Reading Time: 2 minutes

संक्रांतीनंतर हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जातो आणि आयकरचे गरम गरम वारे सगळीकडे वाहायला लागतात . मग शोधले जातात करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय!  खरंतर करबचत करणारी गुंतवणूक करण्याचा सर्वात योग्य कालावधी असतो तो, ‘आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा कालावधी’. परंतु “परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करण्याची सवय मोठं झाल्यावरही जात नाही” आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवणूक करण्याचे काम चालू असतं.

आयकर आणि करबचत

  • भारत देशामध्ये आयकर या शब्दाचीच धास्ती घेणारे अनेकजण सापडतील. नुसतं आयकर म्हटलं तरी अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात.
  • आपल्या मेहनतीचा पैसा करस्वरूपात का होईना पण आपल्याकडून जातोय ही भावना अनेकांसाठी त्रासदायक असते. निव्वळ कंटाळा म्हणून  आयकर व आयकर रिटर्न न भरणारेही अनेकजण आहेत.
  • आपण भरलेली कराची रक्कम ही  देशातील अनेक सुविधांसाठी व विकासाच्या कामांसाठी वापरली जात असते त्यामुळे आयकर भरणं ही आपली कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे.
  • तसेच आयकर बुडवून नंतर दंड स्वरूपात आयकरासोबत अधिक रक्कम भरण्यापेक्षा वेळेवर आयकर भरणं कधीही चांगलं.
  • आयकर भरणं ही आपली नैतिक जबाबदारी आहेच पण कायदेशीर मार्गाने कर वाचवणं हा आपला अधिकार आहे किंवा आपल्याला मिळालेली एक सवलत आहे. त्यामुळे योग्य गुंतवणुकीतून कर वाचवल्यास ‘आयकर’ या शब्दाबद्दलची नाराजी काही अंशी तरी कमी होईल.

कर नियोजन आणि गुंतवणूक:

  • गुंतवणूक ही करबचतीसोबत उत्तम परतावा देणारी असावी.
  • गुंतवणूक करताना करबचत करणारे विविध पर्याय, प्रत्येक पर्यायाची करबचत मर्यादा आणि आपण आधीपासून केलेली गुंतवणूक या साऱ्याचा विचार करावा.
  • गुंतवणूक करताना तात्पुरत्या कालावधीचा विचार करण्यापेक्षा दूरदृष्टी ठेवून विचार करावा.
  • करबचत गुंतवणुकीसाठी तसे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु करदात्यांकडून इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS),  सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अशा पर्यायांना जास्त पसंती दिली जाते.
  • अशाप्रकारे आपले करपात्र उत्पन्न, करबचतीसाठी करता येण्यासारखे क्लेम (उदा. गृहकर्ज व्याज, शैक्षणिक खर्च, पीएफ इत्यादी), आधीच केलेली गुंतवणूक आणि मुख्य म्हणजे आपली करबचतीची गरज लक्षात घेऊन योग्य त्या पर्यायाची निवड करावी.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) :

  • भारत सरकारने १९६८ मध्ये पीपीएफ योजना सुरू केली. निश्चित परतवा, करबचत, दीर्घकालीन गुंतवणूक ही या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
  • ही योजना १५ वर्ष एवढ्या मोठ्या कालावधीसाठीची गुंतवणूक योजना आहे. गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास तो लॉक-इन कालावधीच्या आधी यातील काही रक्कम काढू शकतो.
  • या योजनेमधील गुंतवणुकीचा व्याजदर सतत बदलत असतो. सध्याचा दर आहे ८.७% इतका आहे.
  • आयकर कायदा, १९६१ कलम ८० सी या कलमाअंतर्गत दीड लाखापर्यंत करवजावट मिळते.

राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS):

  • ही एक निवृत्तीवेतन योजना असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
  • एनपीएस गुंतवणूकीस कलम ८० सी च्या अंतर्गत करवजावट मिळते.
  • ततसेच कलम ८० सीसीडी (१बी)अंतर्गत ‘एनपीएस’मधील रु. ५० हजारांच्या गुंतवणुकीची रक्कम अतिरिक्त करवजावटीस पात्र असते.

इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS):

  • करबचतीसाठी अनेकजण ईएलएसएस फंडाला पसंती देतात. करबचतीसोबत उत्तम परतावा देणारी अशी ही योजना आहे. यामध्ये तीन वर्षांचा लॉक इन पिरिएड असून गुंतवणूक करताना मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फंड हाऊस निवडताना नावाजलेले फंड हाऊसच निवडावेत.
  • तसेच यामधील लॉक-इन कालावधीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचे ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असे दोन प्रकार असतात. क्लोज एंडेड फंडांचा लॉक-इन कालावधी दहा वर्षे तर ओपन एंडेड फंडांचा कालावधी तीन वर्षांचा असतो. गुंतवणूक सल्लागार बहुतांश वेळा ओपन एंडेड फंडांची निवड करण्यास पसंती देतात.
  • यामध्ये रु. १,५०,०००/- पर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये वर्षाला जास्तीत जास्त रु. ४६,३५०/-  रुपयांपर्यंत करबचत करता येणे शक्य आहे.
गुंतवणूक लॉक इन कालावधी करबचत मर्यादा
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) १५ वर्षे रु. १,५०,०००/- पर्यंत
राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) निवृत्तीपर्यंत रु. ५०,०००/- पर्यंत  
इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) ३ वर्षे रु. १,५०,०००/- पर्यंत

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2QTVqC0)

राष्ट्रीय पेन्शन योजना ,  गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १,

ELSS की ULIP?गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…