आरोग्य विम्याची गरज

Reading Time: 2 minutes

आरोग्य विम्याची गरज

अर्थसाक्षर.कॉम तर्फे बजाज अलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीच्या हेल्थ डमिनिस्ट्रेशन टीम चे प्रमुख, श्री भास्कर नेरूरकर यांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीचा आरोग्य विम्याची  गरज  या विषयासंदर्भातील हा संपादित अंश. संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

१. आरोग्य विम्याची खरोखरच गरज आहे का?

  • आपल्या कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण करण्यासाठी आरोग्य विमा अत्यंत आवश्यक आहे. दहा ते बारा हजारांच्या प्रिमिअम मध्ये आपण आपल्या कुटुंबासाठी ५ लाखापर्यंतचे संरक्षण निर्माण करू शकतो. 
  • तरुणांना वाटते की मला कशाला आरोग्य विमा पाहिजे? मी कुठे आजारी पडणार आहे? एकदम फिट आणि स्ट्रॉंग आहे ,मी आणि मला काही होणार नाही. परंतु काही इन्फेक्शन्स, डेंग्यू, मलेरिया हे आजार कोणालाही होऊ शकतात. 
  • सध्याचा कोव्हीड-19 हा आजार तर कोणत्याही वयोगटातील माणसाला होऊ शकतो आणि तेव्हा हॉस्पिटलायझेशनची गरज भासते. त्यावेळेस आरोग्य विमा तुम्हाला उपयोगी पडू शकतो. 
  • तरुणाईला सर्वात मोठा धोका असतो, तो अपघाताचा. एखाद्या मोठ्या शहरात रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना तुमची काही चूक नसेल तरी अपघात होऊ शकतो. 
  • अपघात झाल्यानंतर जे काही हॉस्पिटलायझेशन आहे, त्याचा खर्च जवळजवळ कुठल्याही आजाराइतकाच किंबहुना कधी कधी तो जास्तच असतो आणि त्यासाठी आरोग्य विमा हा सगळ्या वयोगटातील, समाजातील सर्व स्तरातील लोकांना गरजेचा आहे.

२. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढतात, तर या परिस्थितीमध्ये वैयक्तिक आरोग्य विमा काढायची गरज आहे का? (Corporate Health Insurance vs Personal Health Insurance)

  • कुटुंबातील व्यक्ती चांगल्या कंपनीत नोकरीला लागला की कंपनीकडून त्या व्यक्तीची आरोग्य विमा पॉलिसी काढली जाते.  
  • कंपन्या दोन लाख-तीन लाख रकमेपर्यंतची एक बेसिक विमा पॉलिसी काढतात. कंपन्या फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विचार करतात. 
  • काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करतात. म्हणजे कर्मचारी, त्याची पत्नी, त्याची मुलं. परंतु त्याच्या आई-वडिलांना पण विम्याच्या संरक्षणाची गरज असते आणि त्यासाठी कंपनीने दिलेला विमा पुरेसा नसतो. यासाठी वैयक्तिक विमा हा अतिशय आवश्यक आहे 
  • जनरली आपण सगळं चांगल्या गोष्टी आपण वेस्ट मध्ये बघतो, तर वेस्ट इकॉनॉमी मध्ये एक बेसिक रुल असतो की कुणीही नोकरीला लागला की सेव्हिंग ही त्यांची शेवटची गरज धरली जाते, विमा ही पहिली गरज ही मानली जाते. 
  • तुम्ही जर का मोठमोठ्या अमेरिका किंवा UK यासारख्या इकॉनॉमी मध्ये पाहिलंत, तर,  प्रत्येकाला विमा काढणं हे गरजेचं असतं, जरुरी असतं आणि ती त्यांची पहिली गरज असते. त्यातून वाचलेल्या पैशातून लोक सेव्हिंग कडे पाहतात. तेव्हा विमा ही एक काळाची अतिशय मूलभूत गरज आहे.  

आरोग्य विम्यासंदर्भात अजून माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पहा: आरोग्य विमा समज-गैरसमज

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.