Upcoming IPOs
Reading Time: 3 minutes

Upcoming IPOs

आगामी काळात पेटीएम सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत (Upcoming IPOs). मागच्या वर्षी म्हणजे २०२० साली बीएसई च्या रिपोर्टनुसार ३१ पेक्षा जास्त कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये आले होते. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ सालात आजपर्यंत तब्बल ३६ कंपन्यांचे आयपीओ येऊन गेले. मागच्या वर्षात मिसेस बेक्टर्स, माझगाव डॉक आणि बर्गर किंगच्या आयपीओने बाजारात मोठा धमाका केला होता.

कंपनीचा आयपीओ बाजारात आणण्यासाठी डीआरएचपी (DRHP –Draft Red Herring Prospectus) च्या स्वरूपात ‘मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज’ आणि ‘सेबी’ची मान्यता मिळवावी लागते. या मान्यतेसाठी काही महत्वाच्या कंपन्यांचे अर्ज दाखल झाले आहेत, त्याच आधारे जमा झालेली ही माहिती.

किमान गुंतवणुकीसाठी किती शेअर्स घ्यावे लागतील, त्यांची किंमत काय असेल, त्यांच्या तारखा काय असतील याविषयीची माहिती अजून समोर आलेली नाही. ती योग्य वेळी जाहीर होईलच, परंतु त्या कंपन्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठीचा हा रिपोर्ट.

हे नक्की वाचा: IPO: आयपीओ म्हणजे काय? 

Upcoming IPOs: आगामी काळात विक्रीसाठी उपलब्ध असणार हे ८ आयपीओ 

१. पेटीएम:

 • भारतातील आजवरचा सर्वात मोठा १६,६०० कोटी रुपये मूल्य असणारा आयपीओ बाजारात दाखल होतोय, तो म्हणजे पेटीएमचा. 
 • ऑक्टोबर २०१० साली कोल इंडिया या कंपनीचा १५,००० रुपये मूल्याचा आयपीओ येऊन गेला आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आयपीओ हाच.
 • डिजीटल पेमेंट आणि इतर आर्थिक सुविधा पुरवणारी कंपनी म्हणजे ‘पेटीएम’. काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिलीय की पेटीएमने आयपीओ बाबत सेबीकडे १५ जुलै रोजी अर्ज केला आहे. सप्टेंबर महिन्यात सेबी आपला निर्णय देईल व त्यानंतर लवकरात लवकर पेटीएमचा आयपीओ विक्रीसाठी येईल.
 • ‘प्रायमरी मार्केट’द्वारे पेटीएम ८३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आवाहन करणार आहे आणि उर्वरित ५०% रकमेसाठी ‘सेकंडरी’ मार्केटद्वारे गुंतवणूकीचे आवाहन करणार आहे.

२. मोबिक्विक:

 • पेटीएम प्रमाणेच मोबिक्विक ही देखील डिजिटल वॉलेट आणि पेमेंट कंपनी आहे. १९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी ही कंपनी बाजारात आयपीओ घेऊन येत आहे. त्यासाठी त्यांनी १२ जुलै रोजी सेबीकडे अर्ज केला आहे. 
 • ‘प्रायमरी मार्केट’द्वारे १५०० कोटी आणि ‘सेकंडरी मार्केट’द्वारे उर्वरित ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आवाहन करण्यात येणार आहे.
 • या आयपीओ द्वारे कंपनीला अमेरिकन एक्स्प्रेस, बजाज फायनान्स, सिस्को सिस्टीम, सेकुया कॅपिटल्स आणि ट्रायलिन एशिया या भागधारक कंपन्यांचा समभाग काही अंशी कमी करायचा आहे.
 • कंपनीचे संस्थापक बिपीन प्रीत सिंह आणि उपासना ताकू त्यांच्या भागीदारीतील काही अंशी समभाग विकणार आहेत.

३. केमस्पेक केमिकल्स:

 • रसायन निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या केमस्पेक केमिकल्स या कंपनीने ७०० कोटी रुपये मूल्याचे आयपीओ दाखल करण्यासाठी १४ जुलै रोजी सेबी कडे अर्ज केला आहे. 
 • संपूर्ण ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपनी ‘OFS’ द्वारेच आवाहन करणार आहे.
 • त्वचा, केस यांची निगा राखण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये तसेच उच्च रक्तदाबास प्रतिबंध करणाऱ्या औषधांमध्ये वापरली जाणारी रसायने उत्पादित करण्याचे काम ही कंपनी करते.
 • २१ सप्टेंबर रोजी आयपीओ साठी लिलाव सुरु होईल आणि २३ सप्टेंबर रोजी बंद होईल असे रिपोर्ट’मधून समजते.

४. एचपी अडेजीव:

 • सॉल्व्हंट सिमेंटचे उत्पादक ‘एचपी अडेजीव’ने ‘आयपीओ’साठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. ज्यात ४१.४० लाख इक्विटी शेअर्सची नव्याने आणि ४,५७,२०० इक्विटी शेअर्सची OFS द्वारे विक्री करण्याची ऑफर समाविष्ट आहे. 
 • कंपनीने अद्याप आयपीओची रक्कम जाहीर केलेली नाही, परंतु सध्याच्या आणि प्रस्तावित विस्ताराच्या भांडवली खर्चासाठी निधी उभारण्याचे काम या आयपीओच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले आहे.

५. जन स्मॉल फायनान्स बँक

 • जन स्मॉल फायनान्स बँकेला सुरुवातीच्या शेअर-विक्रीद्वारे निधी गोळा करण्यासाठी बाजार नियामकांकडून ग्रीन सिग्नल मिळालाय.
 • बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी, हिरो एंटरप्राइझ पार्टनर व्हेंचर्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, एनम सिक्युरिटीज, नॉर्थ हेवन प्रायव्हेट इक्विटी एशिया प्लॅटिनम पीटीई लिमिटेड, क्यूआरजी एंटरप्रायजेस आणि ट्री लाइन एशिया मास्टर फंड (सिंगापूर) पीटीई या विद्यमान भागधारकांनी ९२.५३ लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर देऊन आयपीओच्या माध्यमातून ₹७०० कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
 • भविष्यातील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘आयपीओ’मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग आपल्या ‘टियर-१’ भांडवलाला प्रबळ करण्याचा मानस ‘जन स्मॉल फायनान्स बँक’चा आहे.

६. उमा कन्व्हर्टर:

 • गुजरात स्थित पॅकेजिंग कंपनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून ३६ कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे. 
 • कंपनी अन्न आणि पेय उद्योग, ई-कॉमर्स, स्वच्छता आणि वैयक्तिक निगा, औषध, गृह आणि कृषी उद्योगांसारख्या विविध आणि बहुआयामी दैनंदिन जीवनात उपयोगी येणाऱ्या वस्तूंसाठी लागणाऱ्या पॅकेजिंग सामग्री तयार करते. 
 • गुजरातमध्ये असलेल्या दोन उत्पादन युनिटमधून कंपनीचे कार्य चालते; तसेच सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, सेनेगल आणि अमेरिका यांसारख्या देशांना कंपनीची उत्पादने निर्यात केली जातात.

७. नॉर्दन आर्क कॅपिटल:

 • नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) असलेल्या नॉर्दर्न आर्क कॅपिटलने आयपीओ जारी करण्यासाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. भागधारकांकडून ३.६५ कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरसह ३०० कोटी रुपये उभे करण्याचे नियोजन केले आहे..
 • एनबीएफसी अल्पसेवा असलेल्या कुटुंबांच्या आणि व्यवसायांच्या कर्जाच्या आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करते. मायक्रोफायनान्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), वाहन, ग्राहक, परवडणारी गृहनिर्माण आणि कृषी पुरवठा देणाऱ्या क्षेत्रांसाठी वित्तपुरवठा देण्याचे काम नॉर्दन आर्क कॅपिटल करते.

८. श्री बजरंग पॉवर अँड इस्पात:

 • ‘श्री बजरंग पॉवर आणि इस्पात’ या इंटिग्रेटेड स्टील कंपनीने  ७०० कोटी रुपये जमा करण्याकरिता आयपीओ जारी करण्यासाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे.
 • कंपनी यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग आपले काही कर्ज फेडण्याच्या दिशेने आणि भविष्यातील कामकाजासाठी लागणाऱ्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 • विशेषत: भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात 11 वितरक आणि ५१४ डीलर्सचे नेटवर्क असलेली ही कंपनी प्रामुख्याने भारतातील पायाभूत सुविधा आणि बांधकाम उद्योगात कार्यरत आहे. 
 • २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या ग्राहकांन सेवा पुरवण्यासाठी कंपनीचे रायपूरमध्ये तीन उत्पादन युनिट कार्यरत आहेत.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web serach: Upcoming IPOs in Marathi, Upcoming IPOs Marathi Mahit, Upcoming IPOs Marathi, List of upcoming Ipos in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…