चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैसे कमावणे जितकं महत्वाचं आहे तितकंच ते वाचवणं महत्वाचं आहे हे कोरोनाच्या मागच्या दोन वर्षाने आपल्याला शिकवलं आहे. पैशांचं महत्व पटलं की, बचत करणं हे सहज शक्य होऊ शकतं. पण, पैसे नेमके वाचवायचे कसे ? याचं ज्ञान सुरुवातीला प्रत्येकाला नसतं. बहुतांश लोक हे पैसे खर्च करण्याच्या बाबतीत जवळपास सारख्याच चुका करतात आणि मग पैसे बचत करण्यास सुरुवात करतात. पारंपरिक पद्धतीनेच केवळ पैशांची बचत न करता अजून कोणत्या नवीन मार्गांनी पैसे गुंतवत ठेवून पैशांची बचत होऊ शकते ? नव्याने पैशांची बचत करणाऱ्या लोकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ?
‘इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ करणं का आवश्यक आहे ? हे खालील ५ मुद्द्यातून जाणून घेऊयात :
१. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ‘योग्य’ अशी कोणती वेळ नसते:
- शेअर मार्केट कधी चांगलं असेल ? आणि यावेळी गुंतवणूक केल्यास चांगलाच परतावा मिळेल हे कोणीच खात्रीलायक पद्धतीने सांगू शकत नाही. शेअर मार्केटचे अभ्यासक हे केवळ उपलब्ध माहितीनुसार मार्केटबद्दलच्या संभावना व्यक्त करत असतात. पण, कोणताच तज्ज्ञ हे सांगू शकत नाहीत की, शेअर मार्केट मध्ये उतरण्याची किंवा मार्केट मधून बाहेर पडण्याची ही योग्य वेळ आहे.
- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास कोणत्या वेळी सुरुवात करावी ? यापेक्षा शेअर मार्केटमध्ये तुम्ही तुमचे पैसे किती वेळेसाठी गुंतवले आहेत हे जास्त महत्वाचं मानलं जातं. शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे तुम्ही जितक्या जास्त वेळेसाठी गुंतवणूक करताल, तितकी चांगलं हे सर्वच अर्थतज्ज्ञ नेहमीच सांगतात.
हेही वाचा – Safety Retirement Tips : निवृ्त्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी वाचा ‘या’ टिप्स…
२. पोर्टफोलिओ मध्ये समतोल राखणे:
- इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्सची संख्या वाढवतांना कमी वेळात खूप जास्त बदल तर होत नाहीये हेसुद्धा बघितलं पाहिजे. आपण घेऊन ठेवलेला प्रत्येक शेअर हा नफा कमावून देत आहे की नाही हे बघितलं पाहिजे.
- पोर्टफोलिओ विविध रंगी बनवण्याच्या नादात तोटा वाढवणाऱ्या शेअर्सला सांभाळून ठेवू नये. पोर्टफोलिओत विविध इंडस्ट्रीचे शेअर्स किंवा गुंतवणुकीचे पर्याय (जसं की, शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट, हायब्रीड, ग्लोबल फंड) सुरू ठेवण्याचा उद्देश हा जास्त नफा कमावणे आहे हे गुंतवणूकदाराने लक्षात ठेवलं पाहिजे.
- जास्त नफ्यासाठी जर तुमच्या ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह फंडची माहिती घेऊन आपली जास्त गुंतवणूक ही ऍक्टिव्ह फंडमध्ये ठेवावी आणि अधिकाधिक नफा कमावण्याचा प्रयत्न करावा.
३. ‘धोका पत्करणे’ यावरून गुंतवणूक ठरवू नये:
- नियमितपणे मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना हे माहीत असतं की, मार्केट मधून मिळणारा परतावा आणि धोका या गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
- अधिक धोका म्हणजे अधिक फायदाच असंच नसतं किंवा कमी धोका म्हणजे नुकसानच असा कोणता नियम नाही.
- कोणत्याही गुंतवणुकीत थोडा फार धोका हा असतोच. प्रत्येकवेळी धोक्याला घाबरू नये. धोक्याची तीव्रता बघून निर्णय घ्यावा आणि नफा कमावण्याची जास्त शक्यता असेल तिथे गुंतवणूक करावी.
४. गुंतवणुकीचा दर्जा राखा:
- कमी काळात फायदा कमावण्याची इच्छा बाळगून सतत नवीन कंपनीत गुंतवणूक करणे हे काही वेळेस धोक्याचं सुद्धा ठरू शकतं. ज्या कंपनी मार्केटमध्ये दूरदृष्टी ठेवून उतरल्या आहेत त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणं हे कधीही जास्त फायद्याचं मानलं जातं.
- गुंतवणूकीचा दर्जा राखणे म्हणजे अशा कंपनीत गुंतवणे ज्या नफा कमवून देणाऱ्या तर आहेतच आणि शिवाय त्या कंपनीचे ध्येय धोरणं ही सुस्पष्ट आहेत.
५. ‘असेट अलोकेशन’वर लक्ष असू द्यावं:
- आपण ज्या कंपनीत आपली आर्थिक गुंतवणूक करत आहोत ती कंपनी नफा मिळवून देत असतांनाच त्या किती टक्के शेअर्स विकत आहेत याकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे. तुमच्या गुंतवणूकीची रक्कम, त्यावर असलेला धोका, गुंतवणूकीचा उद्देश या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावेत की डेब्ट फंड की हायब्रीड फंड घ्यावेत हा अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा.
- कंपनीच्या या अभ्यासामुळे, कंपनीची दिशा समजून घेतल्याने तुमचा नफा तर वाढेलच, शिवाय धोकासुद्धा कमी होईल.
हेही वाचा – Term Insurance Plan : मुदत विमा योजना निवडताना ‘या’ गोष्टी घ्या विचारात…
नवीन गुंतवणूकदार व्यक्तींनी वरील मुद्द्यांचा अभ्यास करून गुंतवणूक करावी आणि होणाऱ्या नफा आणि नुकसान याची जबाबदारी स्वतःवर घ्यावी आणि दीर्घकाळ गुंतवणूक करत रहावी हे अत्यंत महत्वाचे आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies