Arthasakshar Resume update रेज्युमे अपडेट
https://bit.ly/2Zm8Ca9
Reading Time: 3 minutes

Resume  update-

नोकरीसाठी अर्ज करताना रेज्युमे अद्ययावत (Resume update) असणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण याचे महत्व तसेच रेज्युमे अपडेट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल माहिती घेणार आहोत. 

नवर्‍याची बदली झाली आणि शुभांगीने तिची चालू नोकरी सोडली. भरपूर अनुभवाच्या जोरावर नक्कीच नवी नोकरी मिळेल याचा तिला विश्वास होता मात्र इतका चांगला अनुभव असून देखील साधा इंटरव्ह्यु साठीही फोन देखील येत नव्हता. यामुळे शुभांगी जाम वैतागली होती. मग तिने अगोदरच्या कंपनी मधल्या तिच्या एच.आर. मैत्रिणीला फोन लावला आणि सर्व काही सांगितले. मैत्रिणीला शुभांगीचा अनुभव आणि प्राविण्य ठावूकच होते. शिवाय तिचा रेज्युमे पण तिने पाहिलेला होता. त्यामुळेच तिला नेमका प्रॉब्लेम लक्षात आला. तिने शुभांगीला काही सूचना दिल्या त्यानुसार शुभांगीने तिचा रेज्युमे अपडेट (Resume update) केला आणि लवकरच तिला नोकरी देखील मिळाली.

  • वरील उदाहरणात अतिशय हुशार असलेल्या शुभांगीकडून नोकरी शोधताना ज्या त्रुटी राहत आहेत. त्याच बहुतेक जणांकडून राहतात. 
  • आपण एखाद्या नोकरीसाठी अर्ज केला, तर सर्वात प्रथम आपला रेज्युमे तिथे पहिला जातो. 
  • आपला रेज्युमे हा आपल्या करिअरचा आरसा असतो. त्यामुळे तो अपडेट असलाच पाहिजे. 

बायोडाटा, रिज्युमे आणि सी.व्ही. यामधला फरक 

रेज्युमे अपडेट (Resume update) ठेवण्यासाठी महत्वाच्या टिप्स 

1. सध्याच्या नोकरीची माहिती  –

  • आपल्या रेज्युममध्ये नेहमी सध्याची नोकरी, आपले कौशल्य इ. माहिती अपडेट करायला हवी.
  • आपण नोकरी करत नसाल, तर अगोदर केलेल्या नोकरीचा संदर्भ द्यावा. 
  • रेज्युमे मध्ये नोकरीचा क्रम लिहिताना सर्वात आधी सध्याची नोकरी व त्यांनंतर त्याअगोदरची नोकरी असा क्रम असावा. 

2. सुटसुटीत, शुद्ध आणि संक्षिप्त भाषा  –

  • रेज्युमे अपडेट  करताना सध्याचा कामाचा अनुभव जरा विस्तृत मांडून, जुना अनुभव संक्षिप्त मांडला तरी चालते. 
  • रेज्युमेमध्ये व्याकरणाच्या चुका व अशुद्धलेखन टाळावे. प्रत्येक शब्द, वाक्य हे सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडावे. 
  • फार जुना अनुभव नमूद करण्याची आवश्यकता नसते. उदा. पंधरा वर्षांपूर्वीचा अनुभव नाही दाखवला किंवा अगदी संक्षिप्त मांडला तरी चालतो.
  • व्यावसायिक फॉन्ट वापरायचा प्रयत्न करा. जर आपल्याला काही वेगळा फॉन्ट वापरुन वेगळेपणा दाखवायचा असेल, तर त्यासाठी देखील व्यावसायिक जगतात चालणारच फॉन्ट वापरा. 

नोकरीच्या शोधात आहात का ? महाजॉब्स पोर्टलला भेट द्या ! 

3. करिअरची उद्दिष्टे –

  • पूर्वी  रेज्युमेच्या सुरूवातीला उद्दिष्टे (career Objectives) लिहिले जायचे. तो काळ आता मागे पडतो आहे. 
  • आपण इंटरव्ह्यूसाठी जाताय किंवा अर्ज केला आहे म्हणजेच ती नोकरी मिळवणे हे आपले पहिले उद्दिष्ट आहे. 
  • उद्दीष्टे लिहिण्यासाठी रेज्युमे मधली जागा वाया घालवू नका. ती जागा वाचवून आपण काही कामासंबधित महत्वाची माहिती नमूद करू शकतो.

