शेअर गुंतवणूक
https://bit.ly/3ppvIGT
Reading Time: 6 minutes

संपत्तीवृद्धीचा पंकोमार्ग (Trend is your friend)

शेअर बाजार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात झाल्यावर लोक त्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. यातून विविध प्रकारे गुंतवणूक करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जे पारंपरिक गुंतवणूकदार आहेत त्यांनी बाजारात त्यांची गुंतवणूक कोणत्या पद्धतीने करावी ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होईल? एका झूम मिटिंगद्वारे माझे युवामित्र ‘पंकज कोटलवार (पंको)’ यांनी आपला रोखेसंग्रह (Portfolio) कसा तयार करावा? हे समजावून सांगताना त्याच्या गुंतवणूक पद्धतीची माहिती दिली. यात त्यांनी जे मुद्दे अधोरेखित केले त्याच्याशी मी जवळपास सहमत आहे त्यामुळे सर्वानाच याची माहिती व्हावी यासाठी मी हा लेख लिहीत आहे.

हे नक्की वाचा: हे आहेत शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

  • सर्वसाधारणपणे अशा मिटिंग या व्यवसायाची जाहिरात करणाऱ्या असतात हा कार्यक्रम तसा नव्हता आणि तो दीर्घमुदतीची गुंतवणूक करणाऱ्यांना नक्कीच उपयोगी पडेल असा होता.
  • बऱ्याचदा अनेक गोष्टी सर्वाना माहिती असल्या तरी त्याचा वापर केला जात नाही त्या अधिक जोरदारपणे कोणीतरी ठासून सांगाव्या लागतात.
  • श्री पंकज कोटलवार यांना आपण सुप्रसिद्ध लेखक म्हणून ओळखतो ते त्यांच्या ‘आकर्षणाचा सिद्धांत’ (Low of Attraction) या विषयावरील प्रेरणादायी लेखांमुळे. 
  • याशिवाय इतर अनेक विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे.  व्हाट्स अपच्या माध्यमातून माफक फी आकारून ते विविध विषयांवरील वर्ग घेतात. यात सहभागी  असलेले अनेक लोक त्यांच्या संपर्कात आहेत. 
  • त्यांचे लेख मोठे असले तरी समजायला अतिशय सोपे आहेत. 
  • उल्लेखनीय गोष्ट ही यातून मिळालेले पैसे ते सामाजिक कार्यासाठी वापरतात.यातून त्यांची सामाजिक जाणीवही दिसून येते. 
  • वास्तूविशारद याविषयात मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली असून सध्या ते डी वाय पाटील नॉलेज, सिटी पुणे येथे अध्यापनाचे कार्य करतात.

आजच्या सादरीकरणातून त्यांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी –

शेअर बाजारात गुंतवणूक कशासाठी?

  • शेअर बाजारातील गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडते. 
  • अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध असताना शेअर्समध्ये कशासाठी, तर सध्या जगभरात आलेल्या संकटावर उपाय म्हणून सर्वच देशांनी मोठ्या प्रमाणात भांडवल अर्थव्यवस्थतेत आणले आहे.
  • कर्जावरील व्याजदर कमी झाल्याने ठेवीदारांनाही कमी व्याज मिळत आहे. 
  • यामध्ये चलनवाढीचा दर लक्षात घेता महागाईशी सामना करायचा असेल तर गुंतवणूक करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. 
  • यात शेअरबाजारात गुंतवणूक हा चल/अचल मालमत्तेतील एक चांगला पर्याय आहे. 
  • यातील धोके लक्षात घेऊन थोडे धाडस दाखवणे जरूर आहे. 
  • अन्य ठिकाणी तुम्ही जोखीम न स्वीकारता केलेल्या गुंतवणुकीची सूत्रे कधीही तुमच्या हाती रहात नाहीत. तेव्हा असा हवाला ठेवून गुंतवणूक करण्यापेक्षा ज्ञानाचा वापर करून आपण शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्याची सर्व सूत्रे आपल्याकडे राहतात. 
  • ही गुंतवणूक अप्रत्यक्ष न राहता प्रत्यक्ष होते, म्हणजे कोणते शेअर खरेदी करायचे?  कधी खरेदी करायचे? कधी विकायचे? ती कंपनी कशी आहे? त्याचा भाव किती आहे? यात कोणत्या कारणाने उलाढाल व भाव यामध्ये फरक पडतोय? कधी आणि कोणत्या भावाने ते अधिकचे घ्यायचे?

