couple financial planning
couple financial planning
Reading Time: 3 minutes

Financial Planning For couples

‘आर्थिक बचत’ ही सवय जितक्या कमी वयात लागली तितकं आपलं भविष्य उज्वल असणार हे सर्वांनाच माहीत आहे. विशेषतः विवाहित व्यक्तींना भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन पती पत्नींना एकत्र येऊन बचत करणे व योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे या गोष्टीला पर्याय नाही. 

  • आर्थिक नियोजन करत असतांना उत्पन्नाचे मार्ग वाढवणे आणि कमावलेले पैसे  योग्य ठिकाणी गुंतवणे या दोन्ही गोष्टींचा समान महत्व देऊन विचार होणे आणि त्यावर कृती होणे हे महत्वाचं असतं. 
  • “अमेरिकेतील एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, कोणताही संसार टिकण्यासाठी पैसे हा महत्वाचा मुद्दा असतो. दोघांनी एकत्र येऊन जर आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं तर त्यांच्यातील सर्व मतभेद हे  कमी होऊ शकतात.” 

पती पत्नीने एकत्रपणे आर्थिक नियोजन आणि पैशांची  गुंतवणूक कुठे केली जाऊ शकते ? ते या ७ मुद्द्यातून जाणून घेऊयात: 

१. आर्थिक नियोजन म्हणजे काय ? 

  • ‘आर्थिक नियोजन’चं महत्व हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण, व्याख्या सांगायची तर अशी होईल: “एका महिन्यात मिळणारे आर्थिक उत्पन्न आणि खर्च याचा तपशील ठेवून होणाऱ्या खर्चाची विभागणी आवश्यक आणि अनावश्यक या प्रकारात प्रामाणिकपणे मांडणे म्हणजे ‘आर्थिक नियोजन’ होय. हे साध्य करत असतांना आपल्याला होणारं उत्पन्नच कमी आहे की केवळ खर्च अधिक आहे ? याचा सुद्धा विचार पती पत्नीने एकत्रितपणे केला पाहिजे. 
  • पैसे वाचवून आणि योग्य ठिकाणी गुंतवून आपण आपलं कोणतं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत ? हे दोघांनाही माहीत असणं गरजेचं आहे. 

हेही वाचा – Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम…

 

२. आधी बचत करणे, मग खर्च करणे: 

  • प्रत्येक दाम्पत्याने हे लक्षात ठेवावं की, आधी बचत, मग खर्च. उत्पन्नातील ठराविक रक्कम आधी बचत करावी आणि मगच खर्च करण्यास सुरुवात करावी. 
  • खर्च करून उरलेल्या पैशांची बचत करायचं ठरवल्यास अपेक्षित बचत होऊ शकत नाही हे कित्येक अर्थतज्ज्ञांनी सांगितलं आहे. वॉरेन बफे यांनी सुद्धा हे सांगितलं आहे की, “बचत केल्यानंतर जी रक्कम वाचेल, तितकीच केवळ खर्च करण्यासाठी रक्कम उपलब्ध आहे हे लक्षात ठेवा.” 

३. खर्चाचा अंदाज घेणे, रक्कम ठरवणे: 

  • प्रत्येक दाम्पत्याने आपल्या आयुष्यातील मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींसाठी नेहमी खर्चाची  यादी आधी तयार करण्याची सवय लावावी. 
  • खर्च रक्कम किती कमी करता येतील याकडे तटस्थपणे बघून निर्णय घेतले पाहिजे. 

४. विमा कवच तयार करणे: 

  • सुंदर आयुष्याची कल्पना करत असतांनाच या रस्त्यात येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांचा सुद्धा प्रत्येक जोडीने एकत्रितपणे विचार केला पाहिजे. 
  • प्रकृती बिघडू शकते, एखादा अपघात होऊ शकतो किंवा घरातील कमावत्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं हा विचार करून योग्य वेळी आवश्यक ते ‘विमा कवच’ धारण करून स्वतःला आणि कुटुंबाला अचानकपणे उदभवू शकणाऱ्या एखाद्या परिस्थितीसाठी तयार केलं पाहिजे. 
  • वन विमा, टर्म प्लॅन सारख्या योजनांचा सखोल अभ्यास करून योग्य  विमा विकत घ्यावा आणि ऐनवेळी होऊ शकणाऱ्या अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

