अर्थसाक्षर फेसबुक
https://bit.ly/2WbBQX6
Reading Time: 3 minutes

फेसबुकचा वापर थांबवण्याची ९ महत्वाची कारणे

सध्या सर्वांत जास्त वापरला जाणारा सोशल मिडिया मंच म्हणजे फेसबुक! यावर सतत क्टिव्ह राहण्याचा प्रवास हा आवडीपासून सुरु झाला आणि आता ही ‘गरज’ बनली आहे. 

गेल्या शतकामध्ये अनेक संशोधने झाली अनेक शोध लागले आणि खूप मोठ्या क्रांती घडून आल्या, विशेषतः संभाषणक्षेत्रात. अगदी पत्र, तार, टेलिफोन, मोबाईल, मेसेजेस, इमेल्स ते आत्ताचे व्हिडिओ कॉल्स पर्यंत मानवाने खूप प्रगती केली. याचाच एक अत्यंत अविभाज्य बनलेला घटक म्हणजे सोशल मिडिया, ज्याची सुरुवात २००४ साली झाली, आधी अमेरिकेवर आणि मग आज संपूर्ण जग यामध्ये अक्षरशः स्वतःला विसरून वाहवत जात आहे. आधी सहज, लोकांशी जोडण्यासाठी सुरु झालेल्या या प्लॅटफॉर्मची नंतर सवय आणि मग ते कसं व्यसन बानू लागलं हे कळलंही नाही. 

२०२० मध्ये स्मार्टफोन शिवाय कसे राहाल?

फेसबुक खूप वेळखाऊ तर आहेच शिवाय दिवसेंदिवस आपल्या कामावर, सामाजिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर आणि अगदी स्वतःच्या मानसिक आरोग्यावरही यामुळे नकारात्मक परिणाम होतोय. आता फेसबुक फक्त सोशल मिडिया पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पण वेळ अजूनही गेलेली नाही, हीच वेळ आहे ‘थांबायची’. हे थांबणे तात्पुरते असो किंवा कायमचे हे अत्यावश्यक आहे.

फेसबुकचा वापर थांबवण्याची ९ कारणे –

१. तुमचा बहुमूल्य वेळ पणाला लागतो आहे: 

  • २ मिनिटात फक्त काय सुरु आहे, काही नवीन आहे का पाहून, परत कामाकडे वळता येईल.’ असा विचार करून सुरु केलेल्या फेसबुकवरून प्रत्यक्ष बाहेर पडता पडता कधी अर्धा तास, तर कधी एक तासही कसा निघून जातो हे लक्षातही येत नाही.  
  • जेव्हा लक्षात येतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. मग चिडचिड होऊ लागते की इतका वेळ कसा गेला? 
  • स्वतःच्या वेळेची किंमत जाणून वेळीच थांबा आणि आपला वेळ सत्कारणी लावा.

२.माहितीचा गैरवापर:

  • तुम्ही समजता त्यापेक्षा तुमच्याबद्दल जास्त माहिती फेसबुककडे आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी ते अजिबात कचरत नाहीत.  
  • फेसबुक… गोपनीयता… त्याबद्दलच्या तक्रारी वगैरे वगैरे वगैरे… बराच काही ऐकलं असेल ना तुम्ही गेल्या काही वर्षांत? 
  • फेसबुक हे आता पैसे कमावण्याचे साधन बनले आहे, हे आता जगजाहीर आहे. पण व्यक्तिगतरीत्या याचा नक्की अर्थ काय, हे मात्र अनेकांना ज्ञात नाही. 
  • आपल्या दैनंदिन जीवनाबद्दलची माहिती आपणच फेसबुकला देत असतो.  
  • तुम्हाला हे माहित आहे का की फेसबुक ‘फेसबुक न वापरणाऱ्या’ लोकांचीही माहिती गोळा करते.  

तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?

३. फेसबुक तुमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करते: 

  • हो, तुम्ही बरोबर वाचत आहात. फेसबुक तुमच्यामध्ये अशा भावना निर्माण करते की ज्यामुळे तुम्हाला आपण सर्वात बाबतीत इतरांच्या तुलनेत किती मागे आहोत, किती कमी आहोत, किती जुनाट आहोत, किती बुरसटलेले आहोत, याची जाणीव होऊ लागते. 
  • काही जणांच्या आयुष्यातील काही क्षण, मोठमोठे कलाकार यांनी तिथे टाकलेल्या गोष्टी यामुळे त्यांचे आयुष्य सुरेख आणि परिपूर्ण वाटून त्यांच्याशी आपण आपल्या आयुष्याची तुलना करू लागतो आणि तिथूनच या नकारात्मक भावना निर्माण होतात.

