Reading Time: 3 minutes

मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे भारतातील दोन प्रमुख शेअर बाजार असून जवळजवळ सर्वच शेअर्स, रोखे किंवा कर्जरोखे (Debentures) यांचे व्यवहार या दोनपैकी कोणत्यातरी एका बाजारात होतात. हे दोन्ही बाजार मुंबईतच आहेत. यातील मुंबई शेअरबाजार हा आशियातील सर्वात जुना शेअरबाजार आहे, त्याची स्थापना १८७५ साली झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराची स्थापना १९९२ साली झाली. सध्या दोन्ही शेअरबाजारात १००% व्यवहार संगणकामार्फत होतात. या दोन्ही बाजारातील साम्य आणि फरक खालीलप्रमाणे–

 • मुंबई शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील ३० प्रमुख कंपन्यांच्या व्यवहारास उपलब्ध समभागांच्या उलाढाल आणि बाजारमूल्य यावर आधारित निर्देशांक असून त्यास सेन्सेक्स असे म्हणतात तर अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअरबाजारातील ५० कंपन्या असलेल्या निर्देशांकास निफ्टी असे म्हणतात.
 • मुंबई शेअरबाजार हा जगातील सर्वात मोठा असा १० नंबरचा शेअरबाजार असून राष्ट्रीय शेअरबाजार ११ व्या स्थानी आहे.
 • मुंबई शेअरबाजाराचे ३० नोव्हेंबर २०१८ रोजीचे बाजारमूल्य २,०५,६०० कोटी अमेरिकन डॉलर होते तर राष्ट्रीय शेअरबाजाराचे त्याच दिवशीचे बाजारमूल्य २,०,३००० कोटी अमेरिकन डॉलर एवढे होते. मुंबई शेअर बाजाराची मासिक उलाढाल २१,००० कोटी अमेरिकन डॉलर असून राष्ट्रीय शेअरबाजाराची मासिक उलाढाल १९,६०० कोटी अमेरिकेन डॉलर आहे.
 • मुंबई शेअरबाजारात पाच हजारहून अधिक कंपन्यांची नोंदणी झाली असून राष्ट्रीय शेअरबाजारात १९०० अधिक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे.याशिवाय विविध कंपन्यांच्या कर्जरोख्यांची नोदणी करण्यात आली आहे.
 • मुंबई शेअर बाजाराची स्थापना ब्रोकर्स असोसिएशन म्हणून झाली. सन १९५६ च्या सिक्युरिटीज काँट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्टद्वारे त्यास सन १९५७ मध्ये कायदेशीर मान्यता देण्यात आली. येथील सौदे कागदी प्रमाणपत्रांच्या साहाय्याने होत असत. सन १९९५ पासून सर्व सौदे संगणकाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होवू लागले.
 • या असोसिएशनचे टप्याटप्याने सार्वजनिक कंपनीत रूपांतर होऊन आता तर BSE चे शेअर्स खरेदी विक्रीस उपलब्ध आहेत. अनेक उपकंपन्या स्थापून धोका व्यवस्थापन, मार्केट डेटा सर्व्हिस , डिपॉझिटरी सर्व्हिसेस या क्षेत्रांत त्यांनी व्यवसायास सुरुवात केली आहे.
 • राष्ट्रीय शेअरबाजाराची स्थापनाच सर्व व्यवहार कागद विरहित संगणकामार्फत आणि पारदर्शक व्हावेत या हेतूनेच सन १९९२ साली झाली आणि सन १९९४ पासून त्यामुळे गुंतवणूकदारांना कोठूनही असे व्यवहार करण्याची संधी प्रत्यक्षात प्राप्त झाली. याचे समभाग सर्वसाधारण गुंतवणूकदारांना लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 • मुंबई शेअरबाजारात नोंदणीकृत शेअर्सची संख्या जास्त त्यामानाने उलाढाल कमी तर राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदणीकृत शेअर्सची संख्या कमी पण उलाढाल जास्त त्यामुळे तेथे अधिक चांगला खरेदी किंवा विक्री भाव मिळण्याची शक्यता असते. दोन्हीकडे  नोंदवण्यात आलेल्या शेअर्सबाबत ही शक्यता आहे.
 • कंपनी कायद्याप्रमाणे ज्यांचे व्यवहार देशभरातून कोठूनही करता येतील अशा एका बाजारात नोंदवणे गरजेचे आहे. त्यामुळे यातील एकाच बाजारात नोंदवलेल्या शेअर्सची खरेदी विक्री त्याच बाजारात करता येते. सर्व व्यवहार T+2 या पद्धतीने म्हणजे व्यवहार झाल्यापासून त्याचे पैसे अथवा शेअर मिळण्यास २ कामाचे दिवस लागतील या पद्धतीने होतात आणि शेअरबाजाराची त्यास हमी असून सेबी या भांडवल बाजार नियंत्रकाचे त्यावर लक्ष असते.
 • सध्या डे ट्रेडिंग करताना ज्या बाजारातून शेअर खरेदी केले तेथेच ते विकावे लागतात किंवा विक्री केल्यास तेथूनच खरेदी करून द्यावे लागतात. तसे तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही बाजारातील शेअर्स या शेअर्सची नोंदणी असलेल्या कोणत्याही बाजारात खरेदी करता येणे अथवा विकता येणे शक्य असून सध्या उपलब्ध नसलेली ही सेवा दोन्ही बाजारात लवकरच उपलब्ध होऊ शकते.
 • हे दोन्ही शेअरबाजार हे भारतीय भांडवल बाजाराचे प्रतिनिधित्व करतात येथे समभाग, कर्जरोखे,  रोखे यांची नोदणी होऊन त्यांचे यातील समभाग, निर्देशांकाचे रोखीचे आणि भविष्यातील व्यवहार केले जातात. येथे रोज प्रचंड मोठया प्रमाणावर उलाढाल होत असल्याने मोठया स्वरूपात कररूपाने सरकारला महसूल मिळत असतो. त्यामुळेच या बाजारावरील लोकांचा विश्वास वाढावा असा प्रयत्न सरकारकडून केले जातात. हे बाजार सुस्थितीत असणे हे भारत प्रगतीपथावर असल्याचे लक्षण समजले जाते.

भारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.

– उदय पिंगळे

शेअर्सची साधी बदलती सरासरी , विशेष बदलती सरासरी

शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.