Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

Reading Time: 2 minutes

सेवानिवृत्तीनंतर सध्याच्या काळात पेन्शन असणे हे खूप गरजेच ठरलेलं आहे. जे कर्मचारी सरकारी नोकरी करतात किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा असते. परंतु जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांना पेन्शनची सुविधा नसते. म्हणूनच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक कल्याणासाठी आणि त्यांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी सरकार ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) चालवत आहे.

पेन्शनची सुविधा कोणाला उपलब्ध ?

 • असंघटित क्षेत्रातील कामगार, 
 • रिक्षाचालक, 
 • घरगुती कामगार, 
 • बांधकाम कामगार,
 • शेती कामगार, 
 • खाद्य विक्रेते किंवा 
 • इतर अनेक व्यवसायातील कामगार ज्यांना सेवानिृत्तीनंतर पेन्शनची सुविधा नसते त्यांना या योजेअंतर्गत भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी पेन्शनची सुविधा मिळेल.

काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना?

 • ही योजना एक इच्छुक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. 
 • या योजेअंतर्गत आत्ता फक्त २ रुपये प्रतिदिन किंवा ६० रुपये महिना गुंतवणुकीसह वय वर्षे ६० पूर्ण झाल्यानंतर महिना ३,००० रुपये खात्रीशीर पेन्शन मिळेल.
 • या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय वर्षे १८ असेल तर ५५ रुपये दरमहा  भरावे लागेल. 
 • जर अर्जदाराचे वय २५ वर्षे असेल तर ८० रुपये आणि जर ४० वर्षे असेल तर २०० रुपये दरमहा भरावे लागतील.
 • लक्षात ठेवा ह्या योजनेचा फॉर्म भरताना अर्जदाराच्या वयाप्रमाणे तेवढी रक्कम पहिल्या वेळेस सरकारच्या खात्यात भरावी लागते. त्या पुढील महिन्यापासून मात्र अर्जदाराच्या बँक खात्यातून तेवढी रक्कम कट होत जाते.  
 • अर्जदाराचे वय ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपये  किंवा वार्षिक ३६,००० रुपये अर्जदाराच्या खात्यात जमा होतील. 
 • जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनची निम्मी रक्कम म्हणजे १,५०० रुपये ही रक्कम त्याच्या जोडीदाराच्या खात्यात जमा केली जाईल किंवा जोडीदाराला ही योजना सुरू ठेवायची नसेल, तर भरलेली रक्कम व्याजासाकट जोडीदाराला मिळू शकते.

या योजनेसाठी लागणारी पात्रता:

 • या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय १८ व ४० दरम्यान असणे अनिवार्य आहे.
 • अर्जदाराचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
 • आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
 • याशिवाय अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. 
 • जर अर्जदार आयकर भरत असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
 • अर्जदार असंघटित कामगार असणे गरजेचे आहे.

जर तुम्ही या योजनेसाठी इच्छुक व पात्र असाल तर लवकरात लवकर नोंदणी करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

 • तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता.
 • तसेच तुम्ही नोंदींचा फॉर्म घरबसल्या ऑनलाइन देखील भरू शकता.

हे ही वाचा: गृहिणींनी आयटीआर भरणे आवश्यक असते का? 

फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरावा?

 • नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट  https://maandhan.in/shramyogi वर जा.
 • त्यानंतर सेल्फ एनरोलमेंट (स्वतःची नोंदणी) हा पर्याय निवडा, तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारण्यात येईल तिथे मोबाईल नंबर टाका.
 • त्यानंतर तुमचे नाव टाका, तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर नाव नोंदणीचा फॉर्म उघडेल.
 • त्या फॉर्मवर विचारण्यात आलेली वैयक्तिक माहिती भरून त्या फॉर्मची प्रिंट काढा.
 • त्या प्रिंटवर अर्जदाराची सही करून त्या प्रिंटचा फोटो परत त्या वेबसाईटवर अपलोड करा.

महत्वाचा लेख: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे 

अशाप्रकारे, या योजनेसाठी तुमची नाव नोंदणी पूर्ण होईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर नोंदणी करून सेवानिृत्तीनंतर या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेमुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक गरजा भागविण्यासाठी नक्कीच मदत होईल किंवा तुमच्या माहितीतील व्यक्ती जे या योजनेसाठी पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ मिवुळन देण्यास तुम्ही मदत करू शकता. जास्तीत जास्त लोकांनी या सरकरी योजनेचा फायदा घेऊन सेवानिवत्तीनंतर सुद्धा  आर्थिक नियोजन करून ठेवू शकतात. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!