Index Fund
आजच्या लेखात आपण इंडेक्स फंड (Index Fund) म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक शक्य आहे का, याबद्दल माहिती घेऊया.
२०१७ पासून सेन्सेक्स, बीएसईमध्ये जो ३० स्टॉकमार्केट बारोमीटर आहे, या निर्देशांकाने ७६% वृद्धी अनुभवली. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, त्याने दरवर्षी १५% पेक्षा जास्त परतावे दिले आहेत. याच काळात लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या डिव्हीडंडपेक्षा हे प्रमाण निश्चितच जास्त आहे. थोडक्यात सांगयाचे म्हणजे, हे परतावे काही अग्रगण्य म्युच्युअल फंड्सपेक्षा जास्त आहेत. मग इथे प्रश्न उभा राहतो की आपण इंडेक्स फंडमध्येच गुंतवणूक करणे सोयीस्कर ठरणार नाही का? असेल, तर ते कसे?
हे नक्की वाचा: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे
Index Fund: इंडेक्स फंड म्हणजे काय ?
- नावाप्रमाणेच इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, बीएसई १०० इत्यादीसारख्या इंडेक्समध्ये केलेली गुंतवणूक होय.
- ते म्युच्युअल फंडची कामगिरी मोजण्याकरिता त्या संदर्भाने वापरतात म्हणून त्यांना बेंचमार्क निर्देशांक असेही म्हणतात.
- त्यामुळे सेगमेंटनुसार म्युच्युअल फंड्सचे बॉरोमीटर असतील तेव्हा एखाद्याने त्यात का गुंतवू नये? याच कल्पनेवर इंडेक्स फंड उभे आहेत.
- हे फंड्स बाजार निर्देशांकात गुंतवणूक करतात आणिनिर्देशांकाच्या सिक्युरिटीजमध्ये समान वाटा मिळवून त्यांच्या परफॉर्मन्सचे अनुकरण करतात.
- पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांमध्ये इंडेक्स फंड मागील वर्षात खूप लोकप्रिय झाले.
- लोअर डाऊनसाइड रिस्कच्या तुलनेत ब्लूचीप स्टॉक्स हे सतत परतावे देतात, हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या म्युच्युअल फंड्सपेक्षा हे अव्यवस्थित फंड्स (उदा. इंडेक्स फंड) उत्तम कामगिरी करतात.
- इंडेक्स फंड्स तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठीही मदत करतात. त्यात स्थिरता आणतात.
- काही अभ्यासानुसार, विशेषत: लाँग टर्ममध्ये बेंचमार्क निर्देशांक चांगली कामगिरी करतात. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसवर विश्वास नसेल तर, तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा विचार करू शकता.
- इक्विटीमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार याचा विचार करू शकतात.
Index Fund: इंडेक्स फंड्स भारतात लोकप्रिय आहेत का?
- इंडेक्स फंड्सना हवी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. विविध म्युच्युअल फंड घराण्यांनी अनेक प्रकारचे इंडेक्स फंड्स काढले आहेत. निर्देशांकात गुंतवणूक करणारे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) देखील आहेत.
- तुम्ही बँक निफ्टी तसेच मिडकॅप-स्मॉल कॅप आधारीत निर्देशांक (बीएसई व एनएसई) एक्सचेंज आदी पर्यायही वापरू शकता. पण हे करतानाच त्यातील अस्थिरता आणि जोखीमीचाही विचार केला पाहिजे.
विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?
Index Fund: चांगला इंडेक्स फंड कसा शोधायचा?
- कोणत्याही इंडेक्स फंडच्या कामगिरीचा अंदाज हा त्या इंडेक्सने दिलेल्या परताव्यांच्या आधारे काढता येतो.
- ट्रॅकिंग एरर- जी बेंचमार्क निर्देशांकातून फंडाच्या स्थानाचे विचलन प्रतिबिंबीत करते. ते निश्चित करण्यासही मदत करते.
- लोअर ट्रॅकिंग एरर असलेल्या इंडेक्स फंडाकडेच आपण आदर्श म्हणून पाहिले पाहिजे.
Index Fund: इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे काही अतिरिक्त फायदे:
- हे कमी जोखिमीचे व कमी किंमतीचे असतात. निधीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे.
- लाँग-टर्म गुंतवणूक केल्यास यातून उत्तम परिणाम मिळतात.
- आजवरचा इतिहास पाहता, इंडेक्स फंड्सनी इतर फंड्सच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.
Index Fund: इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची?
- अग्रेसर म्युच्युअल फंड घराण्यांनी जारी केलेले इंडेक्स फंड आणि ईटीएफ तुम्ही तपासू शकता.
- सर्वात चांगल्या परताव्यासाठी आपल्या इंडेक्स फंडाने घेतलेल्या सगळ्या शुल्काकडे विशेष लक्ष द्या.
- यापैकी काही शुल्कांमध्ये एक्झिट लोड, मॅनेजमेंट फी इत्यादींचा समावेश होतो.
- इंडेक्स खरेदी करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही खरेदी करू शकता.
- आणखी पर्याय म्हणजे, ग्रो, पेटीएम मनी, ईटी मनी इत्यादी ऑनलाइन म्युच्युअल फंडांच्या मदतीनेही तुम्ही गुंतवणूक करू शकता.
- गुंतवणूक करण्यासाठी तुमचे नोंदणीकृत ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.
– श्री प्रांजल कामरा
मुख्य कार्यकारी अधिकारी, फिनॉलॉजी
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Index Fund in Marathi, Index Fund Marathi Mahiti, Index Fund Marathi, Index Fund mhnaje kay?