Unicorn Startup in India
‘स्टार्टअप’ हे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारी संकल्पना आहे. हे मागच्या काही वर्षात सर्वांनाच पटलं आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या मुद्रा योजनेमुळे आजचा तरुण हा केवळ नोकरीवर अवलंबून नसून तो स्वतःच्या व्यवसाय कौशल्याला वापरून आपलं व्यवसाय विश्व निर्माण करू शकतो हे कित्येक तरुणांनी सिद्ध केलं आहे. इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वाढलेला वापर आणि आपली लोकसंख्या हे ‘स्टार्टअप’ यशस्वी होण्यामागची प्रमुख कारणं सांगता येतील. भारतातील ‘स्टार्टअप’ हे अल्पावधीतच मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत आणि मोठी आर्थिक उलाढाल करत आहेत. भारतात सुरू झालेल्या स्टार्टअप पैकी ज्या स्टार्टअपचा टर्नओव्हर हा १ बिलियन युएस डॉलर्स म्हणजेच ७००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना ‘युनिकॉर्न’ समूहात समाविष्ट केलं जातं.
‘युनिकॉर्न’ स्टार्टअप हा शब्द ‘काऊबॉय व्हेंचर्स’च्या संचालिका ऐलीन ली यांनी शोधला आहे.
जगभरातील ज्या स्टार्टअपचे मूल्यांकन १ बिलियन यूएस डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना ‘युनिकॉर्न’ असे संबोधले जाते. स्टार्टअप ही संकल्पना अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यशस्वी स्टार्टअपचं कौतुक करण्यासाठी ‘युनिकॉर्न’ हा क्लब सुरू केल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. ‘युनिकॉर्न’ची संकल्पना ही तेव्हापासून त्याच अर्थाने ओळखली जाते. दरवर्षी ‘युनिकॉर्न’ समूहात कित्येक भारतीय कंपन्यांचा समावेश होत आहे ही आपल्या अर्थकारणासाठी अभिमानाची बाब असायला पाहिजे.
हेही वाचा – Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १…
युनिकॉर्न स्टार्टअप वेगळं काय करतात ?
१. पारंपरिक गोष्टींमध्ये बदल घडवून आणतात:
– कोणतीही स्टार्टअप कंपनी ही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती लोकांच्या जगण्यात काही बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगून असतात. उदाहरणार्थ, ‘उबर’ ही अशी स्टार्टअप आहे ज्याने लोकांचं प्रवास करण्याची पद्धत बदलून टाकली. ‘एअरबीएनबी’ हे एक असं स्टार्टअप आहे ज्याने प्रवास करत असतांना लोकांच्या रहाण्याची पद्धत बदलवली आहे. तसंच ‘स्नॅपचॅट’ने सोशल मीडिया कसा कमी वेळात हाताळायचं ? हे शिकवलं आहे.
२. प्रथम सुरुवात करणारे:
‘युनिकॉर्न’ स्टार्टअपचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की, ते कोणतीही वस्तू किंवा सेवा पुरवण्याची सुरुवात करत असतात. एखादी वस्तू किंवा सेवा जी लोकांची आधी गरज नव्हती ती गरज निर्माण करण्यात हे स्टार्टअप यशस्वी होतात. आपण पुरवणाऱ्या वस्तू किंवा सेवांमध्ये नेहमीच नावीन्य पुरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे असतात.
३. तंत्रज्ञानाचा योग्य वापर :
युनिकॉर्न स्टार्टअपचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करतात. सामान्य माणसांना त्यांचं ऍप्लिकेशन सहजतेने वापरता यावं याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. उबर, एअरबीएनबी सारख्या स्टार्टअपने आपल्या यंत्रणेवर जवळपास ८७% खर्च केल्याचं सांगितलं आहे.
४. ग्राहकांवर लक्ष केंद्रित असतं:
– युनिकॉर्न स्टार्टअपपैकी बहुतेक स्टार्टअप्स हे छोट्या कंपन्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करतात . छोट्या व्यवसायिकांना मदत व्हावी या हेतूने निर्माण झालेले हे स्टार्टअप नेहमीच त्यांच्या वस्तू आणि सेवांची किंमत कमी ठेवत असतात. उदाहरणार्थ ‘स्पोर्टीफाय’ हे ऍप्लिकेशन ज्याने आपली गाणे ऐकवण्याची सेवा ही आधीच्या सर्व ऍप्लिकेशनच्या किमतीपेक्षा कमी ठेवली ज्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झालं आणि ‘युनिकॉर्न’ समूहात समाविष्ट झालं.
५. खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांची मदत:
– बहुतांश युनिकॉर्न स्टार्टअपचे मालक हे खासगी क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्ती आहेत ज्यामध्ये काही उद्योजक पैसे गुंतवतात आणि त्यांची मार्केट किंमत कित्येक पटीने वाढवतात.
हेही वाचा – Startup: मंदीतही स्टार्टअप्सनी शोधली संधी…
जगात सध्या एकूण ३६१ युनिकॉर्न स्टार्टअप आहेत. भारतीय स्टार्टअप पैकी १६ स्टार्टअपचा समावेश ‘युनिकॉर्न’ समूहात होतो. युनिकॉर्न स्टार्टअपच्या जागतिक यादीत भारताआधी इंग्लंड देशाचे १९ युनिकॉर्न स्टार्टअप सध्या कार्यरत आहेत. युनिकॉर्न स्टार्टअपची पुढची पायरी ही सुपर युनिकॉर्न ही असते. ‘सुपर युनिकॉर्न स्टार्टअप’ची मार्केट किंमत ही १०० बिलियन युएस डॉलर्स म्हणजेच ७ लाख कोटी रुपये इतकी असते. ड्रॉपबॉक्स, स्पेसएक्स आणि ‘वी वर्क’ सारखे स्टार्टअप हे या यादीत समाविष्ट झाले आहेत.
भारतातील काही ठळक युनिकॉर्न स्टार्टअपची यादी आणि त्यांची मार्केट किंमत ही खालीलप्रमाणे आहे:
१. फ्लिपकार्ट – २००७ मध्ये सचिन आणि बिन्नी बन्सल या दोन मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या युनिकॉर्न स्टार्टअपची सध्याची मार्केट किंमत ही १५.५ बिलियन यूएस डॉलर्स म्हणजेच १ लाख ८ हजार कोटी रुपये इतकी आहे.
२. पेटीएम – २०१० मध्ये विजय शेखर यांनी सुरु केलेल्या या स्टार्टअपने आपल्या सेवांमध्ये सुधारणा केल्या आणि युनिकॉर्न स्टार्टअप मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. पेटीएमची आजची मार्केट किंमत ही २ बिलियन युएस डॉलर्स म्हणजेच १४००० कोटी रुपये इतकी आहे.
३. मिशो – २०१५ मध्ये संजीव आणि आत्रेय बर्नवाल यांनी सुरू केलेलं हे स्टार्टअप छोट्या व्यवसायिकांना वस्तूंची विक्री करता यावी या उद्देशाने तयार करण्यात आलं होतं. आज या हे स्टार्टअपची मार्केट किंमत ही ६८ मिलीयन यूएस डॉलर्स म्हणजेच ४७६ कोटी रुपये इतकी आहे.
भारतातील इतर हे युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये ‘फार्मईझी’, ‘क्रेड’, ‘अर्बन कंपनी’, ‘झेटा’, ‘भारतपे’, ‘रेझरपे’, ‘माईंडटिकल’ सारख्या यशस्वी स्टार्टअपचा समावेश होतो.
भारतात आमलात आलेल्या जीएसटी मुळे करप्रणाली सोपी झाली आणि त्यामुळे सुद्धा स्टार्टअप सुरू करणे आणि त्यांची ग्राहक वाढवणे हे सोपं झालं असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.
हेही वाचा – Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २…
‘युनिकॉर्न’ स्टार्टअप ही संकल्पना जरी अवघड वाटत असली तरीही भारतात चांगली सेवा दिल्यास हे इतर देशांच्या मानाने कमी वेळात शक्य आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्या व्यवसायातील बारकाव्याचा अभ्यास करण्याची आणि आपल्या स्टार्टअपची आर्थिक बाजू सक्षम ठेवण्याची गरज आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies