Arthasakshar SIP Investment एसआयपी गुंतवणूक
https://bit.ly/2DPbDaw
Reading Time: 4 minutes

एसआयपी गुंतवणूक (SIP Investment)

म्युच्युअल फंडच्या प्रमुख पर्यायांमध्ये ‘एसआयपी गुंतवणूक (SIP Investment) हा लोकप्रिय व सुरक्षित पर्याय आहे. भविष्यात ठरवलेली काही आर्थिक उद्दिष्टे किंवा स्वप्ने आपल्याला अशक्य वाटू शकतात. पण त्यादृष्टीने सुरूवातीपासूनच प्रयत्न केल्यास तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. जेव्हा आपण भविष्यासाठी सकारात्मक दृष्टीने आर्थिक नियोजन करू तेव्हा आपण आपली उद्दिष्ट्ये सहज साध्य करू शकता. त्यासाठी आर्थिक गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे.

हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

म्युच्युअल फंड – गुंतवणूकीचा लोकप्रिय पर्याय 

  • शेअर बाजारातील अस्थिरता, मालमत्तेच्या घसरलेला किमती या गोष्टींमुळे हल्ली म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांनी पहिली पसंती दिली आहे. हा सध्याचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. 
  • गुंतवणुकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, यासारखी  उद्दिष्टे म्युच्युअल फंडाद्वारे साध्य करू शकतात. 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी : 

  • म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करण्यासाठी केवायसी (KYC) फॉर्म भरणे अनिवार्य आहे. 
  • यासाठी तुमचा पासपोर्ट साईझ फोटो, आधार कार्ड पॅन कार्ड, विजेच्या बिलाची झेरॉक्स, बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे असणं आवश्यक आहे. 
  • केवायसीबाबत जाणून घेण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडाच्या कंपनीच्या संकेतस्थळांची मदत घेऊन शकता.

योग्य म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? 

  • वर्तमानकाळातील उत्पन्नाच्या आधारे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडाची निवड करतात. 
  • सध्या बाजारात फंडाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यापैकी योग्य म्युच्युअल फंडाची निवड नेमकी कशी करायची ते जाणून घेणे आवश्यक आहे. 
  • नवीन गुंतवणूकदारांनी जोखीम, आर्थिक उद्दिष्ट आणि वेळ लक्षात घेऊन म्युच्युअल फंडाची योजना आखली पाहिजे. काही वेबसाईट्स तसेच, आर्थिक सल्लागार याबाबत विशेष मार्गदर्शन करतात. 
  • कमी मुदतीच्या म्हणजे एक ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर कर्ज किंवा बँकेच्या ठेवी हा उत्तम पर्याय आहे. जर गुंतवणूक पाच ते सात वर्षांसाठी करायची असेल तर इक्विटी फंडाची निवड करू शकता. दीर्घकालीन गुंतवणूकीवर परतावाही जास्त मिळतो. 
  • मोठी आर्थिक उद्दिष्टे व स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियमित व दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड निवडताना “एसआयपी” या पर्यायाची निवड करू शकता. 

“एसआयपी” गुंतवणूक करताना या ५ चुका टाळा

एसआयपी गुंतवणूक – वैशिष्ट्ये (Features of SIP Investment)

1. गुंतवणूकीची शिस्तबद्ध पद्धत 

  • आर्थिक शिस्त व नियमित गुंतवणूकीची सवय लागण्यासाठी ‘एसआयपी’ ही एकमेव पर्याय आहे. 
  • एसआयपी सुरू केल्यानंतर आपल्या खात्यातून दर महिन्याला एक आपण ठरवल्याप्रमाणे एक निश्चित रक्कम डेबिट करण्यात येते. म्हणूनच आर्थिक शिस्त व नियमित गुंतवणूकीसाठी एसआयपीचा पर्याय निवडावा.

2. एसआयपीद्वारे आर्थिक उद्दिष्ट्ये गाठणे 

  • प्रत्येकाची काही स्वप्न असतात, आर्थिक उद्दिष्टे असतात. ही स्वप्नं सत्यात आणण्यासाठी त्यादृष्टीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. 
  • नियमित गुंतवणूकीची सवय व शिस्त लागण्यासाठी “एसआयपी” हा योग्य पर्याय आहे. नियमित उत्पन्न मिळत असेल, तर केव्हाही एसआयपी सुरू करता येते. यामध्ये जोखीम  अतिशय कमी असते. 
  • उदाहरणार्थ, जर तुमचं वय २० ते ३० वर्ष दरम्यान आहे. सेवानिवृत्तीवेळी  तुम्हाला  ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त  परतावा  हवा असेल, तर तुम्हाला ‘एसआयपी’द्वारे हे शक्य होऊ शकेल. यासाठी महिना ५,००० रू ची ‘एसआयपी’ गुंतवणूक केली तर १२℅ व्याजदराने ३० वर्षांत तुमच्या खात्यात ५० लाख जमा होऊ शकतात. 

म्युच्युअल फंड सही कितने?

