FD Investment मुदत ठेव
https://bit.ly/2QAdIdz
Reading Time: 3 minutes

FD Investment: मुदत ठेव गुंतवणूक 

पारंपरिक दृष्टीने बऱ्याच काळापासून मुदत ठेव गुंतवणूक (FD Investment) हा गुंतवणुकीचा सहज, सोपा पर्याय समजला जातो. आजमितीला साधारणतः १०० लाख कोटी रुपये लोकांनी मुदत ठेव मध्ये गुंतवलेले आहेत. असे असले तरीही आज गुंतवणुकीचे अनेकविध मार्ग उपलब्ध असताना मुदत ठेवीचा पर्याय निवडताना काही गोष्टींचा विचार नक्कीच केला जायला हवा. आज आपण याचीच सविस्तर माहिती घेणार आहोत.

हे नक्की वाचा: ठेवी व कर्ज : कोणते व्याजदर कमी हवेत?

FD Investment: मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी विचारात घ्या

१. भांडवलाची सुरक्षितता: 

  • मुदत ठेवीचा पर्याय निवडण्याची दोन महत्वाची कारणे म्हणजे भांडवलाची सुरक्षितता आणि खात्रीशीर उत्पन्न हे आहेत. पण काही कारणाने बँक बुडीत निघाली तर? याबाबतीत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या नुकसान सोसायला लागू नये म्हणून काही सुविधा ठराविक बँकांना दिल्या आहेत. 
  • ज्या बँकांची श्येड्यूल्ड बँक म्हणून नोंद झाली आहे अशा बँकांना रिझर्व्ह बँकेची उपकंपनी DICGC च्या डिपॉझिट विमा कार्यक्रमाअंतर्गत विशेष संरक्षण दिले जाते. 
  • या कार्यक्रमानुसार प्रत्येक शेड्युल्ड बँकेच्या प्रत्येक ठेवीदारांच्या म्हणजे फिक्स, रिकरिंग, चालू आणि बचत या सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये बँक अपयशी ठरली, तर ५ लाखांपर्यंतच्या रकमेवर हा विमा उतारवलेला असतो. 
  • त्यामुळे मुदत ठेवमध्ये पैसे गुंतवताना ती बँक शेड्युल्ड बँक आहे का, हे एकदा तपासून पाहावे, ज्यामुळे तुमचे जास्तीत जास्त पैसे सुरक्षित राहू शकतील.

२. व्याजदर: 

  • बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार डोक्यात आल्यावर सर्वात पहिला प्रश्न असतो की त्यावर ‘किती व्याजदर मिळणार?’ 
  • हा व्याजदर प्रत्येक बँकेवर वेगवेगळा असतो. शिवाय मुदत ठेव केलेल्या रकमेवरील हा व्याजदर किती कालावधीसाठी रक्कम ठेवणार आहे त्यावर अवलंबून असतो. 
  • खाजगी क्षेत्रातील बँका तुलनेने जास्त व्याजदर देताना दिसतात. 
  • सर्वसाधारणपणे १८० दिवसांपर्यंत जितकी रक्कम ठेवली असेल त्यावर व्याज मिळते आणि १८० दिवसानंतर दर ३ महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.
  • अनेक बँका जेष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा थोडा जास्त व्याजदर देतात. त्यामुळे तुम्ही स्वतः जेष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील जेष्ठ नागरिक असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने जर मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर त्यानुसार व्याजदराची चौकशी करावी.

संबंधित लेख: बँकेतील ठेवींना सुरक्षित पर्याय 

३. कालावधी: 

  • बँका ग्राहकांच्या गरजेनुसार कालावधीचे विविध पर्याय उपलब्ध करून देतात. उदा. १ ते ३ वर्षे, 4 ते ६ वर्षे इ. यामध्ये तुम्हाला जो पर्याय सोयीस्कर वाटेल तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता.
  • हा कालावधी कमीत कमी ७ ते १० दिवसांपासून जास्तीत जास्त ८ ते १० वर्षांपर्यंत असू शकतो.
  • कालावधीनुसार व्याजदर देखील वेगवेगळा असतो. 
  • ७ ते १० दिवसांच्या कालावधीसाठी जवळजवळ सर्व बँका एकसारखाच व्याजदर देतात आणि जसजसा कालावधी आणि रक्कम वाढेल त्यानुसार त्यावर मिळणारा व्याजदर वाढत जातो.
  • यामध्ये महत्वाची बाब म्हणजे दिलेल्या कमीत कमी कालावधीपेक्षाही कमी वेळासाठी पैसे ठेवले, तर त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. 
  • यासोबत हे पण लक्षात घेतले पाहिजे की मुदत ठेव मध्ये व्याज आकारताना १८० दिवसानंतर दर ३ महिन्यांनी कॅल्क्युलेट केले जाते आणि पुढच्या ३ महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. 

४. करामध्ये मिळणारी सवलत: 

  • मुदत ठेव चा पर्याय निवडण्यामागचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे त्यामुळे मिळणारी करामधील सवलत हे आहे. 
  • हा फायदा जेष्ठ नागरिकांना मिळू शकतो कारण त्यांनी मुदत ठेव केलेल्या रकमेवर आणि मिळणाऱ्या व्याजावर त्यांना करातून सूट दिलेली आहे. 
  • कर आकारतेवेळी कोणत्याही प्रकारचे व्याज हे ‘उत्पन्न’ म्हणून गणले जाते. 
  • अशा वेळी तुम्ही जर कर वाचविणाऱ्या मुदत ठेव च्या पर्यायाची निवड केली असेल, तर तुमची करातून मुक्तता होऊ शकते. 
  • सध्याच्या नियमानुसार जर तुम्हाला मिळणारी एकूण व्याजाची रक्कम वर्षाला ४०,००० रुपयांपर्यंत असेल, तर त्यावर कर लागू होत नाही. 
  • या बाबतीत टीडीएस कापला जाऊ नये यासाठी फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरून द्यावा लागतो.

इतर लेख: टीडीएस प्रणाली आणि बँक ठेवींवरील व्याजाचं गणित

५. ऑनलाईन की ऑफलाईन मुदत ठेव खाते: 

  • आजकाल बऱ्याच बँका नवीन मुदत ठेव खाते सुरु करण्याचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पर्याय उपलब्ध करून देतात. 
  • तुमच्या इच्छेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. 
  • ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष बँक शाखेमध्ये जाऊन खाते सुरु करणे. यामध्ये बँकेमध्ये छोटासा फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यात तुमचा मोबाईल नंबर, पत्ता वगैरे माहिती द्यायची असते.
  • त्याचप्रमाणे ऑनलाईन चा पर्याय निवडल्यास मुदत ठेवीची रक्कम थेट तुमच्या बचत खात्यामधून वजा करून घेतली जाते. 
  • यामध्ये तुम्हाला कोणत्या शाखेमध्ये खाते सुरु करायचे आहे तेदेखील तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. 
  • अशा वेळी मुदत ठेवीचा कालावधी संपल्यावर तुमच्या बचत खात्यामध्येच व्याजासह सर्व रक्कम जमा केली जाते.

मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वीच्या काही महत्वाच्या बाबी आपण या लेखात पाहिल्या. पुढच्या लेखामध्ये यासंबंधीच्या आणखी काही महत्वाच्या घटकांचा विचार आपण करणार आहोत.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…