४. फेसबुक अत्यंत भयावह, भयानकही असू शकते: 

  • फेसबुकवर अनेकदा मुक्या प्राण्यांशी क्रूरपणे वागतानाचे व्हिडिओज असतात. 
  • काही तर अक्षरशः एखाद्या व्यक्तीचा खून करतानाचे व्हिडिओजही असतात. 
  • काही दिवसांपूर्वीच एका थाई माणसाने त्याच्या ११ महिन्यांच्या मुलीला फाशी देतानाचा व्हिडिओ फेसबुकवर होता. 
  • अनेकदा अशा गोष्टी टाळणं कठीण असतं कारण त्या सतत तुमच्या न्युज फीड मध्येच दिसत असतात आणि हे खूप भयावह आहे.

सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय

५. फेसबुकमुळे आपसांत वाद निर्माण होतात: 

  • एखादी पोस्ट आपल्यासमोर आली आणि न राहवून आपण त्यावर काही कमेंट केली जी आपल्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला नाही आवडली, तर ते त्यावर काहीतरी कमेंट करतात आणि अशा प्रकारे हा वाद वाढून विनाकारण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल वितुष्ट निर्माण होतं.
  • राजकीय आणि सामाजिक वादांमुळे जुनी मैत्री तुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

६. फेसबुकमुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा येतो: 

  • मैत्रीचं उदाहरण आपण यांच्यावर म्हणजे ५व्या मुद्द्यांमध्ये पाहिले. पण हे फक्त तेवढंच मर्यादित नाहीये.  
  • अगदी जवळच्या, जिवाभावाच्या नात्यांमध्ये दुरावा आल्याची अनेक उदाहरणे अनेकांना माहिती असतील. त्याची अनेक करणे असू शकतात. 
  • सतत फेसबुकवर ऍक्टिव्ह राहिल्याने आपल्या प्रत्यक्ष जीवनातील प्रियजनांना पुरेसा वेळ देता येत नाही. 
  • फेसबुकवर एखादी पोस्ट वाचल्यावर चिडचिड होणे, नैराश्य येणे असा भावनिक कल्लोळ माजतो ज्यामुळे आपल्या सोबतच्या व्यक्तीही काही प्रमाणात दुखावल्या जातात आणि तुमच्यापासून आपोआपच दूर जाऊ लागतात.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ? 

७. तुम्ही खरंच किती जणांना ओळखत असता?: 

  • तुमच्या फेसबुकच्या मित्रांच्या यादीतील अनेकांना तुम्ही प्रत्यक्ष ओळखतही नसता. अशावेळी ती व्यक्ती तुमच्या माहितीचा गैरवापर अगदी सहज करू शकते. 
  • या गोष्टीला तुम्ही तुमच्याही नकळत सहकार्यच करत असता. त्यामुळे हे किती धोकादायक आहे याचा अंदाज बांधा. 

८. फेसबुक तुम्हाला नको त्या लोकांबरोबर, माहितीबरोबर गुंतवून ठेवते: 

  • इतर वेळी ज्या लोकांशी तुम्ही फार बोलणार नाही अशा लोकांशी विनाकारण संवाद साधणे किंवा एखाद्या पोस्टबद्दल व्यक्त होण्यामुळे अनेकदा तुमचा वेळ आणि तुमची ताकद वाया जात असते.
  • याचप्रमाणे नको ती माहिती, जी इतर वेळी तुम्ही अजिबात पाहिली किंवा वाचली नसती अशा गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा अत्यंत बहुमूल्य वेळ वाया घालवत असता.

९. फेसबुक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत जाणे: 

  • सततच्या फेसबुक वापराच्या सवयीमुळे एक दिवस अशी वेळ येऊ शकते जेव्हा हेच फेसबुक तुमच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनते. 
  • फेसबुकशिवायच्या आयुष्याची कल्पना देखील करणे तुम्हाला अशक्य वाटू लागते.

तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

वरीलपैकी कोणतीही गोष्ट तुमच्याबाबतीत घडत असल्यास, त्वरित यातून बाहेर पडण्याची योजना करा.  जर तुम्ही फेसबुकच्या जाळ्यात अडकला नसाल तर,  लवकरात लवकर यामधला धोका समजून घेऊन यापासून दूर राहण्याचा निर्णय घ्या आणि तो अमलात आणायला सुरुवात करा.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Disadvantages of Fb in Marathi, Reasons to stop us of Facebook Marathi mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –