Reading Time: 3 minutes

जगाच्या इतिहासात अशा काही मोजक्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांनी मध्यमवर्गीय लोकांची जीवनशैलीच बदलून टाकलेली आहे, मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणलेली आहे. या मोजक्या कंपन्यातील आघाडीच नाव म्हणजे फोक्सवॅगन होय. Volkswagen marathi mahiti

  • फोक्सवॅगन कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात खूप जबरदस्त काम केलेलं आहे. जगात असा एखादाच देश असेल ज्या देशात फोक्सवॅगनची गाडी पहायला मिळणार नाही
  • मध्यमवर्गीय लोकांचे आयुष्य बदलण्यापासून दुसऱ्या महायुद्धात मोठी भूमिका निभावण्यापर्यंत अनेक कारनामे फोक्सवॅगन कंपनीने केले आहेत.
  • आज अब्जावधी डॉलर्स बाजार मूल्यांकन असलेल्या फोक्सवॅगनची सुरुवात मात्र एका लहानश्या गॅरेजमधून झालेली आहे. या कंपनीचा प्रवास खूप थक्क करून सोडणारा आहे. हा प्रवास आपण सहा टप्प्यात समजून घेऊया.
  • अनेकदा फोक्सवॅगन म्हणायचे की स्पेलिंग प्रमाणे वोक्सवॅगन म्हणायचे असा प्रश्न मराठी भाषिकांना पडतो. तुम्ही लक्षात घ्या की मूळ जर्मन भाषेत असणाऱ्या कंपनीच्या नावाचे भाषांतर मराठीत केले तर सर्वसामान्य लोकांची (volks) गाडी (wagon) असे उत्तर मिळते. त्यामुळे उच्चार नेहमी फोक्सवॅगन असा करावा.  (volkswagen pronunciation in marathi, volkswagen or folkswagen)

   ) फोक्सवॅगनचा निर्माता

  • फर्डिनांड पोर्शे या एका भारदस्त, हुरहुन्नरी, प्रयोगशील व्यक्तीने फोक्सवॅगन कंपनीला जन्म दिला आहे. फर्डिनांड पोर्शेला गाडी, गाडीचे इंजिन- डिझाईन करण्याचा मोठा छंद होता. ऐन तारुण्यात अनेक प्रकारचे इंजिन तयार करून फर्डिनांड पोर्शे यांनी अनेक पुरस्कार जिंकले होते. (ferdinand porsche marathi)
  • पहिल्या महायुद्धात फर्डिनांड पोर्शे यांनी ऑस्ट्रिया देशासाठी लढाऊ विमानाचे इंजिन देखील बनवून दिले आहे. या  अशा व्यक्तीने फोक्सवॅगन कंपनीचा पाया रचलेला आहे.

नक्की वाचा – मारुती सुझुकी कंपनीची यशोगाथा

) ‘पीपल्स कारचे स्वप्न

  • फर्डिनांड पोर्शे यांच्या काळात म्हणजे १९१० च्या दशकात कार या फक्त श्रीमंतासाठी बनवल्या जायच्या. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, असे धनाढ्य व्यक्तीच कार खरेदी करू शकायचे.
  • ही मक्तेदारी मोडण्याच फार मोठं काम फर्डिनांड पोर्शेने केलेलं आहे. त्यांचं स्वप्न मुठभर लोकांसाठी अलिशान कार बनवण्याचं नव्हतं तर सामान्य लोकांना परवडणारी शानदार कार बनवण्याचं होतं.

    ) आणि…. फोक्सवॅगनचा जन्म झाला
  • सामान्य लोकांसाठी कार बनवण्याचं स्वप्न आणि त्याचे मॉडेल घेऊन फर्डिनांड पोर्शे त्यावेळच्या अनेक कार कंपन्यांमध्ये  गेले पण एकाही कंपनीने त्यांच्या मॉडेलवर विश्वास ठेवला  नाही. तेव्हा त्यांनी  स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोक्सवॅगनची सुरुवात केली आणि यात  त्यांना हिटलरने मोठी मदत केली.
  • फर्डिनांड पोर्शे यांनी रेस कार्सचे देखील मॉडेल बनवले. खास युद्धासाठी लागणारी  वाहने डिझाईन केली. या कारणामुळे फोक्सवॅगनला अनेक सरकारी कंत्राटे मिळू लागली आणि  कंपनीचा पसारा वाढू लागला.

    ) पीपल्स कारबीटलबाजारात
  • फोक्सवॅगनने सर्वसामान्य लोकांना परवडणारी बीटल कार बाजारात आणली आणि ऑटोमोबाईल क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून गेला. श्रीमंताची मक्तेदारी  असणारे ऑटोमोबाईल क्षेत्र सामान्य लोकांसाठी खुले झाले. ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील फार मोठी क्रांती होती.
  • या कारची मागणी काही दिवसातच तीन लाखापर्यंत गेली. मध्यमवर्गीय लोकांचे कार मधून फिरण्याचे स्वप्न फोक्सवॅगनने प्रत्यक्ष्यात आणले.

Buy New Car : कार खरेदी करताना वाचा ‘या’ टिप्स


) फोक्सवॅगनचा पुनर्जन्म

  • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याला मोठ्या प्रमाणात जीप बनवून देण्याचे काम फोक्सवॅगनने केले. फोक्सवॅगनच्या मजबूत वाहनाने जर्मनीला शत्रू सैन्यावर मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाची भमिका बजावली पण जेव्हा जर्मनी दुसरे महायुद्ध हरली तेव्हा त्याची मोठी किंमत फोक्सवॅगनला देखील चुकवावी लागली.
  • फोक्सवॅगनचा कार, जीप निर्मितीचा कारखाना बॉम्ब टाकून उडवला गेला. कंपनीची राख झाली पण त्याच राखेतून फोक्सवॅगनने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मोठी भरारी घेतली. फर्डिनांड पोर्शे यांना जेल मध्ये टाकलं गेलं. ते जेलमधून बाहेर आले, तेव्हा ७२ वर्षाचे होते. रिटायर होऊन आरामात जीवन जगण्याचे सोडून त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आणि फोक्सवॅगनचा पुनर्जन्म झाला.

    ) फोक्सवॅगनची मार्केटिंग – 
  • फोक्सवॅगनच्या स्वस्त आणि दमदार कार्सने संपूर्ण युरोप काबीज केलेला होता. आता कंपनीला अमेरिकेचा बाजार खुणावत होता. अमेरिकेत बीटल सारख्या लहानश्या कारची विक्री करणे अतिशय अवघड काम होतं. कारण त्यावेळी अमेरिकेच्या लोकांना मोठ्या आकाराच्या कार्स वापरण्याची सवय होती.
  • आपल्या मार्केटिंगच्या जादूने फोक्सवॅगनने अमेरिकेतील लोकांची सवयच बदलून टाकली. रिटेलर्सच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहण्याची नवीन पद्धत कंपनीने वापरली जी आज लोकप्रिय झालेली दिसते. अनेक प्रकारच्या मार्केटिंग पद्धती  वापरून अमेरिकेचा बाजार फोक्सवॅगनच्या कार्सने भरून गेला.
  • आज ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी ही फोक्सवॅगन आहे. जवळपास लाख कामगार या कंपनीत काम करतात. टोयोटा नंतर जगातली दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. तब्बल ३१ देशात फोक्सवॅगनचे कार निर्मितीचे कारखाने आहेत. १५३ देशात फोक्सवॅगन उपस्थित आहे.
  • जगात कुठेही जेव्हा १० कार विकल्या जातात त्यातल्या ३ कार या फोक्सवॅगन कंपनीच्या असतात. शून्यातून सुरु झालेलीं ही कंपनी आज अब्जावधी डॉलर्सची आहे. बेन्टले, स्कोडा, BMW . अनेक कार्स आणि कंपन्या आज फोक्सवॅगनच्या मालकीच्या आहेत.

    आज फोक्सवॅगनचा वटवृक्ष अवाढव्य झालेला असला तरी त्याची सुरुवात एका लहानश्या रोपट्यापासून झाली होती हे विसरता कामा नये. आपणही सुरुवात करा, एखाद्या स्टार्टअपचे, गुंतवणूकीचे लहानशे रोपटे लावा. कितीही मोठ्या संकटात, कधीही निराश होऊ नका. अशावादी रहा, त्याचा एक दिवस नक्कीच मोठा वटवृक्ष होईल.

हे ही वाचा – एशियन पेंट्स – ८० वर्षांची यशोगाथा

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.