Reading Time: 2 minutes

सध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. सणासुदीला अथवा अधूनमधून येणाऱ्या आकर्षक ऑफर्स, कॅशबॅक, रिवार्ड पॉईंट्स, घरबसल्या मिळणारे खरेदीचे अनेक पर्याय, ट्राय अँड बाय सारखे पर्याय यासारख्या अनेक कारणांमुळे ऑनलाइन शॉपिंगला सुगीचे दिवस आले आहेत.

ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा इतर पर्यायांनाच ग्राहक जास्त पसंती देत आहेत. रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा कार्ड पेमेंट व वॉलेट पेमेंटला जास्त पसंती दिली जात आहे.  अगदी भाजीवाले, फेरीवालेही सध्या वॉलेट पेमेंट स्वीकारताना दिसत आहेत. 

पण “सोय तितकी गैरसोय” या म्हणीनुसार काही वेळा ‘Transaction failed” हा मेसेज समोर दिसल्यावर अनेकांचा हिरमोड होतो. एकीकडे खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात पण लाभार्थीच्या खात्यात मात्र जमा होत नाहीत.  अशा प्रसंगी मग नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. 

ऑनलाईन बँकींग गैरव्यवहार आणि ग्राहक

अनेकदा बँकेत वारंवार खेटे घालूनही बँकेकडून खात्यावर रक्कम जमा केली जात नाही. या साऱ्या प्रकारात नाहक वेळ फुकट जात असतो. 

परंतु आता ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

  • ‘आरबीआय’च्या नवीन निर्णयानुसार बँकेने अयशस्वी (fail) झालेल्या ‘डेबिट कार्ड’ व्यवहारांची तक्रार पाच दिवसांत, तर युपीआय व वॉलेटमधून केलेल्या व्यवहारांसंदर्भातील तक्रार एका दिवसाच्या आत सोडवावी लागणार आहे. 
  • याशिवाय सर्व पेमेंट ऑपरेटर्सना एटीएम, स्वाइप मशीन आणि आधार कार्ड वापरून केलेल्या अयशस्वी व्यवहारांची तक्रार पाच दिवसात आणि आयएमपीएस (IMPS) व्यवहार एका दिवसात सोडवावेत असे निर्देश दिले आहेत.
  • अयशस्वी व्यवहार म्हणजेच फेल्ड ट्रान्झॅक्शन्स संदर्भात बँकेत तक्रार करूनही पैस परत न मिळाल्याच्या वाढत चाललेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला आहे. 
  • ऑनलाइन व्यवहार अयशस्वी झालेल्या तक्रारींचे निवारण विहित मुदतीत न झाल्यास, संबंधित बँकेकडून ग्राहकाच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा होईपर्यत प्रतिदिन १००/- रुपये जमा करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.
  • यूपीआय (UPI), आयएमपीएस (IMPS), इनएसीएच (NACH) यांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांसाठीही हाच नियम लागू करण्यात आला आहे. 
  • अनेकदा, सर्व्हर डाऊन होणे, सेशन एक्सपायर होणे, एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसणे, अशा अनेक कारणांमुळे ट्रान्झॅक्शन्स फेल होऊ शकतात. परंतु यामध्ये ग्राहकाचा काहीच दोष नसूनही त्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
  • यापूर्वी या तक्रारींच्या निवारणासाठी समान मार्गदर्शक नियम नसल्यामुळे, प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे होते.  आता आरबीआयच्या नवीन नियमांमुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 
  • याचबरोबर, आपल्याच बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये डेबिट कार्ड वापरून केलेली बॅलन्स चौकशी, चेक बुक विनंती, फंड ट्रान्सफर इत्यादी व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाणार नाही.

१ सप्टेंबर पासून बँकांच्या नियमांमध्ये झालेले महत्वपूर्ण बदल

ऑनलाईन व्यवहारांमुळे पारदर्शता वाढते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांबाबत असणाऱ्या समस्यांबाबत गांभीर्याने विचार करून वेळीच योग्य पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर या नवीन निर्णयामुळे ऑनलाईन व्यवहारांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.