आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी जोडणे बंधनकारक असल्याचे भारत सरकारने पुर्वीच जाहिर केले होते. यासाठीची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली असून, नविन तारिख ३१ मार्च २०१९ ही आहे.
आत्तापर्यंत ही मुदत चार वेळा वाढवण्यात आली आहे. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात सी.बी.डी.टी.ने आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडणे ३० जून २०१८ पर्यंत बंधनकारक केले होते. परंतु, या तारखेपर्यंत अनेक कारणांमुळे सर्व नागरिकांचे आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडले गेलेले नव्हते. जुलै २०१७च्या वित्त-कायदा २०१७(फायनान्स ऍक्ट २०१७) नुसार सर्व करदात्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आयकर कायदा १९६१ च्या कलम १३९एए मध्ये करण्यात आली होती. यासाठी ३१ जुलै २०१७ ही अंतिम तारिख देण्यात आली होती, जी पुढे ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत वाढवण्यात आली. परंतु, अत्यंत कमी कालावधीत सर्व नागरिकांची ही प्रक्रिया पूर्म होऊ न शक्यलाने यासाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवण्यात आली, जी पुढे परत ३० जून २०१८ पर्यंत वाढवली गेली होती.
आता ही मुदत आणखी एका वर्षाकरिता, म्हणजेच ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
ही नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ही नोटीस डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडणेही अत्यंत सोपे आहे. ई-फायलिंग वेबसाईटवर हाही पर्याय उपलब्ध असतो. पुढील पद्धतीने काही क्षणात आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडले जाते.
१. ई.फायलिंग वेबसाईट (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) उघडा.
२.लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
३. उघडलेल्या फॉर्ममध्ये तुमची पॅन व आधारकार्डची विचारलेली माहिती भरा. (ही माहिती दोन्ही ठिकाणी सारखीच असणे गरजेचे आहे. नाव, जन्मतारिख, इ. सारखे तपशील पॅन व आधारकार्डवर एकसारखे नसतील, तर त्यांची एकमेकांशी जोडणी होणार नाही.)
४.सर्व माहिती भरून झाल्यावर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
“