Asset Allocation: मालमत्ता विभाजन
“Not the funds but the correct asset allocation gets you the return.” असे गुंतवणूक गुरु सांगतात. मालमत्ता विभाजन म्हणजे आपल्या गुंतवणूक गरजा आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता लक्षात घेऊन वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करून जोखीम आणि परतावा संतुलित करणे होय.
इतर लेख: SIP Investment: एसआयपी गुंतवणूक करून आपली आर्थिक उद्दिष्टे साकार करा!
Asset allocation: मालमत्ता विभाजन का महत्वाचे?
- समभाग (इक्विटी) , निश्चित उत्पन्न (बॉंड एफडी) आणि जिन्नस हे प्रमुख मालमत्ता प्रकार आहेत.
- वित्तीय सल्लागार नेहमीच असे सांगतात की आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्यात गुंतवणूकदारांची वेगवेगळी वित्तीय ध्येये असतात. उदा. घर घेणे, परदेशात सुट्टी व्यतीत करणे मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे विवाह, सेवानिवृत्तीचे नियोजन, इत्यादी.
- जीवनाच्या या वेगवेगळ्या टप्प्यात जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि रोकड सुलभता सारखी नसते. वर उल्लेख केलेल्या विविध उद्दिष्टांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकीची आवश्यकता असू शकते.
- मालमत्ता विभाजन आपली भिन्न आर्थिक उद्दिष्टे वित्तीय बाजारपेठेच्या अनिश्चिततेपासून संरक्षण करते तसेच प्रत्येक उद्दीष्ट साध्य करण्यात योग्य मालमत्ता विभाजन मदत करते. म्हणून मालमत्तेचे योग्य विभाजन केले पाहिजे.
- दुर्दैवाने बहुसंख्य गुंतवणूकदार उच्च परतावा देणाऱ्या मालमत्तांच्या पाठी पडलेले दिसतात.
- समभाग हा सर्वात अस्थिर मालमत्ता वर्ग आहे, परंतु गुंतवणूकीच्या दीर्घकालावधीत अव्वल परतावा देण्याची क्षमता या गुंतवणूक साधनांत आहे.
- थेट समभाग किंवा समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाचे प्राथमिक गुंतवणूक उद्दीष्ट भांडवली वृद्धी हे असते.
- समभाग गुंतवणूक ही दीर्घकालीन वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी असते.
- थेट समभाग किंवा समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडासाठी (इथून पुढे समभाग) गुंतवणूकीचा कालावधी किमान ५ वर्षे असणे आवश्यक असते.
- समभाग गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांचा जोखीमांक किमान समतोल, थोडा साहसी किंवा व उच्च जोखम असलेला साहसी असणे आवश्यक आहे.
- समभाग टोकाचे अस्थिर असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी समभाग आणि बाजाराचे वर्तन जाणून घेणे आवश्यक आहे.
- समभाग गुंतवणुकीच्या तुलनेत स्थिर उत्पन्न किंवा रोख्यांची अस्थिरता कमी असते, परंतु सामान्यत: दीर्घ मुदतीमध्ये समभाग गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो.
- रोखे फंडांमध्ये विविध प्रकार आहेत जसे की रात्रभर पैसे गुंतविण्यासाठी ‘ओव्हर नाईट’ फंडांपासून केवळ २५ वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणारे फंड.
- या फंडांमधील प्राथमिक गुंतवणूकीचे उद्दीष्ट नियमित उत्पन्न असले तरी म्हणजे व्याजदर खाली आल्यास भांडवली नफा आणि वर गेल्यास भांडवली नुकसान सहन करावे लागते. यासाठी आपल्या वित्तीय ध्येय साध्या करण्यास उपलब्ध कालावधी नुसार फंडाची निवड करणे आवश्यक असते.
हे नक्की वाचा: गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?
रोखे फंड गुंतवणुकीत मुख्यत्वे दोन प्रकारच्या जोखमींना गुंतवणूकदाराला सामोरे जावे लागते.
- पहिली जोखीम वर उल्लेख केल्यानुसार व्याजदर समन्धित जोखीम ज्याला गुंतवणूक परिभाषेत ड्युरेशन रिस्क म्हणतात.
- दुसरी जोखीम वेळेवर व्याज आणि मुदतपूर्ती नंतर मुद्दल परत मिळण्याची जोखीम ज्याला गुंतवणूक परिभाषेत क्रेडीट रिस्क असे म्हणतात.
- रोखे गुंतवणुकीचे उद्दिष्ट केवळ नियमित उत्पन्न नसून रोकड सुलभता राखत बँक बचत खात्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळविणे हे देखील असते.
लिक्विड फंड हा फंड प्रकार अतिशय गुंतवणूकदार प्रिय फंड प्रकार असून किमान ७ दिवसांपासून ते दीर्घ-कालावधी पर्यंत या फंडात गुंतवणूक करता येते. या फंडाचा उद्देश रोकड सुलभता राखणे हा आहे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचे सेबीने कालावधी आणि गुंतवणूक प्रकारानुसार वेगवेगळ्या १६ श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. सेबीने केलेले हे पाऊल गुंतवणूकदारांना योग्य प्रकारचा फंड शोधण्यात मदत करण्यासाठी केलेलं आहे. येथे आम्ही लिक्विड म्युच्युअल फंडांचे अन्वेषण करणार आहोत आणि गुंतवणूकीपूर्वी तुम्हाला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
संबंधित लेख: मूल्य आधारित गुंतवणूक – समृद्धीचा महामार्ग
पुढील भागात मालमत्ता विभाजनाच्या पद्धती जाणून घेऊ.
श्री. वसंत माधव कुलकर्णी
(श्री. वसंत माधव कुलकर्णी यांना २५ वर्षांचा गुंतवणुक संशोधन आणि व्यवस्थापनाचा अनुभव आहे. व्यक्तिगत गुंतवणुक व्यवस्थापन या विषयावर ते त्यांची मते वेगवेगळया माध्यमातुन व्यक्त करीत असतात.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Title: Why Asset allocation is important?
Web search: Asset allocation in Marathi, importance of Asset allocation in Marathi, Asset allocation Marathi Mahiti, Asset allocation Marathi