्षा कमी

रक्कम मर्यादा

१०,०००० ते १ लाख

रक्कम मर्यादा

१ लाख ते २ लाख

रक्कम मर्यादा

२ लाखांपेक्षा जास्त

एसबीआय  शाखा २.५ रु. ५ रु.   १५ रु. २५ रु.
एसबीआय- मोबाईल बँकिंग रु.   रु.    ३ रु.   ५ रु.  
एचडीएफसी २.५ रु. ५ रु. १५ रु. २५ रु.
आयसीआयसीआय २.५ रु. ५ रु. १५ रु. २५ रु.
बँक ऑफ बरोडा २.५ रु. ५ रु. १५ रु. २५ रु.
पंजाब नॅशनल २.५ रु. ५ रु. १५ रु. २५ रु.
कोटक बँक २.५ रु. ५ रु. १५ रु. २५ रु.
कॅनरा बँक २.५ रु. ५ रु. १५ रु. २५ रु.

 

आयएमपीएस हस्तांतरण (IMPS Transfer) :

 • आयएमपीएस म्हणजे त्वरित  भरणा सेवा २२ नोव्हेंबर २०१० रोजी मोबाईल फोनद्वारे त्वरित आंतर-बँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुविधा सर्वत्र  लॉन्च करण्यात आली. आयएमपीएस मोबाईल बँकिंग द्वारे त्वरित आणि सुरक्षितपणे निधी हस्तांतरित करता येतो.
 • आयएमपीएस हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे नियंत्रित केले जाते. त्वरित भरणा सेवेद्वारे निधी हस्तांतरण केले जाते व लाभार्थीचे खाते ताबडतोब क्रेडिट केले जाते.
 • आयएमपीएस निधी हस्तांतरण सुरक्षित आहे. सुरक्षित व्यवहार करण्यासाठी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि एमएमआयडी (MMID) या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.
 • एमएमआयडी म्हणजे मोबाइल मनी आइडेंटिफायर. हा एक सात अंकी अद्वितीय नंबर आहे जो आपण आपल्या बँक शाखेत मोबाइल बँकिंगसाठी नोंदणी करता तेव्हा तो आपल्याला मिळतो. मोबाइल बँकिंग किंवा आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरसह एमएमआयडी असणे आवश्यक आहे.
 • ग्राहकांच्या खात्यातील रक्कम क्रेडिट किंवा डेबिट झाल्यावर त्यासंदर्भातील माहिती रजिस्टर मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे  ग्राहकांना देण्यात येते.
 • आयएमपीएस  हस्तांतरित करण्याची  वेळ:
  • आयएमपीएस ही सेवा मोबाईल बँकिंगद्वारे २४*७ दिवस वापरता येते. बँकेची सुट्टी असली तरीही ही सेवा चोवीस तास उपलब्ध असते. त्यामुळे आपण आयएमपीएसद्वारे कधीही पैसे हस्तांतरित (ट्रान्सफर) करू शकतो.
  • आयएमपीएस च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर किमान  मर्यादा नाही,परंतु प्रतिदिन व्यवहारांवर कमाल मर्यादा मात्र आहे.
बँक

 प्रति दिवस कमाल रक्कम मर्यादा

एसबीआय  शाखा          २,००,०००
एचडीएफसी          २,००,०००
आयसीआयसीआय           ,००,०००
बँक ऑफ बरोडा             ५०,०००
पंजाब नॅशनल             ५०,०००
कोटक बँक

            ५०,०००

कॅनरा बँक             ५०,०००
 • आयएमपीएस शुल्क (चार्जेस) :  
  • आयएमपीएस ने हस्तांतरित करायची रक्कम जर  रु.२ लाख ते रु.५ लाख असेल तर आयएमपीएस शुल्क ५ रु.आहे. रक्कम जर ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर शुल्क १५ रु.आहे.

अशाप्रकारे ऑनलाईन बँकिंगद्वारे निधी हस्तांतरण सोपे झाले आहे. तसेच योग्य ती काळजी घेतल्यास ते सुरक्षितही आहे.

 बँक खाते आणि रोख रक्कम मर्यादा,

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमध्ये काय फरक आहे ?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.