Reading Time: 3 minutes

आपला पाल्य त्याच्या जीवनात यशस्वी व्हावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते त्यासाठी मुलांच्या लहान वयापासूनच त्यांचे वेगवेगळे क्लास चांगली शाळा  या सर्व गोष्टींना पालक जास्त महत्त्व देतात आणि पालकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे देखील परंतु या सर्व गोष्टींबरोबर मुलांना भविष्यात त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याकरिता   लहान वयापासूनच आर्थिक शिस्त लावणे देखील महत्त्वाचे आहे.

 

आपल्या बालपणीच्या काळात आपल्याकडे जास्त पैसे नसल्यामुळे हट्ट पूर्ण होत नसायचे किंवा काही प्रमाणात कष्ट देखील करायला लागायचे, त्यामुळे आपल्या पाल्याला मात्र काही च कमी पडू नये त्याला कशाचीच कमतरता भासू नये त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे प्रत्येक पालकांना वाटते याकारणामुळे अनेक पालक आपल्या पाल्याच्या प्रेमापोटी त्यांचे वाटेल ते हट्ट पूर्ण करतात. आजकालच्या मुलांना सर्व गोष्टी मागितल्या की, किंवा न मागताच मिळतात यामुळे लहान वयातच अनावश्यक खर्च करण्याची सवय मुलांना लागते व पैशांची किंमत त्यांच्या लक्षात येत नाही यामुळे काही प्रमाणात मुले बिघडतात. म्हणूनच  लहान वयातच मुलांना पैशांची किंमत समजून सांगणे फार महत्त्वाचे आहे.

  

१) योग्य खर्च करण्याची सवय लावणे.

लहानपणी लागलेल्या चांगल्या सवयी तसेच चांगले वळण तुमच्या जीवनात यशस्वी होण्यास मदत करतात. यामुळे पालकांनी त्यांच्या पाल्यांना लहान वयातच योग्य खर्च करण्याची सवय लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

भविष्यात आपला मुलगा / मुलगी त्यांच्या जीवनात यशस्वी व्हावे चांगले नाव कमवावे व आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते.

बाहेर फिरायला गेल्यावर किंवा इतरांकडे पाहून मुले एखाद्या वस्तूसाठी हट्ट करतात परंतु त्यांचे अनावश्यक हट्ट पूर्ण न करता त्यांना पैशांचे महत्व समजून सांगणे आवश्यक आहे.

आकर्षित करण्याच्या सर्वच वस्तू टिकाऊ असतात असे नाही त्यामुळे यावर जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्या टिकाऊ उपयोगी वस्तूवर खर्च करणे कधीही फायदेशीर आहे याचे महत्त्व मुलांना लहान वयातच समजावून सांगणे आवश्यक आहे.

२) पैशांची किंमत करायला शिकवणे

पैसे खर्च करून हवी ती वस्तू विकत घेणे हवे तसे पैसे खर्च करणे जेवढे सोपे आहे तेवढेच पैसे कमावणे अवघड आहे. गोष्टींच्या पुस्तकातल्या कथेप्रमाणे आपल्याकडे हवे तसे पैसे खर्च करायला काही खजिना नाही पैसे कमविण्यासाठी परिश्रम व कष्ट करावे लागतात याची जाणीव मुलांना लहान वयातच करून देणे गरजेचे आहे. 

लहान वयातच मुलांना पैशांचे महत्त्व माहीत असेल तर तरुण वयात पैशांची उधळपट्टी करण्याची सवय लागत नाही.

 

हेही वाचा – मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?

 

३) बचत करायला शिकवणे

  मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मुलांच्या जन्मा अगोदर पासून पालक बचत करण्यास सुरुवात करतात. बचत हीआपल्या आर्थिक भविष्यासाठी हे आपण जाणून आहोत. परंतु आपल्याबरोबरच आपल्या पाल्याला देखील  बचतीचे महत्त्व समजून सांगणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीलहान वयापासून पिगी बँक मध्ये पैसे जमा करणे  ही सवय पालकांनी मुलांना लावली पाहिजे. 

एखाद्या गरजेचं नसलेल्या महागडा खेळणं किंवा निरुपयोगी वस्तूवर खर्च करण्यापेक्षा ते पैसे पिगी बँक मध्ये टाकून बचत करू शकतो याचे महत्त्व पालकांनी मुलांना समजून सांगितले पाहिजे.

४) मौजेमजेसाठी किंवा आनंदासाठी पैसे गरजेचे असतातच असे नाही.

आनंदासाठी प्रत्येक वेळेस पैसा गरजेचा असतो असे नाही हे लहान वयातच मुलांना शिकवणे महत्त्वाचे आहे. इतर मुलांकडील वस्तू खेळणं बघून आपल्याला देखील तसेच खेळणं पाहिजे हा हट्ट करणे योग्य नाही हे मुलांना समजून सांगितले पाहिजे. पैसे खर्च करून एखादं महागडे खेळणं घेऊन आनंदी होण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा  शोधता येईल यासाठी पालकांनी मुलांना मदत केली पाहिजे.घेता येईल हे पालकांनी मुलांना दाखविले पाहिजे.

 

हेही वाचा –मुले आणि अर्थसाक्षरता

 

५) अनावश्यक व आवश्यक खरेदी मधला फरक मुलांच्या लक्षात आणून दिला पाहिजे – 

मोठ्यांचा बघून लहान मुलं असतात किंवा लहान मुलं त्यांच्या पालकांचा अनुकरण करत असतात हे आपल्याला माहित आहे यामुळे पालकांनी मुलांसमोर चांगला आदर्श ठेवला पाहिजे. मुलांना घेऊन खरेदीला गेल्यावर आपण ठरवलेल्या वस्तूंपैकी जास्त खरेदी करणे हे पाहून मुलं देखील गरज नसलेल्या गोष्टींसाठी हट्ट करतात त्यासाठी पालकांनी स्वतःला आधी शिस्त लावणे आवश्यक आहे.  

एखादी वस्तू एकदा वापरून फेकून देण्यापेक्षा  वारंवार वापर करता येईल  अशा गोष्टींवर पैसे खर्च करायला हरकत नाही हे मुलांना समजून सांगितले पाहिजे.

उदाहरणार्थ: मुलांना स्कूल बॅग घेण्यासाठी गेल्यावर एखादी     महागडी व फॅन्सी स्कूल बॅग साठी मुलाखत परंतु त्यापेक्षाही दुसऱ्या कमी महाग व टिकाऊ स्कूल बॅग देखील चांगल्या  आहेत हे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.

 

हेही वाचा – Child Future Plan: मुलांच्या भविष्याची तरतूद कशी कराल?

 

महत्वाचे ! – गरज आणि इच्छा यामधील फरक  त्यांना समजावून सांगितला पाहिजे यामुळे विनाकारण खर्च करण्यापेक्षा उपयोगी वस्तूवर खर्च करण्याचे महत्त्व मुलांच्या लक्षात येईल.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…