गौतम अदानी
Gautam adani ipo in marathi
Reading Time: 3 minutes

Adani Wilmar IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

कंपनीचा इतिहास

  • प्रदीर्घ कालावधीनंतर अदानी समूह कंपनी IPO आणून भांडवली बाजारात पदार्पण करणार आहे. अदानी विल्मार ही मोठ्या FMCG फूड कंपन्यांपैकी एक आहे.
  • अदानी विल्मार ही गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह आणि सिंगापूरचा विल्मार समूह यांच्यातील 50:50 भागीदारीतील संयुक्त उपक्रम (Joint venture) असलेली कंपनी आहे. ही कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत स्वयंपाकाचे तेल विकते. तसेच तांदूळ, गव्हाचे पीठ आणि साखर यांसारख्या खाद्यपदार्थांची आणि साबण, हॅन्डवॉश आणि सॅनिटायझर यांसारख्या इतर उत्पादनांची देखील विक्री करते.
  • कंपनीचा महसूल आणि EBITDA अनुक्रमे 11.28% आणि 20.65% च्या CAGR (2015-2020) दराने वाढ दर्शवतो. मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून आणि महसूल प्रकारांत  विविधता आणून कंपनी PAT (Profit After Tax) मार्जिनची चिंता दूर करायचा प्रयत्न करते आहे. 

आयपीओ विषयी महत्वाचे

  • अदानी विल्मारचा IPO 27 जानेवारी 2022 ला लॉन्च झाला आहे. गुंतवणूकदार या IPO मध्ये 31 जानेवारी 2022 पर्यंत बोली लावू शकतात. 
  • अदानी विल्मारचा एकूण IPO ₹3600 कोटी रुपयांचा आहे. या IPO ची प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ₹ 218 ते ₹ 230 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अदानी विल्मरचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध केले जातील. 

हेही वाचा – Accredited investors (AI): मान्यताप्राप्त गुंतवणूकदार…

  • आयपीओच्या विनियोगाचे नियोजन.

IPO उत्पन्नाचा वापर सध्याच्या उत्पादन सुविधांच्या विस्तारासाठी तसेच नवीन युनिट्स विकसित करण्याच्या भांडवली खर्चासाठी निधी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. 

निधीचा एक भाग कर्जाची परतफेड, धोरणात्मक अधिग्रहण आणि गुंतवणूकीसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी देखील वापरला जाईल.

  • आयपीओ उघडण्याची आणि बंद करण्याची तारीख

अत्यंत अपेक्षित असलेला IPO सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी 27 जानेवारीला उघडला आहे. आणि 31 जानेवारी 2022 रोजी तो बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली 25 जानेवारीपासून सुरू झाली होती. 

  • इश्यू साइज

ऑफरमध्ये ₹3,600 कोटींपर्यंतच्या नवीन इक्विटी शेअर्सचा ताज्या इश्यूचा समावेश आहे. कंपनीने आपला IPO आकार ₹4,500 कोटींवरून ₹3,600 कोटींवर कमी केला आहे.

  • प्राईस बँड

कंपनी प्रत्येकी ₹218-230 च्या प्राइस बँडमध्ये शेअर्स ऑफर करेल. अदानी विल्मार आयपीओ सध्या ग्रे मार्केटमध्ये 65 रुपयांच्या प्रीमियमवर आहे. म्हणजेच ग्रे मार्केट या आयपीओ मध्ये नफ्याची अपेक्षा करत आहे.

हेही वाचा   Silver investment: चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी…

  • लॉट साइज

कंपनीने IPO साठी एका लॉटमध्ये 65 शेअर्स ठेवले आहेत  याचा अर्थ गुंतवणूकदार किमान 65 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्याच्या पटीत अर्ज करू शकतात. या IPO मध्ये गुंतवणूकदार एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करू शकतो. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदार किमान रु. 14,950 प्रति लॉटची गुंतवणूक करू शकतात आणि त्यांची कमाल गुंतवणूक 13 लॉटसाठी रु. 1,94,350 असेल.

