Reading Time: 3 minutes

म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दिवसेंदिवस जास्त पसंतीचा होऊ लागल्यानंतर, SEBI ही वारंवार त्यात नवनवीन नियमावली आणून गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत बदल करत असते. १ जानेवारी २०१३ पासून असाच एक बदल लागू झाला, तो म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी दोन पर्याय उपलब्ध झाले. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार दोन पद्धतींनी गुंतवणूक करू शकतात – एक म्हणजे डायरेक्ट प्लॅन आणि दुसरे म्हणजे रेग्युलर प्लॅन.

१) डायरेक्ट प्लॅन:–

या प्रकारची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला स्वतःच अभ्यास करून प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा अन्य संकेतस्थळांचा आधार घेऊन, माहिती घेऊन गुंतवणूक करावी लागते. म्युच्युअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये फंडाचा ‘एक्स्पेन्स रेशो’ कमी असतो. त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्यही (एनएव्ही) वेगळे असते.

२) रेग्युलर प्लॅन:–

या प्रकारची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला एखाद्या आर्थिक सल्लागारामार्फत गुंतवणूक करावी लागते. म्युच्युअल फंडाच्या रेग्युलर प्लॅनमध्ये फंडाचा ‘एक्स्पेन्स रेशो’ हा डायरेक्ट प्लॅनपेक्षा थोडा जास्त असतो. पण या ठिकाणी सल्लागाराकडून गुंतवणूकदाराला सेवा मिळू शकते. आर्थिक सल्लागार आपल्याला कायम मदत करीत असतो.

२०१३ च्या सुरुवातीच्या काळात कंपन्या तसेच संस्थांच्या गुंतवणुकीला या नियमावलीचा फायदा झाला. या प्रकारच्या गुंतवणूकदारांकडे स्वतःची संशोधन करणारे तज्ञ विश्लेषकांची टीम असल्याने , तसेच त्यांची गुंतवणूक रक्कम फार मोठी असल्याने त्यांना या डायरेक्ट प्लॅनचा चांगला फायदा झाला. २०१३ सालापासून म्युच्युअल फंडची मालमत्ता जोमाने वाढू लागली तशी डायरेक्ट प्लॅनमधील कंपन्या व संस्था यांचे गुंतवणुकीचे प्रमाणही वाढू लागले.

अशा वेळी काही सामान्य गुंतवणूकदारांनी ही ‘एक्स्पेन्स रेशो’मधील आणि ‘एनएव्ही’मधील थोडा फरक वाचविण्यासाठी ‘डायरेक्ट प्लॅन’मधील गुंतवणुकीला पसंती द्यायला सुरवात केली.