महत्वाचा लेख: शेअर बाजार- गुंतवणूक करताना या मूलभूत चुका टाळा 

कोणते शेअर्स कसे निवडू?

  • चांगले शेअर्स घ्यावेत हे सर्वमान्य आहे ते शोधण्याच्या अनेकांच्या अनेक पद्धती आहेत. 
  • दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकदारांना अनेकजण व्यवसाय प्रकारातील सर्वोच्च स्थानी असलेले शेअर्स खरेदी करावेत असे सांगतात. 
  • शेअर्स हा आपला व्यवसाय आहे या दृष्टीने त्याकडे पाहावे, अनेक जण आपण ज्या वस्तू /सेवा वापरतो त्या कंपन्यांना मरण नाही असे सुचवतात. 
  • म्युच्युअल फंडाचे मालमत्ता विभाजन पाहून, कॉफी कॅन तंत्रज्ञानाने शोधलेल्या शेअर्सची मदत घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात तो योग्यच आहे, परंतू स्वतःला दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार समजणारे लोक बाजारभावात होणाऱ्या चढ उतारीमुळे अक्षरशः कासावीस होतात आणि काहीतरी उलट सुलट व्यवहार करतात आणि फसतात.
  • त्यामुळेच कुणी काही सांगितले तरी आपल्याला स्वतःला काही प्राथमिक गोष्टी माहिती असायलाच हवी. 
  • आपल्या निकषांवर ती पडताळून पाहता यायला हवं आणि तशाच प्रकारच्या अन्य कंपनीशी त्याची तुलनाही करता यायला हवी. तेव्हा यासाठी अभ्यास हवाच यातून सुटका नाही. 

शेअर्सचे वाचन

वर नमूद केलेल्या अभ्यासाला ‘शेअर्सचे वाचन करणे’ असा छान शब्दप्रयोग केला आहे. असे वाचन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी-

  • screener.in या संकेतस्थळास भेट द्या. 
  • तेथे जाऊन कंपनीची माहिती मिळवताना आलेल्या चौरसात कंपनीचे नाव टाका.
  • त्याबरोबर ही कंपनी काय व्यवसाय करते याबरोबरच 
    • कंपनीचे बाजारमूल्य (Market Capital), 
    • सध्याची किंमत (Market Rate), 
    • गेल्या 52 आठवड्यातील सर्वात कमी आणि सर्वात अधिक भाव (52 weeks high low),
    • बाजारभाव आणि प्रती शेअर मिळकत यांचे गुणोत्तर (Stock PE), 
    • पुस्तकी मूल्य (Book Value), 
    • लाभांश उत्पन्न (Dividend Yield), 
    • भांडवल उपयुक्तता प्रमाण (ROCE), 
    • भांडवल मिळकत प्रमाण (ROE), 
    • दर्शनी मूल्य (FV) अशा प्राथमिक गोष्टी दिसतात. यामध्ये काही अधिक माहिती वाढवायची असल्यास त्याची सोय आहे.
  • किंमत, किंमत मिळकत गुणोत्तर, कामगिरी यांचे प्रमाण चालू 52 आठवडे धरून आलेख स्वरूपात पाहता येतात, त्याचप्रमाणे ते 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष किंवा त्याहून अधिक उपलब्ध असेल त्याप्रमाणे बदलूनही पाहता येतात. 
  • यातील किंमतीचा आलेख हा 50 दिवस 200 दिवस सरासरी किंमत आणि उलाढाल याबरोबर पडताळून पहायची सोय आहे.
  • किंमत मिळकत गुणोत्तर हे सरासरी किंमत मिळकत गुणोत्तर आणि मागील 12 महिन्याचे सरासरी किंमत मिळकत गुणोत्तराशी पडताळून पहायची सोय आहे.
  • कंपनीची बलस्थाने, कच्चे दुवे कोणते ते समजतील.
  • महत्वाच्या माहितीसह स्पर्धक कंपन्याची स्थिती आणि तुलना करता येईल.
  • तिमाही अहवाल, नफा तोटा पत्रक, ताळेबंद रोखता प्रवाह, गुणोत्तरे या गोष्टी एकत्रित किंवा स्वतंत्रपणे पहायची सोय आहे. 
  • या सर्व गोष्टींची शेवटचे 12 महिने, 3, 5,10 वर्ष पाहून त्यांची तुलना करता येईल.
  • भागधारकांचे वर्गीकरण समजून त्यात झालेले बदल समजतील.
  • कंपनीने अलीकडे केलेल्या घोषणा, त्याचे संदर्भ पत्र पाहता येईल.
  • मागील वर्षांचे सविस्तर अहवाल व मूल्यांकन याविषयी माहिती मिळेल.

