चक्रवाढ व्याज
https://bit.ly/3efaE1P
Reading Time: 3 minutes

चक्रवाढ व्याज माफी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या नवीन योजनेनुसार मार्च ते ऑगस्ट या कालावधीत मोराटोरीयम सुविधा घेतलेल्या कर्जदारांना त्यांच्या कर्जरकमेवर सदर कालावधीसाठी चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार नाही. 

अभूतपूर्व आणि अत्यंत अनपेक्षित अशा कोविड -१९ नामक महाभयंकर संकटाचा सामना करत असताना सामान्य नागरिकांच्या जीवनमानावावर याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. जागतिक, आर्थिक आणि पर्यायाने वैयक्तिक अर्थकारणावर याचा जबरदस्त परिणाम झाला आहे/ होतो आहे.  विस्कटलेली आर्थिक घडी आणि एकूणच बिघडलेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देणारे निर्णय सरकारमार्फत घेण्यात येत आहेत.  असाच एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, “सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्यक्ती आणि एमएसएमई (MSME) संस्थांचे ठराविक कर्ज प्रकारांवरील चक्रवाढ व्याज (compound interest) माफ करण्यात आले आहे.” या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्ज मोराटोरीयम सुविधा –

  • मार्चमध्ये कर्जदारांना कर्जाचा मासिक हफ्ता / कर्जावरील व्याज फेडीसाठी तीन महिने अतिरिक्त कालावधी देण्यात आला होता. यामध्ये क्रेडीट कार्डच्या बाकी रकमांचाही समावेश करण्यात आला होता. 
  • या सवलतीनुसार सदर कालावधीत कर्जरकमेवर बँक कुठलीही दंड रक्कम आकारणार नाही, वसुलीसाठी मागे लागणार नाही आणि “डीफॉल्टर” सुद्धा ठरवणार नाही, तसेच, सिबिल स्कोअरदेखील खराब होणार नाही, असे आरबीआय मार्फत स्पष्ट करण्यात आले होते.
  • याचबरोबर आरबीआयने, कर्जावर व्याज आकारले जाईल व व्याजाला किंवा मुद्दल रकमेच्या परतफेडीला कुठलीही माफी देण्यात येणार नाही  तसेच, विलंब झालेल्या काळासाठीचे व्याज (चक्रवाढ व्याज) द्यावे लागेल, हे देखील स्पष्ट केले होते. 
  • त्यानंतर मे महिन्यामध्ये पुन्हा पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. 

सरकारचा नवीन निर्णय:

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या नवीन योजनेनुसार चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार नाही.
  • या नवीन योजनेस पात्र असणारे कर्ज प्रकार म्हणजे- 
    • एमएसएमई कर्जे, 
    • शैक्षणिक कर्जे, 
    • गृहकर्ज, 
    • कन्झ्युमर ड्युरेबल लोन, 
    • क्रेडिट कार्डची थकबाकी,
    • वाहन कर्ज, 
    • व्यावसायिकांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan to professionals),
    • कनझप्शन लोन  यांचा समावेश आहे. 
  • वर नमूद केलेल्या कर्ज खात्यांमधील कर्जदारांना (१.३.२०२० ते ३१.०८.२०२०) या कालावधीमधील २ कोटीपर्यंतच्या कर्जरकमेवरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्ज देणारी संस्था-

  • या योजनेचा लाभ केवळ खालील संस्थांकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनाच मिळणार आहे. 
    • सरकारी व खाजगी बँक, 
    • सहकारी बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक, 
    • ऑल इंडिया फायनान्शियल संस्था
    • नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, 
    • गृहनिर्माण वित्त संस्था किंवा मायक्रो फायनान्स संस्था 

योजनेमधील महत्वाचे मुद्दे 

१. चक्रवाढ व्याज माफी 

  • सरकारच्या नवीन निर्णयानुसार कर्जदारांना मोराटोरीयमची सुविधा घेतलेल्या कर्जदारांवरचे आर्थिक ओझे कमी होणार असून, मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज रकमेवर सरळ व्याज (Simple interest) द्यावे लागेल. 
  • ज्या कर्जदारांनी थकबाकी वेळेवर भरली असेल त्यांना चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील फरकाची रक्कम (Ex-gratia payment) कर्जदात्याकडून परत करण्यात येईल. 
  • सर्व प्रकारच्या कर्जदारांना यामुळे लाभ होणार आहे, परंतु कर्जमाफीसाठी निवड झालेल्या क्रेडिट कार्डधारकांना याचा सर्वात  जास्त लाभ मिळेल. 

२. कर्जदारांना सरळ व्याज द्यावेच लागणार

  • या योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या कर्ज प्रकारांवरील सरळ व्याज कर्जदारांना भरावेच लागणार आहे. 
  • यासंदर्भात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. केवळ चक्रवाढ व्याजाची रक्कम माफ करण्यात आली आहे.

३. वैयक्तिक कर्जदार तसेच व्यावसायिक कर्जदारांनाही दिलासा

  • कोरोनाचा पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि एकूणच परिस्थितीचा अगदी छोट्या व्यावसायिकांना जबरदस्त फटका बसला आहे. अनेक उद्योगधंदे संकटात आले आहेत.
  • अशा परिस्थितीत सरकारने व्यावसायिकांचा विचार करून काही व्यावसायिक कर्ज प्रकारांचाही सामावेश या योजनेत केला आहे. 
  • या योजनेनुसार मिळणाऱ्या सवलतींमध्ये शिक्षण, गृहनिर्माण, क्रेडिट कार्ड व वाहन कर्ज या वैयक्तिक कर्ज प्रकारांसोबत काही व्यावसायिक कर्ज प्रकारांचा सामावेश करण्यात आल्यामुळे व्यवसायिक कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. 

४. फरकाच्या रकमेची परतफेड

  • बँक अथवा वित्तीय संस्थांनी ५ नोव्हेंबरपर्यंत पात्र कर्जदाराच्या खात्यामध्ये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक जमा करणे आवश्यक आहे.
  • पात्र कर्जदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बँका १५ डिसेंबरपर्यंत सदर रकमेचा दावा सरकारकडे दाखल करु शकतात. 
  • कर्ज स्थगिती माफी योजनेवर सरकारला ६,५०० कोटी रुपये खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. 

चक्रवाढ व्याज, सरळ  व्याज  आणि  परतावा –

कर्ज प्रकार

रक्कम रु. व्याजदर (प्रतिवर्ष) चक्रवाढ

व्याज (रु)

सरळ

व्याज (रु)

परतावा (रु)
गृहकर्ज ३० लाख ७.५०% १,१४,२७२ १,१२,५०० १७७२
वैयक्तिक कर्ज ६ लाख १३% ४०,०७१.६३ ३९,००० १०७१.६३
क्रेडिट कार्ड १ लाख ३६% १९,४०५,६३ १८,००० १४०५.६३

 

– सी.ए .अभिजित कोळपकर 

[email protected]

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. )

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…