  • ‘डायरेक्ट’प्लॅन म्हणजे तुमचा म्युच्युअल फंड सल्लागार जे काही करतो ते सगळे तुम्हीच करायचे. कोणत्या योजनेत पैसे गुंतवायचे हे तुम्हीच ठरवायचे. त्याचा अभ्यास तुम्हीच करणे अपेक्षित आहे. एकदा योजना ठरली की म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवरून फॉर्मची प्रिंट घ्यायची, फॉर्म भरायचा, चेक जोडायचा आणि रजिस्ट्रारच्या (कार्वी किंवा कॅम्सच्या) कार्यालयात किंवा म्युच्युअल फंडच्या कार्यालयात नेऊन द्यायचा. ऑनलाइन म्युच्युअल फंड खरेदी-विक्री (म्युच्युअल फंडाच्या साइटवर) करणे शक्य आहे. त्याकरिता एकदाच ‘आय-पिन’ मागवणे वगैरे सर्व तुम्हीच करायचे.  
  • पाच वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत तुम्ही पैसे गुंतवलेत तर त्या पाच फंडांच्या वेबसाइटवर जाणे, पासवर्ड /पिन वापरून व्यवहार करणे, ही तुमची जबाबदारी असते. फंड स्टेटमेंट वेळेवर आले नाही तर डुप्लिकेट मागवणे, फंडने एखादी चूक केल्यास ती निस्तरणे ही कामे गुंतवणूकदारांनी करायची असतात. यानंतर ठराविक कालावधीने त्याचा आढावा घेणे, योजनेतून बाहेर कधी पडायचे, दुसऱ्या योजनेत ‘स्वीच’कधी करायचे, आदी सर्व गोष्टी संबंधित गुंतवणूकदारालाच ठरवाव्या लागतात.
  • हे सर्व करताना आपल्यावर मानसिक तणाव येणार नाही हे ही पाहावे लागते. हे सगळे फारसे कठीण आहे असेही नाही. म्युच्युअल फंडांचे ज्ञान घेऊन या आकडेवारीचा योग्य उपयोग करता आला तर डायरेक्ट प्लॅन तुमच्यासाठी आहे. मग काही सामान्य गुंतवणूकदार फंडांचा फक्त मागील परताव्याची क्रमवारी बघून डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूक करू लागले.
  • त्यातच डायरेक्ट प्लॅन मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याच्या सेवा पुरविणारे मोबाईल अँप एकामागोमाग एक आले. हे मोबाईल अँप गुंतवणूकदारांना वापरण्यास सोपे वाटू लागले आणि ते त्याकडे आकर्षित होऊ लागले. हे अँप जरी डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूक सेवा देत असले तरी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये लपलेली किंमत असते, ती गुंतवणूकदारांना वरवर दिसत नाही. हे मोबाईल अँप गुंतवणूक करण्यास सोपे वाटत असले तरी पूर्ण सल्ला सेवा देत नाही.
  • गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या चढत्या काळात ‘एनएव्ही’च्या फरकातील थोडा अधिक फायदा मिळवल्याच्या आनंदात होते . मात्र बरेच गुंतवणूकदार बाजाराच्या चढ-उताराच्या काळात म्हणजेच गेल्या १८-२० महिन्यातील बाजारातील घसरणीला घाबरून गेले आणि त्यांची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू प्रमाणे झाली. जोमाने डायरेक्ट प्लॅनमध्ये उडी तर घेतली मात्र बाजारातील घसरणीच्या काळात कोणती काळजी घ्यावी? आपले ‘ऍसेट एलोकेशन’ कसे असावे? याचे ज्ञान बऱ्याच गुंतवणूकदारांना नसल्याने बरेचसे गोंधळून गेले.
  • महाभारतात अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा होता, तरी जर श्रीकुष्ण सारखा सारथी नसता तर कदाचित अर्जुन यशस्वी होऊ शकला नसता. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी असावी, तसा प्लॅन करताना गुंतवणूकदाराने योग्य सल्लागार नेमावा. असा आर्थिक सल्लागार ज्याच्याकडे बाजारातील चढ-उताराचा कमीतकमी एक दोन कालखंडाचा अनुभव असेल. सर्व प्रथम आपला सल्लागार अनुभव, ज्ञान तसेच तंत्रज्ञाच्या दृष्टीने सक्षम आहे की नाही ते पाहावे. अशा अनुभवी सल्लागाराने दिलेला सल्ला, त्याने करून दिलेली गुंतवणुकीची मांडणी याचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो.
  • तुमच्या गुंतवणुकीच्या नियोजनात एक सल्लागार हा तुमचा संपत्ती निर्माण कार्यात तुमचा सारथी म्हणून कायम तुमच्या हाकेला हजर असतो. तो तुमच्या गरजेनुसार, उद्दिष्टानुसार योग्य ती गुंतवणूक योजना सांगतो; तसेच त्याचे तुमच्या गुंतवणुकीवर लक्षदेखील असते. शिवाय वेळोवेळी त्या गुंतवणुकीबाबत तो तुम्हाला मार्गदर्शनही करीत राहतो. यासाठी तो स्वतः खूप मेहनत घेत असतो.
  • गुंतवणूक सल्लागार निरनिराळ्या सेमिनार्समध्ये भाग घेऊन, तसेच फंड मॅनेजर्सच्या संपर्कात राहून आपल्यासाठी माहिती गोळा करीत असतो. तो आपली सेवा अधिक सक्षम करण्याकरिता तंत्रज्ञानावर गुंतवणूक करीत असतो. केवायसी , नॉमिनेशन, पत्ता बदल, बँक खाते बदल, फंडाची स्टेटमेंट्स , कर  बचतीचा सल्ला, तसेच अशा प्रकारच्या विविध सेवांवर बारकाईने लक्ष ठेवून गुंतवणूकदारांना तणावमुक्त ठेवतो. या सर्व कामासाठी जर तुमच्या आर्थिक सल्लागाराला ०.३०% ते ०.९०% पर्यंत जर म्युच्युअल फंडकडून परस्पर दलाली किंवा फी मिळाली तर गुंतवणूकदाराने नाराज होण्यासारखे काही नाही. कारण तुमचा सक्षम सल्लागार तुम्हाला या फी पेक्षा जास्त फायदा हा आपल्या गुंतवणुकीतील परताव्याच्या रूपाने  मिळवून देत असतो.
  • गेल्या काही महिन्यात सेबीने (SEBI) म्युच्युअल फंडचा ‘एक्सपेन्स रेशो’ आणखी कमी केला, अशावेळी आता डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन मधील एनएव्ही फरक हा खूप कमी झाला आहे. त्यामुळे डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करून चढ उताराच्या काळात आपले नुकसान करून घेण्यापेक्षा चांगल्या सल्लागाराची निवड करून आपले दीर्घकालीन ‘वेल्थ क्रिएशन’चे उद्दिष्ट साध्य करावे.

– निलेश तावडे – ९३२४५४३८३२

[email protected]

(लेखक हे २० वर्षे म्युच्युअल फंडात कार्यरत होते, सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत).

 एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय , म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

म्युचुअल फंड गुंतवणूक आणि सेबीचे नवीन नियम , म्युचुअल फंड युनिट आणि करदेयता

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…