3. रूपयाच्या किमतीची सरासरी 

  • शेअर बाजाराचं  उदाहरण घेतलं, तर तिथे रुपयाची सरासरी किंमत कमी झाली की बराच तोटा होऊ शकतो. 
  • पारंपारिक पद्धतीनुसार जेव्हा मार्केट व्हॅल्यू कमी असते त्यावेळी शेअर्स घेऊन ठेवले जातात व मार्केट व्हॅल्यू वाढल्यावर त्यातून नफा मिळवता येतो, मात्र यासाठी या किमतीतील चढउतारांवर कायम लक्ष असायला हवं. 
  • बाजारातील अस्थिरतेमुळे जास्त प्रमाणात नुकसानही होऊ शकते. याबाबतीत प्रत्येक वेळी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. 
  • म्युच्युअल फंडात नियमितपणे एसआयपी करून तुम्ही निश्चिंत राहू शकता. जेव्हा किंमत कमी असेल तेव्हा म्युच्युअल फंडाची वेगवेगळी युनिट्स खरेदी करता येतात. जे दीर्घकाळासाठी फायदेशीर असू शकते. 

4. गुंतवणूकीची लवचिकता 

  • एसआयपी द्वारे गुंतवणूक केल्यास तुम्ही आपले आर्थिक ध्येय किती काळात गाठू शकता यानुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडता येतात. 
  • जर सेवानिवृत्तीची सोय म्हणून गुंतवणूक करत असाल, तर ते एसआयपी चा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. 
  • आपलं उद्दिष्ट पुढच्या १ वर्षात पूर्ण होण्यासारखं असेल, तर अल्ट्रा-शॉर्ट-टर्म फंडात एसआयपी करू शकतात. 
  • गुंतवणूक योग्य नियोजन केलं तर स्मॉल-कॅप , मिडल-कॅप, लार्ज-कॅप यासारखे पर्यायही उपलब्ध आहेत. 

एसआयपी(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

5. थेंबे थेंबे तळे साचे 

  • एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे एकाचवेळी खूप पैसे असावेत असं काही काही. तुम्ही महिन्याला अगदी ५००-१००० पासून देखील सुरू करू शकता. 
  • नुकतीच नोकरी लागलेला एखादा तरुण /तरूणीसुद्धा या पर्यायाद्वारे आपली गुंतवणूक सुरू करू शकता. हीच एसआयपी बाबतची सर्वात चांगली गोष्ट आहे. 
  • आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी एसआयपी द्वारे तुम्हाला परवडणारे पर्याय निवडून नियमित गुंतवणूक करू शकता. 

6. चक्रवाढ व्याजाची जादू 

  • जेव्हा आपण जास्त काळासाठी गुंतवणूक करतो तेव्हा होणारा गुंतवणुकीवरील फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. 
  • याचा अर्थ गुंतवणुकीच्या परताव्यावर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. हे केवळ नियमित गुंतवणूक दीर्घ काळासाठी केल्यास साध्य होतं, यातूनच भविष्यासाठी जमापुंजी तयार होऊ शकते. 
  • उदा. जर तुम्ही म्युच्युअल फंडात १००० रूपये गुंतवले तर १०℅ व्याजदराने वर्षाकाठी तुम्ही त्यावर १०० रूपये कमवाल. 
  • आता ही रक्कम पुन्हा गुंतवल्यास तुम्ही वरच्या १०० रूपयावर म्हणजे अतिरिक्त रकमेवरही उत्पन्न मिळवू शकता. 
  • चक्रवाढ व्याज ही म्युच्युअल फंडातील महत्त्वाची संकल्पना आहे. समजा तुम्ही एसआयपी द्वारे प्रतिमहिना १०,००० रूपये गुंतवले तर वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत सेवानिवृत्तीच्या उद्देशाने १३℅ व्याजदराने तुम्ही २५ लाख कमवू शकता. 

चक्रवाढ व्याजाची जादू

एसआयपी गुंतवणूक – फायदे  (Advantages of SIP Investment):

1. विविध पर्याय उपलब्ध : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना विविध समभागांची निवड करता येते व उत्तम परतावा ही मिळतो. 

2. तरल गुंतवणूक : यामध्ये केलेली गुंतवणूक कधीही तात्काळ काढता येते. त्या दिवशीच्या मार्केट रेट नुसार उत्पन्न मिळते.

3. पारदर्शकता : गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावरील व्याज उत्पन्न याची माहिती केव्हाही अचूक मिळवता येते. 

4. किमान गुंतवणूकीचे पर्याय : एसआयपीसाठी अतिरिक्त रकमेची गरज नाही, किमान ५०० रूपये महिनाप्रमाणे तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.

थोडक्यात, आयुष्याच्या प्रवासात आर्थिक सुरक्षितता, सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण यासारखे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक आवश्यक आहे. वर दिल्याप्रमाणे चक्रवाढ व्याजाच्या फायद्यामुळे तुम्ही एसआयपी गुंतवणुकीची निवड करून गुंतवणूकीवर आकर्षक परतावा मिळवू शकता. एसआयपी हा गुंतवणूकीचा सर्वोत्तम पर्याय आहे, म्हणून लवकरात लवकर एसआयपी  गुंतवणूकीस सुरवात करा.

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…