Business Meeting
Reading Time: 2 minutes

पहिल्या नोकरीच्या अनुभावाची तुलना इतर कशाशीही करता येत नाही. नुकतंच कॉलेजमधून बाहेर पडणं आणि स्वत:चा पैसा कमावणं, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता नाही. अशा उत्साही वातावरणात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार एखाद्याच्या मनात अगदी शेवटी येऊ शकतो. आणि आपल्यापैकी बरेच जण आयुष्याच्या याच टप्प्यावर चूक करतात. त्यामुळे दर महिन्याला हातात येणाऱ्या पैशांमुळे नकळतपणे जडलेल्या चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करणे आवश्यक आहे. 

डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे (FAQ)

करिअरच्या सुरुवातीलाच गुंतवणूक करणे हे विवेकी व्यक्तीचे लक्षण आहे. यामुळे दीर्घकालीन अधिक संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवता येईल.

लवकर सुरुवात करून जास्त रक्कम गुंतवल्यास अधिक चांगली बचत होते. तसेच काही काळाची मंदी आणि अर्थव्यवस्थेची सतत बदलत जाणारी स्थिती यासाठी मजबूत सुरक्षा कवचही तयार होते.

करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक केल्यास पुढील फायदे अनुभवता येतील:

१. चांगले मानसिक आरोग्य: 

  • एखाद्याने करिअरच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीस प्रारंभ करणे हा आर्थिकदृष्ट्या निरोगी भ‌वितव्याचा पाया ठरतो. 
  • गुंतवणुकीतील स्थिर योजना घेतल्यास भविष्यातील चिंता कमी होतात, तसेच अधिक परिपूर्ण व समृद्ध आयुष्य जगता येते.

२. खर्चाच्या उत्तम सवयी: 

  • एखादी व्यक्ती खर्चाच्या मोहात अडकली की नाही, हे पाहण्यापेक्षा बचतीनंतर खर्च करणे हा शहाणपणाचा आणि निरोगी मार्ग आहे. जेव्हा केवळ मर्यादित उत्पन्न हाती असते तेव्हा खर्चावर कडक नियंत्रण ठेवावे लागेल. 
  • आवश्यक तेवढेच खर्च करावे लागेल. पण एकदा भविष्यासाठी बचत सुरू झाली की, आपण भल्या मोठ्या बिलांची चिंता करत बसण्यापेक्षा लक्झरी अनुभवांवर खर्च करण्याचा आनंद घेऊ शकतो.

गुंतवणुकीची  गोष्ट हातातली…..

३. गुंतवणुकीचे विविध पर्याय वापरण्याचे स्वातंत्र्य: 

  • करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक केल्याने या क्षेत्रात खूप स्वातंत्र्य मिळते. 
  • विविध प्रकारचे गुंतवणूक पर्याय आणि प्लॅटफॉर्म्स विविध प्रकारची एकत्रित जोखीम आणि परतावे देतात. 
  • गुंतवणुकीस लवकर सुरूवात केली, तर जोखीमीची तसेच किरकोळ अडथळ्यांपासून वाचण्याची त्यांची क्षमताही जास्त असते. 
  • पण गुंतवणुकीस उशीर झाला तर संबंधित व्यक्तीला फक्त सुरक्षित गुंतवणुकीचे पर्यायच निवडावे लागतात. तसेच त्यावर खूप कमी परतावे मिळतात आणि याचा एकूण परिणाम एखाद्या आयुष्यात दीर्घकालीन जीवनशैलीवर होतो.

प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित

अशा प्रकारे, आर्थिक समृद्धी आणि स्वातंत्र्य हे त्यांच्याच वाट्याला येते, जे गुंतवणुकीच्या दिशेने पाऊल टाकतात आणि त्यांच्या उत्पन्नाबाबत हुशारीने निर्णय घेतात. गुंतवणूक म्हणजे  खूप काही मोठे काम आहे, असे वाटू शकते. पण यातून मार्ग काढण्यासाठी तंत्रज्ञान आहे. नव्या आधुनिक प्लॅटफॉर्ममुळे दीर्घकालीन गुंतवणूक आता अखंड आणि एक रंजक गोष्ट बनली आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने काही अग्रेसर प्लॅटफॉर्म्स आर्थिक नियोजनाचा सल्लाही देतात. तसेच “डीआयवायचे प” हा डिजिटाइज्ड गुंतवणुकीचा पूर्ण अनुभव देते. अशा प्रकारे, आपल्या भोवतीच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा फायदा घेत करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक केल्यास उत्तम भवितव्य उभारता येऊ शकते.

– श्री संदीप भारद्वाज, 

मुख्य विक्री अधिकारी, 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…