विशेष लेख: BSE vs NSE- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

या सर्व माहितीचा उपयोग योग्य कंपनीची निवड करायला होऊ शकतो. कंपनीची निवड योग्य असेल तर तोटा होण्याची शक्यता कमी असते. यात फारसे खोलात न जाता यातील महत्वाच्या गोष्टी या-

  • भांडवल उपयुक्तता प्रमाण (ROCE) 40% हून अधिक असावे.
  • भांडवलावरील परतावा (ROE) अधिक हवा
  • कंपनीच एकूण देणे त्याचे मालमत्तेशी असलेले प्रमाण (Current Ratio) 2 हून अधिक
  • भांडवलाच्या तुलनेत कर्ज (Debit to Equity Ratio) नाहीच किंवा कमीतकमी

(याला बँका वित्तीय कंपन्या अपवाद असून त्याच्या व्यवसायाचे स्वरूपच मुळी कर्जाची देवाणघेवाण असे आहे या कर्जाचे चांगले वाईट असे दोन प्रकार असून जे कर्ज पैसे मिळवून देतं ते नक्कीच चांगलं कर्ज)

निवडलेले शेअर्स किती घेऊ? कसे घेऊ?

  • एकदा तुमची शेअर्सची निवड ठरली की आपल्या सोयीनुसार, ऐपतीप्रमाणे, धोका स्विकारण्याच्या क्षमतेनुसार हळू हळू गुंतवणूक करावी त्यासाठी घाई करणे, मुदत ठेवी मोडणे, मालमत्ता विकणे कर्ज घेणे असे प्रकार करू नयेत. 
  • पूर्ण उत्पन्नाच्या 5 ते 10% रक्कम टाकून जमेल तशी त्यात भर टाकल्यास हळू हळू आपला स्वतःचा गुंतवणूक संच तयार होईल.

शेअर्स किती काळ ठेवू कधी विकू ?

  • अशा तऱ्हेने तयार झालेला गुंतवणूक संच किती काळ ठेवायचा? 
  • आयुष्यभर बाळगायचा का?  
  • घेतलेले शेअर्स तोट्यात चाललेत त्याचं काय करायचं? 
  • चांगला नफा देत आहेत त्याचं काय करायचं? 
  • यासारख्या प्रश्नाचे खरे खुरे उत्तर म्हणजे आपण जर योग्य निवड करून तावून सुलाखून शेअर घेतले आहेत म्हणजेच ते आज ना उद्या परतावा देणार. तेव्हा ते तोट्यात विकायचे नाहीत, हे नक्की. 
  • आपल्याला मिळणारा फायदा हा किमान 20% हवाच. आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत आपल्याला नजीकच्या काळात पैशांची गरज नाही मग का विकायचे? 
  • आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट नक्की कोणतं आहे? तेव्हा आज लावलेल्या बीजाचा वृक्ष झालेलं आपल्याला पहायचंय हे लक्षात ठेवा.

गुंतवणूक संचातील तोटा दर्शवणारे शेअर घ्यावेत का?

