Swift Restriction On Russia : SWIFT वरील बंदीचा काय होईल रशियावर परिणाम? 

Reading Time: 2 minutes

SWIFT म्हणजे काय? 

 • रशिया ज्याप्रकारे युक्रेनवर आक्रमण करत आहे, हे बघता रशियाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लावले आहेत. अशातच आता अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी काही रशियन बँकांना SWIFT System पासून वगळले असल्याचे जाहीर केले आहे.  
 • सध्या सर्वत्रच SWIFT ची चर्चा होत आहे. SWIFT म्हणजे काय?  SWIFT कसे काम करते? आणि SWIFT सिस्टीम वरील बंदीमुळे रशियावर काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Russian Ukraine Impact On Indian Economy : रशिया युक्रेन युध्दाचे भारतावर होतील ‘हे’ परिणाम…

SWIFT म्हणजे काय? 

 • SWIFT म्हणजे Society for Worldwide Interbank Financial Telecommunications 
 • SWIFT ही एक बँक किंवा पेमेंट प्रदान करणारी संस्था नसून SWIFT हे एक मेसेजिंग नेटवर्क आहे. हे नेटवर्क आंतरराष्ट्रीय बँकांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करते. या नेटवर्कमुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरळीत होण्यास मदत होते.
 • SWIFT ची स्थापना १९७३ मध्ये १५ देशांमधील २३९ बँकांच्या पाठिंब्याने झाली. बेल्जियम येथे SWIFT चे मुख्यालय आहे. व युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, भारत, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यांसारख्या अनेक देशांमध्ये शाखा कार्यालये आहेत.
 • सध्या SWIFT ही प्रणाली २०० हून अधिक देशांमधील ११,००० पेक्षा जास्त बँकांद्वारे वापरली जाते. 

SWIFT कसे काम करते? 

 • SWIFT सिस्टिमचा वापर करणाऱ्या प्रत्येक संस्थेला ८ किंवा ११ अंकाचा कोड दिला जातो. या कोडचा उपयोग  आंतराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी होतो.
 • उदाहरणार्थ भारतीय व्यक्तीला ज्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे. त्याला त्याच्या कॅनडामधील मित्राला काही पैसे पाठवायचे असतील तर खाते क्रमांक, शाखेचे नाव याच बरोबर SWIFT कोड सबमिट करणे देखील गरजेचे असते.

रशियावर SWIFT बंदी करण्यामागचा उद्देश काय?

 • रशियन बँकांना SWIFT सिस्टीम मधून वगळल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Drone Industry trends  : जाणून घ्या ड्रोन इंडस्ट्रीचे लेटेस्ट ट्रेंड्स…

या निर्बंधांचा रशिया वर काय परिणाम होईल ?

 • SWIFT वरील बंदीमुळे रशियाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश करता येणार नाही.
 • अमेरिका व युरोपियन देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियन कंपन्यांना इतर देशांसोबत असलेले आंतरराष्ट्रीय व्यवसाय करणे कठीण होऊ शकते. SWIFT च्या बंदीमुळे रशियातील तेल आणि वायू उत्पादनाच्या अंतरराष्ट्रीय विक्रीतून होणाऱ्या नफ्यामध्ये मोठी घट होण्याची देखील शक्यता आहे. रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकांसोबत पैशांची देवाण-घेवाण करता येणार नाही याच कारणामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe to our YOUTUBE Channel: CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.