Reading Time: 2 minutes

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) ह्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील आघाडीच्या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकतीच समभागांच्या पुनर्खरेदीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रस्तावानुसार एकंदर रू. १६००० कोटीस कंपनी आपले ७.६१ कोटी समभाग रू, २,१०० प्रति समभाग या दराने खरेदी करणार आहे. पुनर्खरेदीचे वृत्त शेअरबाजारामध्ये धडकताच समभागाचा भाव वधारून, त्याने १,८५०० ची पातळी गाठली.

शेअरबाजारामध्ये समभाग विकणे आणि कंपनीला पुनर्खरेदीमध्ये ते परत करणे यामध्ये कर-आकारणी विविध पद्धतीने होते. यामध्ये, आयकराच्या तरतुदीत चालू आर्थिक वर्षापासून बदलझाला आहे. त्यामुळेच समभागधारकांना प्रश्न पडला आहे की, समभाग कंपनीला परत द्यायचे की ते शेअरबाजारामध्ये विकायचे.

समभाग कंपनीला परत करून किंमत घेतल्यास किंवा शएअरबाजारामध्ये विकल्यास होणाऱ्या नफ्यावर आयकर भरावा लागेल.

कंपनीला समभाग परत करण्याचा मार्ग स्विकारल्यास-

  1. मिळणाऱ्या किमतीतून महागाईच्या निर्देशांकानुसार खरेदीची किंमत वाढवून आलेल्या नफ्यावर २० टक्के दराने आयकर , किंवा
  2. मिळणाऱ्या किमतीतून खरेदीची किंमत वजा करता इरणाऱ्या नफ्यावर १० टक्के दराने आयकर

ह्या दोन्हीपैकी कमी रक्कम आयकर म्हणून भरावी लागेल.

समभाग शेअरबाजारामध्ये विकल्यास विक्रीच्या किंमतीमधून समङागासाठी ठरलेली खरेदीची रक्कम वजा करता उर्वरीत नफ्यावर १० टक्के दराने आयकर पडेल. यात देखील पहिल्या १ लाखांवरचा नफा करपात्र ठरत नाही. अर्थात ही वार्षिक सवलत आगे. समभागांच्या ठरवलेली रक्कम खालीलप्रमाणे छरवावी- पुढीलपैकी अधिक रक्कम

  1. समभागाची खरेदीची रक्कम किंवा
  2. अ- समभागाचा ३१ जानेवारी २०१८चा सर्वोच्च बाजारभाव, आणि
    ब- समभाग विक्रीची किंमत या दोनैकी कमी असलेली रक्कम

हेच नियम उदाहरणाने अधिक स्पष्ट होतील.
उदा-
श्री दलाल यांनी ५ वर्षांपूर्वी रू. ५०० प्रमाणे समभाग खरेदी केले. त्याचा आजचा बाजारभाव रू. १,९०० इतका आहे. कंपनी रू. २,२०० दराने पुनर्खरेदी करणार आहे आणि ३१ जानेवारी २०१८ ला समभागाचा सर्वोच्च बाजारङाल रू. १,५५० इतका होता.

समभाग कंपनीला परत केल्यास महागाई निर्देशांकाची किंमत वजा जाता वफा रू.१,२०० व आयकर रू. २४० होतो. तक याच रकमा खरेदी किमतीनुसार नुक्रमे रू. १,७०० व रू. १७० होतात. म्हणजेच, विक्रीच्या किंमतीमधून रू. १७० चा आयकर वजा जाता श्री. दलाल यांना रू. २,०३० खिशात मिळतात.

समभाग शेअरबाजारात विकल्यास वजावटीसाठी

  1. खरेदी रक्कम रू. ५००,
  2. अ- विक्री रक्कम रू.१,९००
    ब- ३१ जानेवारी २०१८चा बाजारभाव रू. १,५५० नुसार रू. १,५५० होवून नफा रू. ३५० होईल.

एकंदर वार्षिक नफा रू. १ लाखावर कर लागणार नाही. आणि हा लाभ विचारात घेतला नाही, तर १० टक्के इतका आयकर लागून श्री. दलाल च्या खिश्यात रू, १,८६५ येतील.

प्रत्येक गुंकवणूकदाराची खरेदीची किंमत व समभाग बाळगण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे सर्व व्यक्तींना एकच निर्णय लागू होणार नाही. वरील  नियमांनुसार गणित मांडल्यास मात्र टीसीएसच्या समभागांचा तिढा सुटेल.

अर्थात, समभाग खरेदीनंतर एक वर्ष पूर्म झालेले नसल्यास, दोन्ही प्रकारांमध्ये समान म्हणजेच नफ्याच्या १५ टक्के दराने कर आकारणी होत असल्याने कंपनीला समभाग करणेच अधिक फायदेशीर ठरेल यात शंका नाही.

(चित्रसौजन्य- https://bit.ly/2lRTGfu )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…