Reading Time: 2 minutes

शेअर बाजारात चढ उतार कायम कायम चालूच असतात. शेअर बाजारात मागील इतिहासात झालेली पडझड परत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असते. ज्यांना शेअर बाजार गुंतवणुकीबद्दल ज्ञान आहे, ते गुंतवणूकदार  या परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात.

 मात्र जर एखादा नवखा गुंतवणूकदार सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचे स्वप्न बघत असेल तर त्याला या काळात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते. कारण एखादी वाईट बातमी शेअर बाजाराच्या संदर्भात आली की शेअरचे भाव घसरायला सुरुवात होते. त्यामुळे कित्येक गुंतवणूकदारांना नुकसानीला सामोरे जावे लागते. 

शेअर बाजारात गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने काही चुका टाळल्या तर निश्चितपणे शेअर बाजारातून चांगले पैसे कमवता येऊ शकतात. 

 

   शेअर बाजारात गुंतवणूक करताना टाळा या गोष्टी 

 

  • एखाद्या शेअरमध्ये जास्त गुंतवणूक करणे – 
  •  शेअर बाजारात कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचे नफा मिळावे ही प्रामुख्याने अपेक्षा असते. 
  • एखाद्या कंपनीचा शेअर घेतल्यानंतर तो नेमका कशासाठी घेतला आहे? हेच गुंतवणूकदार विसरून जातात.
  •  कंपनीच्या प्रेमात पडून फायदा-तोटा बाजूला ठेवून लोक गुंतवणुकीकडे बऱ्याचदा लक्षच दिले जात नाही. ही चूक बरेच गुंतवणूकदार करतात. 
  • आपण जर शेअर बाजारात नवीन असाल तर एकाच कंपनीत गुंतवणूक करणे टाळायला हवे. आपण गुंतवणूक ही फक्त आणि फक्त आपल्या मूलभूत फायद्यासाठी करत आहोत हे लक्षात ठेवायला हवे.

 

२. गुंतवणूक करताना ताबोडतोब मोठ्या परताव्याची (returns) अपेक्षा ठेऊ नये – 

  •  शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराची एकच अपेक्षा असते की केलेल्या गुंतवणुकीतून लवकर परतावा मिळायला हवा. हे लवकर परतावा मिळण्याची स्वप्ने पाहणे कधी कधी गुंतवणूकदारांसाठी धोक्याचे ठरू शकते. 
  • शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्वात प्रथम संयम ठेवायला हवा. जर तुम्ही संयम बाळगला तर नफा निश्चित मिळतो. 
  • शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी असते. त्यामुळे लवकरात लवकर नफा मिळवण्याच्या नादात आपल्याकडून छोट्या छोट्या चुकाही होऊ शकतात.

नक्की वाचा : शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार 

 

३. कोणत्याही ध्येयाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करणे – 

  • शेअर बाजार किंवा इतर ठिकाणी आपण गुंतवणूक करतो तेव्हा एक योजना (plan) असणे गरजेचे असते. गुंतवणूक किती काळासाठी करायची आणि  किती नफा मिळाल्यानंतर त्या शेअरची विक्री करायची हे आपल्याला माहित असायला हवे.
  • सध्याचा गुंतवणुकीचा ट्रेंडनुसार बऱ्याच गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीची दिशा ठरवलेली दिसत नाही. कसलाही विचार न करता फक्त ऐकीव माहितीवर किंवा अफवेवर गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. अशाने गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागू शकते.
  • भारतात भावनेच्या भरात ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गुंतवणूक करताना शेअर मधून नफा किती कमवायचा हे समजायला हवे. यासाठी एक प्लॅन बनवून आपण गुंतवणूक ही करायला हवी.

 

४. शेअर बाजारात अस्थिरता आल्यास आपत्कालीन निधी वेगळा काढून ठेवणे – 

  • अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात बातम्यांवर अवलंबून राहून गुंतवणूक करत असतात. या वेळी आपत्कालीन किंवा बचत निधीतून गुंतवणूक करणे टाळायला हवे.
  • असे करणे अत्यंत जोखमीचे ठरू शकते.  जेव्हा शेअर बाजारात अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदाराने जपून गुंतवणूक करायला हवी. अशा परिस्थितीत नुकसान होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. 
  • सोबतच आपण बचत केलेल्या निधीचे नुकसान होऊ शकते. अशा वेळी आपण इतर काही गुंतवणुकीचे पर्याय अवलंबून पाहायला हवेत. वेगवेगळ्या गुंतवणुकीमध्ये अस्थिरता येत असते. यासाठी आपण सोन्याच्या गुंतवणुकीचे उदाहरण पाहू शकतो. 

नक्की वाचा : आपत्कालीन निधी कसा गोळा करू रे भाऊ ? 

 ५. माहित असलेल्या ठिकाणीच गुंतवणूक करायला हवी – 

  • दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक आपण माहिती शेअर्समध्येच करावी  नियम असतो.  गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये असा सल्ला दिलेला आहे.
  • जेव्हा आपण म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजाराचा पोर्टफोलिओ तयार करत असतो तेव्हा गुंतवणुकीचे काही नियम लक्षात ठेवायाला हवेत. एखादी कंपनीची, योजना जर आपल्याला समजत नसेल तर तिच्यापासून चार हात लांब राहणे कधीही चांगले असते.  

निष्कर्ष : 

  • शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे असते. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि शेअर बाजारातील कंपन्यांचा अभ्यास केल्यानंतर गुंतवणूक करावी. 
  • एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक करताना दीर्घकाळासाठी करावी, तरच त्यामधून चांगला परतावा मिळतो.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…