  • भागधारकांचा कोटा 

निव्वळ इश्यूच्या जास्तीत जास्त 50% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs), 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15% गैर-संस्थात्मक खरेदीदारांना वाटप केले जातील. कंपनीने आपल्या पात्र कर्मचार्‍यांसाठी ₹107 कोटी पर्यंतचे इक्विटी शेअर्स राखून ठेवले आहेत.

  • लिस्टिंग 

अदानी विल्मारचे शेअर्स देशांतर्गत एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर लिस्ट केले जातील. शेअर्सच्या लिस्टिंगची  तात्पुरती तारीख 8 फेब्रुवारी 2022 आहे. कंपनीने ICICI सिक्युरिटीज, HDFC बँक, BNP पारिबा, कोटक महिंद्रा कॅपिटल, JP मॉर्गन, BofA सिक्युरिटीज आणि क्रेडिट सुइस यांना ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. लिंक इनटाइम इंडियाची या प्रकरणासाठी निबंधक (Registrar) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीच्या सकारात्मक बाजू

  • ‘फॉर्च्यून’ ब्रँड अंतर्गत खाद्यतेल, पॅकेज केलेले अन्न आणि स्वयंपाकाच्या आवश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या या कंपनीने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ₹727.65 कोटींचा करानंतरचा नफा (PAT) नोंदविला होता, जो मागील वर्षी ₹460.87 कोटी होता. 
  • कंपनीचा एकूण महसूल 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ₹29,767 कोटींच्या तुलनेत FY21 मध्ये ₹37,196 कोटी होता.
  • ब्रँडेड तेल व्यवसायातील (अदानी विल्मार, रुची सोया, इमामी, कारगिल, बंज आणि मॅरिको) या टॉप सहा कंपन्यांचा एकत्रित हिस्सा FY20 मधील अंदाजानुसार 40% इतका आहे. 
  • अदानी विल्मार आणि रुची सोया हे FY20 मध्ये अनुक्रमे 2.8 दशलक्ष मेट्रिक टन (MT) आणि 1.4 दशलक्ष MT च्या उत्पादनासह खाद्यतेलाचे सर्वात मोठे पुरवठादार आहेत. 
  • रुची सोया ही ब्रँडेड पाम तेलाच्या बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी आहे, जिचा वाटा मूल्याच्या दृष्टीने 12% आहे, त्यानंतर अदानी विल्मारचा वाटा 11% आहे. 
  • अदानी विल्मार ही ब्रँडेड रिफाइंड सोयाबीन तेलातील सर्वात मोठी कंपनी आहे जिचा बाजार हिस्सा 28% आहे आणि त्यानंतर रुची सोयाचा नंबर येतो जिचा हिस्सा बाजार मूल्यानुसार 11% आहे.

गुंतवणुकीचे संभाव्य धोके: .

  • कच्च्या मालाच्या किमतीतील अस्थिरता आणि स्पर्धा वाढल्याने कंपनीच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.
  • प्रतिकूल सरकारी धोरणे आणि नियम, अन्न आणि FMCG व्यवसायाचा विस्तार करण्यात अडचण, शाश्वत सामान्य चलनवाढीचे वातावरण, मुख्य वस्तूंच्या किमतींमध्ये चढउतार, प्रतिकूल सेल्स मिक्स आणि फॉरेक्स रेट्स याही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
  • आयातीवरील निर्बंध आणि निर्यात करणार्‍या देशांमधील धोरणात्मक बदल, विनिमय दरातील चढ-उतार यासारख्या बाह्य घटकांचा किंवा उत्पादन प्रक्रियेत काही इनपुटची कमतरता झाल्यास प्रोडक्शन ऑपरेशन्सवर विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?…

तुम्ही काय कराल?

एकंदर कंपनीची आर्थिक प्रगती पाहता इथे गुंतवणूक करणे ही एका अर्थाने चांगली संधी आहे, परंतु तरीही चौफेर विचार करूनच गुंतवणूकदारानी यात पुढील पाऊल टाकावे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…