Reading Time: 3 minutes

योग्य प्लॅनिंन केल्यास अर्धे काम तिथेच यशस्वी होतं म्हणतात. आपण सहलींचं, सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग, बजेट तयार  करतो. अतिमहत्वाचं जे फॅमिली प्लॅनिंग ते सुद्धा करतो. पण एक अत्यंत महत्वाच्या अश्या गोष्टीचं प्लॅनिंग किंवा बजेट तयार करताना बरेचदा कंटाळा करतो ते घरघुती मासिक बजेटचं.

  • फेब्रुवारी महिना सुरू झाला की देशभरात, सामाजिक माध्यमांवर बजेटचे वारे वाहू लागतात. जो तो देशाच्या बजेटवर बोलू लागतो. त्यात काय चूक, काय योग्य सांगणं सुरू होतं. न्यूज चॅनल्स, वर्तमानपत्रे आपापल्याला राजकीय कलानुसार अर्थसंकल्पाचं कौतुक, टीका करतात.
  • देशाचे अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प कधी  सादर करणार, याकडे साऱ्या व्यक्तींचं लक्ष असतं. देशाच्या कोटींमधील अर्थसंकल्पावर भरपूर चर्चा केली जाते. पण घरच्या अर्थसंकल्पावरची चर्चा, जी खरं तर जास्त महत्वाची असते  ती चर्चा किंवा घराचा अर्थसंकल्प तयार करत नाही. शेवटी कोटीच्या कोटी घरांमुळेच देश बनतो. “शहर बचाते बचाते मोहल्ला जला दिया” अशी अवस्था होते.यामुळे घरघुती अर्थसंकल्प तयार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
  • आजच्या काळात ती परिस्थिती राहिली नाही की घराचा अर्थमंत्री पुरुषच आणि गृहमंत्री स्त्रीच असते. आज दोघेही सक्षम आहेत आर्थिकदृष्ट्या, बौध्दिकदृष्ट्या. यामुळे दोघेही घराचे गृहमंत्री आणि दोघेही अर्थमंत्री होत. अश्यावेळी प्रत्येकाने अर्थसाक्षर होणं, घरघुती मासिक अर्थसंकल्प तयार करणं गरजेचं ठरतं.

घरघुती अर्थसंकल्प का महत्वाचा?

  • महिन्याच्या शेवटी बहुतेक लोक आर्थिक विवंचनेत असतात. मग ते कुटुंबासहित राहणारे असो वा एकटे.  ही अवस्था होते कारण आपल्या जमा खर्चाचा हिशोब करण्याची, स्वतः अर्थमंत्री होऊन स्वतःचा अर्थसंकल्प सादर करणं महत्वाचं वाटत नाही वा ते टाळलं जातं वा त्याचा कंटाळा केला जातो. जे लोक वास्तवाला तोंड देण्यापासून पळ काढतात ते स्वतःच्या उत्पन्नानुसार बजेट तयार करायचं टाळतात.
  • जे घर स्वतःचं बजेट तयार करतं ते घर जास्त समाधानी आणि आनंदी आयुष्य जगू शकतं. अकस्मात येणारी आर्थिक संकटं ते जास्त योग्यप्रकारे हाताळू शकतं.
  • बरेचदा आर्थिक उत्पन्न वाढलं तरीही व्यक्तीकडे महिन्याच्या शेवटी पैसे नसतात. कारण उत्पन्न वाढल्यावर त्याचा खर्चही भरमसाठ वाढतो. यामुळे वैयक्तिक अर्थसंकल्प महत्वाचा.
  • घरघुती अर्थसंकल्प तयार केल्यास त्यात स्वतःचं उत्पन्न आणि खर्च याचं विवरण करता येईल. यामुळे आपला खर्च कुठे जास्त  होतोय? कुठे बचत करता येईल? याचा योग्य अंदाज येईल.
  • अविवाहित स्त्री पुरुषांनी, विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वतःचं वैयक्तिक बजेट तयार करण्यावर भर द्यावा. त्याने सुरवातीपासून खर्चावर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती तयार होते. जी पूढे आयुष्यात कामात येते. संपूर्ण कुटुंबियांशी चर्चा करून त्यांचे मूख्य गरजा लक्षात घेऊन जमा खर्च मांडावा याला घरघुती अर्थसंकल्प म्हणतात.

घरघुती अर्थसंकल्प कधी करावा?

  • रोजचा अर्थसंकल्प, आठवड्याचं बजेट, मासिक, त्रैमासिक, अर्ध्या वर्षाचं, संपूर्ण वर्षाचं बजेट तयार करता येतं. पण सामान्यतः देशात ऐंशी टक्के जनता नोकरी करते, मासिक उत्पन्न प्राप्त होतं, त्यामुळे मासिक अर्थसंकल्प करणंच श्रेयस्कर ठरतं.
  • येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की आगामी बजेट नेहमी बजेट कालावधी सुरू होण्यापूर्वीच तयार करावे. म्हणजे समजा पुढील महिन्याचं बजेट तयार करायचं आहे तर तो महिना सुरू होण्यापूर्वीच त्या महिन्याचं बजेट तयार करावं. उदाहरणार्थ मार्च महिन्याचं बजेट तयार करायचं असले तर ते बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तयार करावं.
  • अगदी देशाचाही अर्थसंकल्प असाच वर्षभरापूर्वी तयार होत असतो. मग वर्षभर तो अर्थसंकल्प कटाक्षाने पाळला जातो. आपणही मासिक बजेट पूर्वीच तयार करून तो वैयक्तिक, घरघुती अर्थसंकल्प  कटाक्षाने पाळावाच. घरातील इतर सदस्यांनाही अर्थसंकल्पाची संपूर्ण माहिती द्यावी. हा आपल्या घराचा अर्थसंकल्प आहे हे समजून सांगावं. घरातील मुलांनादेखील यात सामावून घ्यावे, त्यांनाही कल्पना द्यावी. यामुळे त्यांच्यावर योग्य संस्कार होऊन सुसंवाद वाढतो. त्यांना लहान वयात काटकसरीची, पैशाचं महत्व कळतं. उठसुठ खर्च ते करणार नाही. घरी पैसे मागणार नाही.
  • काही गोष्टींची सवय अंगी बाणावी लागते, ज्याचा फायदा पुढे आयुष्यात होतो. त्यातील ही प्रमुख गोष्ट गृहखर्चाचं बजेट तयार करणं. यामध्ये वेळेची गुंतवणूक केल्यास आणि ती पाळल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव नक्की दिसतो.

पुढील भागात वैयक्तिक आणि घरघुती सोपा अर्थसंकल्प (बजेट) कसा तयार करायचा याविषयीची माहिती घेऊ.

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,    नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग,

बचत आणि आर्थिक शिस्तीचे ७ सोपे मार्ग,    बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग,

पगारच पुरत नाही…बचत कशी करू?,  २०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

(Disclaimer:   https://arthasakshar.com/disclaimer/  

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.