Reading Time: 3 minutes
भांडवलबाजार (capital market) म्हणजे काय?  याविषयी यापूर्वीच एका लेखात आपण  माहिती घेतली असून येथे मध्यम आणि दीर्घ मुदतींच्या कर्जाची देवाणघेवाण होते. अशा तऱ्हेची कर्जे उभारण्याचे विविध मार्ग आहेत.
  • समभागाद्वारे  अत्यल्प मोबदल्यात भांडवल उभारणी होऊ शकते. या समभागांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. सर्वसाधारण समभाग (ordinary shares) आणि प्राधान्य समभाग (preference shares).
  • गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना त्यांची इच्छा असल्यास या भागांची दुय्यम बाजारात विक्री करता येते. अनेक पटींनी उतारा मिळण्याची शक्यता, बाजारभावात होणाऱ्या चढ उतारीतून मिळू शकणारा फायदा, चांगल्या कंपनीतील मालकीहक्काने मिळणारे समाधान, मिळू शकणारा लाभांश, बक्षिसभाग, हक्कभाग इत्यादी अनेक हेतू मनात ठेवून यांची खरेदी विक्री होत असते.
  • भागबाजार रोखेबाजार हे भांडवलाबाजाराचे उपघटक आहेत. यात विविध प्रकारांनी भांडवल अथवा कर्ज उभारणी करण्याचे मार्ग असून त्याद्वारे कंपनीला अल्पखर्चात अथवा कमी व्याजदरात भांडवल/कर्ज उपलब्ध होते. तर त्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूकीचे अनेक पर्याय मिळतात.
  • सर्वसाधारण समभाग: 
    • हे समभाग प्रथमच उपलब्ध होत असतील तर सार्वजनिक विक्रीद्वारे सर्व  गुंतवणूकदारांना उपलब्ध होतात.
    • ते त्याच्या दर्शनी मूल्याने अथवा अधिमूल्याने दिले जातात. सर्वसाधारणपणे हे दर्शनी मूल्य ₹ 1, 2, 5, 10, 20, 50, 100 असे पूर्णांकात कितीही असू शकते.
    • भांडवलबाजार नियामक सेबीच्या मार्गदर्शक तत्वानूसार त्याची विक्री आणि वितरण होते.
    • समभाग विक्री करून कंपनीस भांडवल उपलब्ध झाले की गुंतवणूकदार आणि कंपनी यांचा थेट आर्थिक संबंध राहात नाही.
    • कंपनीस नफा झाला तर त्या अनुषंगाने मिळणारे लाभांश, बोनस, प्राधान्यभाग असे काही फायदे मिळतात. तोटा झाल्यास त्यांची देयता किंवा नुकसान हे समभागांच्या दर्शनी मूल्याएवढेच जास्तीतजास्त असू शकते.
    • बाजारात त्याची काय किंमत राहील हे मागणी पुरवठा यावर अवलंबून असते.
    • कंपनी चांगले कार्य करीत असेल तर अनेकांना असे समभाग आपल्याकडे असावेत असे वाटते त्यामुळे मागणी आणि पर्यायाने बाजारातील किंमत वाढते. मात्र किंमतीत होणाऱ्या चढ उतारीचे हे एकमेव कारण नाही इतर अनेक गोष्टींचा त्यावर प्रभाव पडत असतो.
    • भागधारक कंपनीचे कायदेशीर मालक असल्याने कंपनी कायद्याचे पालन करून भागधारकांना आवश्यक ती वेळोवेळी माहिती देणे झालेला जमाखर्च मंजूर करून घेणे नवीन योजनांना मान्यता घेणे यासारख्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागते.
    • जर अस्तित्वात असलेली एखादी कंपनी भांडवल बाजारात पदार्पण करीत असेल तर अधिमूल्याने समभाग विक्री करून त्यातून मिळालेले पैसे विस्तार योजनेस वापरता येतात. बाजारात जी कंपनी आधीच आहे त्याचे समभाग पुन्हा विक्रीसाठी येत असतील (follow on public offer) कंपनीचे प्रवर्तक (promoter) त्यांची हिस्सेदारी कमी करण्यासाठी सार्वजनिक समभाग विक्री करत असतील (offer for sell) याद्वारे त्यांना विक्री करता येते. यावर बाजारभावासह कोणत्याही गोष्टीची हमी नसते.
    • जर पुन्हा शेअर देताना किंवा कंपनीच्या दुसऱ्या कंपनीचे शेअर बाजारात आणताना काही शेअर राखीव ठेवले असतील तर त्यातील अटींनुसार विद्यमान धारकांना त्याचे हक्कभाग (rights shares) किंवा राखीव समभाग ( reserve quota) मिळू शकतात.

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

  • प्राधान्य समभाग:
    • काही गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा असते. त्यामुळेच काही कंपन्या निश्चित लाभांश देणारे शेअर्स विक्रीस आणतात त्यांना प्राधान्य समभाग म्हणतात.
    • यावर मान्य केलेला लाभांश द्यावाच लागतो. जर लाभांश देण्याएवढी कंपनीची परिस्थिती नसेल तर तो लाभांश संचित ठेवून नंतर देता येतो.
    • हे समभाग जरी बाजारात व्यवहारयोग्य असले तरी यातील उलाढालीचे प्रमाण अत्यल्प आहे.
  • रोखे :
    • समभागाद्वारे गुंतवणूकदारांना मालकीहक्क मिळतो तर रोख्याद्वारे तो कंपनीचा धनको (debiter) होतो. निश्चित अशा व्याजदराच्या अटींसह जी ऋणपत्रे काढली जातात त्यास कर्जरोखे असे म्हणतात.
    • त्यांचा मुदतीवरून(redeemable/non redeemable), व्याज देण्याच्या पद्धतीवरून (cumulative/non cumulative), मालमत्ता तारण ठेवणे न ठेवणे यावरून ( secured/unsecured), समभागांच्यामध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतर करणे न करणे यावरून (fully/partly convertable) अनेक उपप्रकार आहेत.
    • त्यामुळे गुंतवणूकदारांनाही विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. यांची बाजारात खरेदी विक्री करता येत असली तरी तुलनेत उलाढाल कमी आहे.
    • याशिवाय सरकारला दीर्घकालीन योजनांसाठी किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेस कर्जाची तरलता कायम ठेवण्यासाठी पैशांची सातत्याने गरज लागत असल्याने त्यांच्याकडून विविध मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्जरोखे बाजारात आणले जातात.
    • ते निश्चित मुदतीने बांधलेले असल्याने त्यांना बंधपत्रे (bonds) असेही म्हणतात. त्यातही विविध प्रकार असून त्याचे दर्शनी मूल्य सहसा खूप जास्त असल्याने काही अपवाद वगळता त्यांची खरेदी विक्री प्रामुख्याने देशी /विदेशी वित्तसंस्था, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड यांच्याकडून केली जाते.

– उदय पिंगळे

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…