क्रेडिट कार्ड्स ‘कोणी’ घेऊ नयेत?
आजच्या या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात अनेकजण अगदी बिनधास्त क्रेडिट कार्ड्स वापरतात आणि महिन्याच्या शेवटी सगळे पैसे उधळून बसतात. खरंतर क्रेडिट कार्ड्स लोकांच्या सोयीसाठी, अडीअडचणीला अचानक पैशांची गरज पडली तर किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल आणि त्यावेळी तेवढे पैसे उपलब्ध नसल्यास ऐनवेळी वापरता यावे अशा कारणांसाठी उपयोगी पडते. परंतु लोक क्रेडिट कार्डला आता इतके गृहीत धरू लागले आहेत की त्याचा वापर करताना फार काही विचार केला जात नाही. अशा वेळी काही ठराविक लोकांनी स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी क्रेडिट कार्ड्स पासून दूरच राहिलेले बरे.
क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया
क्रेडिट कार्ड्स ‘कोणी’ घेऊ नयेत?
१. ‘शॉपिंग’वेडे:
- अशा व्यक्ती ज्यांना खरेदीचा खूप नाद आहे. जे खर्च करताना अजिबात विचार करत नाहीत अशांसाठी क्रेडिट कार्ड ‘डोक्याला ताप’ ठरू शकतो.
- क्रेडिट कार्ड वापराच्या नादात ते केव्हा त्याच्या कर्जात बुडतात ते त्यांचे त्यांनाही समजत नाही. मग त्या कर्जाचे दुष्टचक्र कायम चालूच राहते आणि त्यामध्ये खूप मोठे नुकसान होत असते.
- ज्यांना कोणाला आर्थिक शिस्त आणि पैशांच्या योग्य व्यवस्थापनाची सवय नाही, त्यांनी क्रेडिट कार्ड पासून दूर राहणंच भल्याचं आहे.
२. बिलामधील केवळ “मिनिमम ड्यू” ची रक्कम भरणारे:
- क्रेडिट कार्ड बिलामध्ये ग्राहकांना व्याज लागू नये म्हणून कमीत कमी रक्कम भरण्याची सोय असते.
- यामध्ये क्रेडिट कार्ड कंपनीचाच अप्रत्यक्षपणे फायदा असतो. कारणकमी पैसे भरावे लागत असल्यामुळे ग्राहक वारंवार कार्डचा वापर करतात आणि कर्जबाजारी होतात.
- क्रेडिट कार्ड बिलातून मिळणाऱ्या व्याजावरच या क्रेडिट कार्डच्या कंपन्या चालतात. त्यामुळे सतत क्रेडिट कार्डवर अवलंबून असणाऱ्यांनी आणि वेळेवर सर्व परतफेड करण्याची शिस्त नसलेल्यांनी क्रेडिट कार्ड पासून लांब राहावे.
क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर
३. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणारे:
- जे आपल्या दैनंदिन गरजांसाठीदेखील क्रेडिट कार्डचा वापर करतात बऱ्याचदा महिना अखेरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये खडखडाट झालेला असतो.
- अशावेळी ते सततच्या कर्जाच्या आणि व्याज भरण्याच्या सापळ्यात अडकतात आणि फसतात.
४.बिल भरण्यात अनियमित असणारे:
- वेळेवर बिल भरायची सवय नसेल आणि क्रेडिट कार्डच्या पैशांचा परतावा करण्यास उशीर झाला, तर या कंपन्यांकडून भरमसाठ व्याज तुमच्याकडून वसूल केले जाते.
- पैसे भरण्याची शेवटची तारीख चुकल्यामुळे अनेकजणांना खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळेत बिल भरायची सवय नसणाऱ्यांनी क्रेडिट कार्डच्या विषयात पडूच नये.
- यामुळे क्रेडिट स्कोअर खाली येतो आणि भविष्यात एखाद्या महत्वाच्या कारणासाठी कर्ज काढायचे असल्यास त्याला सहजासहजी परवानगी मिळू शकत नाही.
क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?
५. कर्जबाजारी व्यक्ती :
- आधीपासूनच वैयक्तिक कर्ज खाती किंवा अनेकविध क्रेडिट कार्ड्स असणाऱ्या व्यक्तीना विनाकारण खूप खरेदी करायची सवय असते.
- महिना अखेरीस जेव्हा हे पैसे भरायची वेळ येते तेव्हा मात्र अगदी मोठ्या संकटात पडल्यासारखी अवस्था होते.
- पैसे वेळेत न भरू शकल्याने खूप जास्त कर्जाचा डोंगर वाढत जातो.
६.निष्काळजी लोक :
- ज्यांना आपल्या वस्तूंची काळजी घेणे, त्या कुठे आहेत हे लक्षात ठेवणे अवघड वाटते त्यांनी तर क्रेडिट कार्डचा विचार न केलेलाच बरा.
- समजा त्यांनी क्रेडिट कार्ड स्वाईप करून काही खरेदी केली आणि ते कार्ड घेण्याचे विसरले, तर मात्र अशा व्यक्ती फार मोठ्या संकटात अडकू शकतात.
क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!
७. ज्यांना कार्ड्स वापरायची सवय नाहीये:
- ज्यांना कार्ड्स वापरायची सवय नाहीये अशा लोकांनी विनाकारण क्रेडिट कार्ड्स घेऊन ठेऊ नयेत.
- अनेकदा न वापरात असलेल्या कार्ड्समुळे देखील तुमचा क्रेडिट स्कोअर देखील खालावू शकतो.
अशा प्रकारे, जर तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल, तर निवड करण्यापूर्वी या सर्व गोष्टी विचारात घ्या.
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Mi kredit Card gheu ka?, Credit Card Marathi Mahiti, Credit Card Koni ghyave? Marathi Mahiti, Mi credit Card gheu ka? Marathi Mahiti, Credit card ineligibility in Marathi