Health Insurance – आरोग्य विमा घेणे ही काळाची गरज आहे. आजारपण आणि दुखापतींच्या खर्चामुळे आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. आरोग्याचा खर्च वाढत असताना आरोग्य विमा असणे आवश्यक बनले आहे. पण कधी कधी आरोग्य विमा असतानाही आरोग्य विमा कव्हरेज रुग्णाला मिळत नाही, अशावेळी काय करावे हे मात्र कोणालाही माहित नसते. त्याबद्दलची माहिती आपण खालील लेखातून समजून घेऊयात.
- आरोग्य विमा घेताना माहिती घेणे आवश्यक –
- आरोग्य विमा (Health Insurance) हा आपल्यामधील आणि कंपनीमधील एक करार असतो. यामध्ये प्रीमियम भरल्यानंतर विमा कंपनीकडून वर्षभराच्या कालावधीत विशिष्ट रकमेचा विमा आपल्याला मिळतो.
- आरोग्य विम्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पैशांची चिंता करावी लागत नाही. या खर्चात हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, औषधोपचार, वैद्यकीय चाचण्या आणि इतर संबंधित खर्चाचा समावेश होतो.
- अडचणीच्या वेळेला खर्चाची चिंता न करता आरोग्य विम्यामुळे आपला हॉस्पिटलमधील खर्च कमी होत असतो.
- आरोग्य विमा घेताना प्रीमियममध्ये कोण कोणत्या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे, याची माहिती सर्वात आधी मिळवावी.
- चांगल्या आरोग्य सुविधांचे फायदे –
- आरोग्य विमा (Health Insurance) घेतल्यास आपल्याला अनेक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधेचा फायदा घेता येतो. त्यामुळे पैसे भरण्याची चिंता सतावत नाही.
- आपण आरोग्य विमा सुविधेमुळे इतरही अनेक फायद्यांचा लाभ घेऊ शकता. टेस्ट, वैद्यकीय सेवा या योजनांचा फायदा घेऊ शकता.
- अनेक आरोग्य विमा या अनेक सुविधांसाठी कव्हरेज देत असतात. यामध्ये लसीकरण, आरोग्य तपासणी यांचा समावेश होतो.
- कोरोनानानंतर आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ झाली आहे. कमी वयात आरोग्य विमा घेणे उत्तम ठरते, अशावेळी प्रीमियम कमी भरावा लागतो.
नक्की वाचा – Health Insurance Premium – तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?
आरोग्य विमा खरेदी करताना त्याचे योग्य कव्हरेज घेणे आवश्यक असते. अन्यथा अनेकवेळा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर आरोग्य विम्याचे कव्हरेज कमी पडल्याचे उदाहरण आपण पाहिली असतील.
आपण खालील मुद्यांची माहीत घेऊनच आरोग्य कव्हरेज घेण्याचा निर्णय घ्यावा.
- आपल्या पॉलिसीचे पुनरावलोकन करा –
- आपण आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) घेताना सर्वात आधी नियम आणि अटी वाचूनच निर्णय घ्यावा.
- आपण आरोग्य विमा पॉलिसीचे नियम जाणून घेतल्यास भविष्यात अडचण उद्भवत नाही. आपण किती लोकांसाठी आरोग्य विम्याचे कव्हरेज घेतले आहे आणि ते किती काळासाठी घेतले आहे हे समजून घेतल्यास आरोग्य विमा घेणे सोपे पडते.
- ॲड-ऑन रायडर्सची माहिती घ्या – (Ad On Rider)
- काही आरोग्य विमा प्रतिनिधी हे चांगले ॲड-ऑन रायडर्स पर्याय देतात. त्यामुळे पूर्वीचे कव्हरेज पर्यायापेक्षा चांगले पर्याय आपल्याला मिळू शकतात.
- या अतिरिक्त रायडर्समध्ये विशिष्ट आजार, गंभीर आजार आणि प्रसूती काळजी, ओपीडी खर्च यासारखे अतिरिक्त फायदे आणि कव्हरेजचा समावेश होत असतो.
नक्की वाचा – Health Insurance Premium – तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?
- विशिष्ट आजार आरोग्य विमा योजना –
- तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये विशिष्ट आजार किंवा वैद्यकीय स्थिती कव्हर केली जात नाही.
- अशा प्रकरणांमध्ये रोग विशिष्ट आरोग्य विमा योजना खरेदी करणे आवश्यक असते.
- या योजना विशिष्ट रोग किंवा वैद्यकीय परिस्थितीसाठी कव्हरेज घेण्यासाठी आवश्यक असते.
- या विशिष्ट योजनेमुळे आरोग्यसेवा खर्चात वाढ झाली तरी या योजनेमधून तो पूर्ण केला जातो.
- पर्यायी कव्हरेज मार्ग –
- आपण घेतलेल्या आरोग्य विम्यातून खर्च पूर्ण होत नसल्यास आपण अतिरिक्त पर्याय शोधू शकता.
- आपण आरोग्य विमा प्रतिनिधीमुळे आरोग्य गट विमा, सरकारचे आरोग्य योजना यांची माहिती घेऊन त्याचा फायदा घ्यायला हवा.
निष्कर्ष –
- आरोग्य विमा घेताना सर्वात आधी अटी आणि नियम समजून घ्यावेत. आपण आरोग्य विमा घेताना आजार आणि शारीरिक तपासणी करूनच प्रीमियम घ्यावा.
- आरोग्य विमा हा तरुणपणातच घेणे गरजेचं असते. वय वाढल्यावर आरोग्य विम्याचे प्रीमियम वाढत जातात.