credit score
credit score in marathi
Reading Time: 3 minutes

Credit Score : क्रेडिट स्कोर 

तुमच्या बँक बॅलन्स इतकाच तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) हा सध्या महत्वाचा झाला आहे. क्रेडिट स्कोअर (Credit Score) हा कर्ज घ्यायचं असेल तेव्हा चांगला असावा असा एक समज आहे. पण, अर्थतज्ज्ञ सांगतात की, क्रेडीट स्कोअर हा नेहमीच चांगला असणं हे खूप गरजेचं असतं. क्रेडीट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही कोणतंही कर्ज हे कमी व्याजदराने घेण्यास पात्र असतात. 

एखाद्या अत्यावश्यक परिस्थितीत जर तुम्हाला कर्जाची गरज पडली तर तुमचा चांगला क्रेडीट स्कोअर हा तुम्हाला ते कर्ज अल्पावधीत आणि कमीत कमी कागदपत्रांच्या सहाय्याने मिळवून देऊ शकतो. क्रेडीट स्कोअर चांगला असेल तर तुमच्या बँकेचं स्टेटमेंट तपासणे, उत्पन्नाचा पुरावा देणे या सर्व गोष्टींपासून तुम्हाला वाचायचं असल्यास तुमचं लक्ष नेहमीच क्रेडीट स्कोअर मध्ये होणाऱ्या बदलांकडे असलं पाहिजे. हे सहज शक्य व्हावं यासाठी क्रेडीट स्कोअर म्हणजे काय ? तो का कमी होतो ? आणि काय केल्याने सुधारतो ? हे जाणून घेऊयात. 

हेही वाचा – Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?…

क्रेडीट स्कोअर म्हणजे काय ? 

क्रेडीट स्कोअर हा असा ३ आकडी स्कोअर आहे जो तुमच्या कर्ज घेण्याची ऐपत आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता ही समोरच्याला काही क्षणात सांगत असतो. क्रेडीट स्कोअर हा ३०० ते ९०० या आकड्यांमध्ये असतो. क्रेडिट हिस्ट्री नसल्याने कित्येक लोकांना कर्जाला मुकावं लागतं ही वस्तूस्थिती आहे. वर्ल्ड बँकेने एकदा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगात १९० कोटी लोकसंख्या आजही अशी आहे ज्यांच्याकडे बँक अकाउंट नाहीये आणि त्यांची कधी कोणती क्रेडिट हिस्ट्री तयारच झाली नाहीये. कमी शिक्षण असल्याने या लोकांना क्रेडिट हिस्ट्री म्हणजे काय ? हे अजूनही माहीत नाहीये.

 

कर्ज घेतांना क्रेडीट स्कोअरची विचारणा का होत असते ? 

बँकेत आलेल्या प्रत्येक कर्जाच्या अर्जाची पडताळणी करून त्यावर आपलं मत देणं हे कोणत्याही बँकेसाठी प्रचंड अवघड काम आहे. तुमच्याकडे जर तुमचा क्रेडीट स्कोअर असेल तर तुम्ही बँक किंवा इतर खासगी अर्थसंस्थांचा कागदपत्र पडताळणीचा वेळ वाचवत असतात.  जितका तुमचा क्रेडीट स्कोअर जास्त तितके अधिक कर्ज, मोठ्या क्रेडिट लिमिटच्या क्रेडिट कार्डसाठी आणि कमी व्याजदरासाठी पात्र असतात. 

क्रेडीट स्कोअर हा कमी का होत असतो ? 

१. कर्जाची रक्कम परतफेड करण्यास उशीर होणे : 

क्रेडिट कार्डचं एखादं जरी बिल भरण्यास उशीर झाला तरीही त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर हा कमी होत असतो. बिल भरण्यास जितक्या दिवसाने आपण उशीर करतो तितक्या पटीने क्रेडिट स्कोअरवर फरक पडत असतो. 

