Pareto principle: तुम्हाला पॅरेटो सिद्धांताबद्दल माहिती आहे का?
Reading Time: 2 minutesआल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०% जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.