4. व्यावसायिक सारांश ( professional summary) –

  • रेज्युमेची सुरुवात व्यावसायिक सारांशाने करणे उत्तम! 
  • यामध्ये संक्षिप्त रूपात आपल्याला असणारा अनुभव मांडता येतो किंवा शैक्षणिक तसेच व्यावसायिक माहिती यात देता येईल. 
  • जे काही आपण यात मांडू ते नक्कीच आपल्या रेज्युमेचे वेगळेपण .

कोव्हिड-१९ : अडथळ्यापासून संधीपर्यंत !

5. नोकरीच्या क्षेत्राप्रमाणे मांडणी –

  • काही जणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनुभव घेतलेला असतो. 
  • आपण जिथे नोकरीसाठी अर्ज करत आहात त्या क्षेत्राशी निगडीत अनुभव रेज्युमेमध्ये वरती असणे आवश्यक आहे. 

6. पुरस्कार, प्रमाणपत्र, बढती यासंदर्भात माहिती  –

  • आपला रेज्युमे दर सहा महिन्यांनी अपडेट केला तरी चालतो. मात्र नोकरीमध्ये बढती मिळाली की लगेच आपल्या बदलेल्या पदाची (designation) व त्या पदाच्या जबाबदाऱ्यांची (job Responsibilities) नोंद आपल्या रेज्युमेमध्ये करावी. 
  • कोणतेही प्रमाणपत्र अथवा एखादा पुरस्कार मिळाला तर त्या संदर्भातील नोंद रेज्युमेमध्ये तात्काळ करत जा. 

नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना?

7. शिक्षणाची तारीखवार माहिती टाळा –

  • जेव्हा आपणाकडे अनुभव असतो तेव्हा शैक्षणिक अर्हतेबद्दल फारसे विस्तृत लिहायची गरज नसते.
  • अनुभवी कर्मचाऱ्यांनी रेज्युमेमध्ये शक्यतो आपण किती साली, कुठल्या महिन्यात उत्तीर्ण झालो इ. माहिती टाळावी.

8. किवर्ड्सचा वापर –

  • आपण ज्या क्षेत्रात काम करतो अथवा करण्यास इच्छुक असतो त्यातील महत्वाचे शब्द हे आपल्या रेज्युमे मध्ये येणे आवश्यक आहे.  
  • अर्थातच त्यासंबंधित अनुभव असतानाच आपण तो नमूद करतो. 
  • बर्‍याच ठिकाणी रेज्युमे निवडण्यासाठी काही सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो आणि त्यामधून रेज्युमे हे कीवर्ड्स च्या सहाय्याने निवडले जातात. 
  • आपल्या रेज्युमेमध्ये संबंधित क्षेत्राशी किंवा पोस्टशी निगडित शब्दच नसतील अथवा कमी असतील, तर आपल्याकडे कौशल्य असूनही आपल्याला मुलाखतीला बोलावले जात नाही.

नोकरी करू की व्यवसाय?

9. वैयक्तिक माहिती टाळा –

  • पूर्वी रेज्युमे मध्ये वैयक्तिक माहितीचा एक रकाना असायचा. त्यात अगदी विस्तृत माहिती असायची. 
  • सध्या नवीन पद्धतीनुसार आपल्या वैयक्तिक माहितीचा फारसा विचार केला जात नाही.
  • ती माहिती नमूद न करणेच योग्य ठरते.

10. अनावश्यक माहिती टाळा –  

  • रेज्युमेची लांबी फार जास्ती नसावी. 
  • त्यामध्ये फक्त आपल्या अनुभवाशी किंवा ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्या पोस्टशी संबंधित असणारा अनुभव संक्षिप्तपणे मांडा. 

आपला रेज्युमे तर तयार असेलच, मात्र तो अपडेट आहे की नाही हे वरील मुद्यावरून पडताळून पाहा. अशा काही सध्या पण महत्वाच्या गोष्टी आपण रेज्युमे अपडेट करताना लक्षात घेतल्या, तर नक्कीच रेज्युमेमुळे अर्ज नाकारला जाणार नाही.

नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचाच

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Resume update Marathi Mahiti, Resume update tips in Marathi, How to update Resume in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.