५. विविध पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे: 

  • शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करतांना ‘शॉर्ट टर्म’ आणि ‘लॉंग टर्म’ अशा दोन्ही प्रकारच्या परतावा देणाऱ्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. शेअरमार्केट मधून मिळणारा परतावा हा अनिश्चित असतो. 
  • योग्य परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी ‘इक्विटी ओरियंटेड म्युचल फंड’ मध्ये दीर्घकालीन  गुंतवणूक करावी आणि त्यासाठी एसआयपी म्हणजेच ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ची निवड करावी. 

हेही वाचा – Financial year 2020-21: गेल्या वर्षाने दिली आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण…

 

६. गुंतवणूक तपासत रहाणे: 

  • आपलं आर्थिक ध्येय आणि त्यासाठी आपण करत असलेली आर्थिक गुंतवणूक ही योग्य पटीत आहे की नाही ? हे सतत तपासलं पाहिजे. 
  • सध्या सुरू असलेली गुंतवणूक जर कमी पडत असेल तर त्यामध्ये योग्य वेळी वाढ केली पाहिजे. प्रत्येक दाम्पत्याने इतर खर्चांवर एकमताने नियंत्रण ठेवल्यास हे शक्य होऊ शकतं. 

७. आर्थिक सल्लागाराची मदत घेणे: 

  • आपण केलेलं आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक ही योग्य आहे की नाही हे ठराविक अंतराने आर्थिक सल्लागाराच्या मदतीने तपासून घेणं गरजेचं आहे. 
  • आर्थिक सल्लागाराची मदत घेत असतांना त्यांना प्रत्येक आर्थिक माहिती ही खरी आणि पूर्ण सांगावी. आर्थिक सल्लागाराने सुचवलेल्या उपायांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कृती करावी. 

८. अधिक व्याज असलेली कर्ज आधी फेडणे: 

  • गृहकर्ज, व्यक्तीगत कर्ज, क्रेडिट कार्ड सारखे विविध कर्ज आपण घेत असतो. यापैकी जे कर्ज तुमच्याकडून अधिक व्याज वसूल करत आहे तपासावं आणि ते त्वरित बंद करावं. 
  • क्रेडिट कार्ड सारखा सर्वाधिक व्याज घेणारा पर्याय हा तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयापासून लांब करू शकतो हे लक्षात घ्यावं आणि त्यानुसार कृती करावी. 

९. मोठे खर्च करतांना सतर्क रहावे:

  • मोठे खर्च करतांना जसं की घर विकत घेतांना, कार विकत घेतांना तुमच्या गरजेचा तटस्थपणे विचार करावा. 
  • भावनिक निर्णय न घेता कमीत कमी पैशात आपली गरज कशी भागेल याचा विचार करून निर्णय घ्यावा. मोठे खर्च करतांना अधिक खर्च केलेले पैसे हेच आपल्याला संकटकाळी कमी पडू शकतात हे प्रत्येक दाम्पत्याने लक्षात ठेवलं पाहिजे. 

१०. आर्थिक गुंतवणूक करताना चर्चा करणे: 

  • पती पत्नी जर एकत्रितपणे आर्थिक गुंतवणूक करत असतील किंवा नसतील पण एकमेकांबरोबर चर्चा करूनच त्यांनी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करावी. 
  • दोघांची गुंतवणूक जरी वेगळ्या पर्यायांमध्ये असली तरीही अंतिम ध्येये एकमेकांशी चर्चा करूनच ठरवायला हवीत. 

हेही वाचा – Types of Financial Planning: आर्थिक नियोजनाचे हे ७ महत्वाचे प्रकार, तुम्हाला माहिती आहेत का?…

 

सुखाचा संसार करणे ही पती पत्नी दोघांचीही इच्छा असते. 

हे साध्य करण्यासाठी आधी ‘आर्थिक नियोजन’ करावे म्हणजे बरेच आर्थिक प्रश्न समोर येण्याआधीच आपल्याकडे त्यांची उत्तरं तयार असतील. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…