  • अनेकदा बाजारभाव खाली आला की आपण शेअर्स खरेदी करतो आणि वर गेला ली विक्री करतो?
  • या तंत्राने थोडेफार पैसे मिळतील पण त्यात तुम्ही अडकण्याची शक्यता असते. 
  • उदाहरणार्थ आपल्याकडे 2 झाडे आहेत. त्यातील एका झाडास विपुल फळे, तर दुसरे झाड सुकलेले आहे. असेच आपल्याकडे असलेले शेअर्स समजा.  
  • गुंतवणूकदार चांगले शेअर काही प्रमाणात विकून पैसे काढून घेतात, तर ज्यांचा भाव खाली आहे त्याची सरासरी करण्यासाठी विकत घेतात. 
  • ही परंपरागत पद्धत आहे म्हणजे फळे देणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडायच्या आणि न देण्याऱ्या झाडास खतपाणी घालायचं. 
  • याच्या उलट आपण केलं तर? जे शेअर फायद्यात आहेत त्यात वाढ केली तर काय होईल. त्याची सरासरी किंमत थोडी वाढेल. त्यातून मिळणारा परतावा थोडा कमी होईल पण आपली एकूण गुंतवणूक फायदेशीरच राहील. कमी परतावा देणारा शेअर तसाच ठेवा जास्त परतावा देणाऱ्या शेअरमध्येच गुंतवणूक करा.

शेअर्स कधी विकू?

  • आपण आपल्याला किमान किती परतावा हवा ते योजून ठेवा. 
  • सर्वसाधारणपणे कंपनी चांगली कामगिरी तर त्याचा भाव हळूहळू खाली येतो. 
  • सातत्याने उच्च परतावा देणारे शेअर कालांतराने आपल्यास मान्य उचित परातव्याच्या जवळ आल्यास यातून बाहेर पडून ज्यातून अधिक परतावा मिळतोय असे शेअर खरेदी करावेत. 
  • Trend is your friend हे तत्व लक्षात ठेवावे. यापूर्वी जे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले ते एकदम खाली न येता त्याची पूर्वसूचना मिळाली होती.

आपला पोर्टफोलिओ कसा असावा?

  • अनेकजण आपला गुंतवणूक संच बनवताना त्यात मर्यादित कंपन्या ठेवाव्यात असे म्हणतात पण शेअरबाजाराचा खेळाडू व्हायचे असेल, तर जातीत-जास्त चांगल्या कंपन्या आपल्या संचात हव्यात त्यास संख्येचे बंधन नको. यामुळे धोका अधिक चांगला विभागला जातो. 
  • यातील काही शेअर्सनी परतावा दिला नाही तरी परतावा देणारे शेअर्स होऊ शकणारा तोटा सहन करू शकतील. 
  • यशस्वी गुंतवणूकदारानी आपली फायद्यातील गुंतवणूक प्रत्येक टप्यावर वाढवल्याने त्यांच्या मालमत्तेत प्रचंड वाढ झाली. 
  • हे अधिक चांगल्या प्रकारे अमलात आणण्यासाठी आपल्या गुंतवणूक संचाचे Excel शीट बनवता येईल. 
  • कंपनीचे नाव, मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी, कर्ज भांडवल प्रमाण, बाजारभाव प्रतिशेअर कमाई प्रमाण असे यासारखी गुणोत्तरे त्यात ठेवता येतील. 
  • ही माहिती वेळोवेळी अद्ययावत करून त्यावर लक्ष ठेवून आपली गुंतवणूक वाढवता येईल. 
  • एक समतोल गुंतवणूक संच यातून तयार होईल. गुगल कडून मिळणाऱ्या बाजारभावाशी हे शीट जोडून यातील तपशील आपोआप अद्ययावत होईल असे करता येऊ शकेल.

हे तंत्र फक्त सर्वसाधारण तेजी असेल तर नक्कीच चालेल पण मार्केटमध्ये सतत तेजी राहू शकत नाही मग मंदीच्या कालखंडात पूर्ण गुंतवणूक संच वजा परतावा देत असेल तर काय करायचे? तर संपत्तीवृद्धीच्या पंको मार्गातील सूत्र हेच ज्यात अधिक फायदा (मंदीमध्ये कमीत कमी तोटा म्हणजे फायदा) त्यात गुंतवणूक वाढवायची दीर्घमुदतीची गुंतवणूक करणाऱ्या करू इच्छिणाऱ्या सर्वाना नवीन वर्षांच्या हार्दिक  शुभेच्छा.

उदय पिंगळे

कार्यक्रमाची लिंक:

https://m.youtube.com/watch?v=ohcHkbPvAUU

(श्री. पंकज कोटलवार मोबाईल क्र 94229  65218 माझे मित्र असून त्यांच्या या पद्धतीची सर्वाना माहिती व्हावी या हेतूने हा लेख  लिहिला असून आमच्यात कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Stock Market Investment in Marathi, Share Market Investment Marathi Mahiti, Share market Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…