- प्रत्येक करदात्याने त्याचे प्राप्तिकर विवरणपत्रक (Income Tax Return) अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.
- आयकर रिटर्न नक्की कधीपर्यंत भरायचे, याबाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम दिसून येतो. म्हणूनच प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या देय तारखांविषयी सतत अपडेट राहणं हे नेहमी गरजेचे असते.
- या लेखातून, आपण वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी वैयक्तिक, कंपन्या, LLP आणि फर्म आणि HUF साठी सर्व महत्त्वाच्या आयटीआर फाइलिंग साठीच्या अंतिम तारखा जाणून घेऊयात. (ITR last date 2022)
आयकरानुसार देय तारखेचा अर्थ (Due date for Filing ITR)
- ज्या व्यक्तींचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे त्या व्यक्तींनी प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर आयकर विभागाकडे आयकर विवरणपत्रक भरणे आवश्यक आहे.
- रिटर्न वेळेवर भरणे सुनिश्चित करण्यासाठी, कर विभागाने देय म्हणजेच अंतिम तारीख सुनिश्चित केली आहे. या शेवटच्या तारखेला इन्कम टॅक्स रिटर्ननुसार अंतिम तारीख म्हटले आहे.
- आयकर रिटर्न भरण्याची देय तारीख ही करनिर्धारणाच्या वर्गांवर म्हणजेच कर आकारणीच्या प्रकारांवर अवलंबून असते. उदा. वैयक्तिक, HUF, फर्म, LLP, कंपनी, ट्रस्ट आणि AOP/BOI, इत्यादी.
आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या देय तारखा काय आहेत ?
1. व्यक्ती आणि HUF द्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –
करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) | आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) | ||
वैयक्तिक आणि HUF |
|
३१ जुलै २०२२ | |
|
३१ ऑक्टोबर २०२२ | ||
|
३१ जुलै २०२२ | ||
|
|
हे ही वाचा – ITR भरणे का गरजेचे आहे? – जाणून घ्या ITR भरण्याचे हे ९ फायदे
2. फर्मद्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –
करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) | आर्थिक वर्ष 2021-22 (AY2022-23) | ||
फर्म, LLP, AOP, BOI, AJP, स्थानिक प्राधिकरण, सहकारी संस्था | ऑडिट प्रकरणे [ITR-5] | ३१ ऑक्टोबर २०२२ (ऑडिट अहवाल ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करणे आवश्यक) | |
ऑडिट नसलेली प्रकरणे [ITR-5] | ३१ जुलै २०२२ |
3. कंपन्यांद्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –
करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) | आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) | ||
सर्व कंपन्या [ITR-6] |
|
4. ट्रस्ट, राजकीय पक्ष इत्यादींद्वारे उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –
करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) | आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) | ||
ट्रस्ट, धर्मदाय संस्था, शैक्षणिक संस्था , राजकीय पक्ष | ऑडिट आवश्यक
[ITR-7] नुसार दाखल करणे आवश्यक. |
३१ ऑक्टोबर २०२२
(ऑडिट अहवाल 30 सप्टेंबर 2022 पर्यंत दाखल करणे आवश्यक) |
|
ऑडिट आवश्यक नसल्यास | ३१ जुलै २०२२ |
5. विशेष प्रकरणांमध्ये उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची देय तारीख –
करनिर्धारणाचा वर्ग (Class of assessee) | आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) | ||
92E अंतर्गत नोंदवायचा अहवाल |
|
||
ट्रान्सफर प्रयजिंग बाबतीत प्राप्तिकर रिटर्न सादर करणे | ३० नोव्हेंबर २०२२ | ||
सुधारित परतावा | ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत | ||
उशीरा परतावा | ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत |
विवरणपत्र भरण्यास उशीर झाल्यास व्याज आणि दंड किती आहे?
दंडाची रक्कम
आर्थिक वर्ष 21-22 (AY 2022-23) |
कायद्याचे कलम | |
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास विलंब |
|
234F |
TDS रिटर्न भरण्यास विलंब |
(असा दंड TDS च्या रकमेपेक्षा जास्त नसावा.)
|
234E
271H |
हे ही वाचा – Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..
आयकर विभागातील नवीन सुधारणा पाहता, आयकर भरण्याची अंतिम तारखेची वाट पाहणे यापुढे महागात पडू शकते, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे आता तुम्हाला लवकरात लवकर तुमचा कर वेळेवर भरा आणि आयकर विवरणपत्रक दाखल करा !