 

२. क्रेडिट कार्डचं बिल न भरता येणे : 

एखाद्या महिन्यात असं होऊ शकतं की, तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल भरणं शक्यच नाहीये. अशा वेळी निदान, कमीतकमी देय रक्कम भरावी आणि क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम टाळावा. क्रेडिट कार्डचं बिल भरलंच नाही, असं कधीच करू नये. 

 

३. कर्जासाठी केलेली चौकशी : 

पैशाची अत्यंत गरज असते तेव्हा आपण एकापेक्षा अधिक बँक किंवा अर्थसंस्थांकडे कर्जासाठी अर्ज करत असतो. तुमच्या कर्जासाठी या सर्व संस्थांनी केलेली चौकशी ही तुमच्या क्रेडिट स्कोअर कमी करणारी ठरू शकते. 

 

हेही वाचा – Credit Score: आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे हे ७ घटक…

४. फसवणूकीने करण्यात आलेला एखादा व्यवहार: 

तुमच्या क्रेडिट कार्डवर जर एखाद्या व्यक्तीने फसवणुकीने एखादा व्यवहार केला किंवा तुम्ही भरलेल्या एखाद्या बिलाची नोंद जर क्रेडीट कार्ड कंपनीने केली नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. 

 

क्रेडिट स्कोअर कसा वाढवला जाऊ शकतो ?

१. सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरणे: 

तुम्ही बँकेत केलेल्या एखाद्या ‘फिक्सड डिपॉझिट’च्या आधारे जर बँकेने तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं असेल तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर हा वाढत असतो. तुम्ही बँकेत जमा केलेल्या रकमेच्या ७५ ते ८०%  इतकी या विशेष क्रेडिट कार्डची मर्यादा असते. 

२. वेळेवर कर्जाची केलेली परतफेड : 

एखादं व्यक्तिगत कर्ज किंवा क्रेडिट कार्डचं बिल हे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड ज्याप्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्विस (ईसीएस) पद्धतीने करतो, तीच पद्धत क्रेडिट कार्ड साठी वापरणं हे क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी आवश्यक आहे. 

 

३. क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर टाळणे : 

क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या ७०% पेक्षा अधिक वापर केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर हा कमी होत असतो. तुम्ही जरी क्रेडीट कार्डचं बिल वेळच्या वेळी भरत असलात तरीही तुमच्या क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर हा इतर कर्ज देऊ शकणाऱ्या कंपन्यांना तुमचा क्रेडिट रेकॉर्ड हा ‘ हाय-रिस्क डिफॉल्टर’ म्हणून जात असतो. क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू, सेवांच्या रकमेत सूट मिळवणे, कॅशबॅक मिळवणे ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा पर्यंत तुम्ही क्रेडिट कार्डचं पूर्ण बिल प्रत्येक महिन्यात भरू शकतात तेव्हा पर्यंतच हे चांगलं आहे. अन्यथा, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होण्यास लगेच सुरुवात होते. 

 

हेही वाचा – Credit Score: क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याचा खरंच फायदा होतो का?…

४. अतिरिक्त उधारी करणे टाळणे : 

जर तुम्ही एका महिन्यात ५ वस्तू विकत घेत आहात आणि जर त्या पाचही वस्तू क्रेडिटवर घेत असाल तर ते योग्य नाहीये. असं केल्याने बँक, अर्थसंस्थांसमोर तुमचा रेकॉर्ड हा ‘उधारी प्रिय ग्राहक’ असा जातो आणि त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरीत परिणाम होत असतो. 

क्रेडिट स्कोअर हा नेहमीच महत्वाचा होता. पण, त्याबद्दल अपेक्षित इतकं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. जास्तीत जास्त वस्तू पैसे असल्यावर नगदीने घ्यायची स्वतःला सुरुवात ललावल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढू शकतो इतकं लक्षात असू द्यावं. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…