Reading Time: 3 minutes

Startup Funding

मागच्या भागात आपण स्टार्टअप फंडिंग (Startup Funding) आणि त्याच्या ३ पर्यायांची माहिती घेतली या भागात आपण उर्वरित ३ फंडिंग पर्यायांची माहिती घेऊया. 

भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १

४. एंजल इन्वेस्टर्स (Angel Investors) –

  • असे काही गुंतवणूकदार असतात जे भविष्यात यशस्वी होऊ शकतील अशा स्टार्टअप्सच्या शोधात असतात. या स्टार्टअपसाठी ते गुंतवणूक म्हणून रूपांतरित कर्ज किंवा इक्विटीच्या माध्यमातून पैसे देतात. 
  • या काही व्यक्ती एकत्र येऊन त्या स्टार्टअप साठी लागणारे भांडवल किंवा संशोधन करण्यासाठी काम करतात. तसेच, त्यांच्या पोर्टफोलियो अशा कंपन्याना मार्गदर्शन करतात किंवा सल्ला देण्याचं काम करतात. यांना इंग्रजीत ‘एंजल इन्वेस्टर ‘ असं म्हणतात. जे अगदी देवदूतासारखे मदतीला येतात ते म्हणजे एंजल इन्व्हेस्टर्स.  
  • एंजल इन्वेस्टर्स उद्यम भांडवलदारांच्या तुलनेत कमी प्रमाणात गुंतवणूक करतात. 
  • ‘एंजल फंड’ची काही उदाहरणे हे देता येतील. सध्या चर्चेत असणाऱ्या गुगल, याहू, युबर, अलिबाबा या कंपन्या एंजल गुंतवणूकदारांची मदत घेतात. या पर्यायाचा महत्त्वाचा फायदा असा की हे गुंतवणूकदार अनुभवी असतात, त्यांनी सगळे टप्पे पार केलेले असतात, म्हणून यांच्याकडून नवीन शिकायला ही मिळतं आणि योग्य अभिप्राय सुद्धा. 
  • स्टार्टअप च्या कठीण काळात काही आव्हाने पेलण्यासाठी यांची मदत होते. ‘इंडियन एंजल नेटवर्क’, ‘मुंबई एंजल्स’, ‘हैद्राबाद एंजल्स’ हा काही एंजल इन्वेस्टर्सची प्रसिद्ध उदाहरणे आहेत. 

नोकरी करू की व्यवसाय?

. बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात भांडवल मिळवणे 

  • सर्वात पारंपारिक भांडवलाचा स्रोत म्हणून बँकेकडून कर्ज घेणे. अर्थात कर्ज देण्याआधी काही बाबींची चौकशी बँकेकडून केली जाते. आपण सुरू करत असलेल्या व्यवसायाचं स्वरूप, उत्पन्न क्षमता, व्यवसायाचा अनुभव व कौशल्य , बँकेची रक्कम परत करण्याची क्षमता या सा-या गोष्टींचा विचार बँक करते. बँकेच्या नियम आणि अटींनुसार विविध पर्यायांद्वारे कर्ज मिळवता येते. 
    • मुदत कर्ज – व्यवसायाला लागणारी यंत्रसामग्री, उपकरणे खरेदीसाठी मुदत कर्ज मिळते. 
    • कार्यरत भांडवलासाठी कर्ज – या पर्यायानुसार ग्राहकांना परपुरवठा मिळतो. व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लागणारे भांडवल हे त्या व्यवसायाचं मॉडेल पाहून बँक मुल्यांकन करते. 
    • मालमत्ता कर्ज-  बँकेकडून ७-१५ वर्षांच्या कालावधीत तारण ठेवलेल्या मालमत्तेवर मूल्यांकित बाजारभावानुसार ७० ℅ किंमतीवर कर्ज देण्यात येते. यामध्ये निवासी मालमत्ता किंवा व्यवसायिक मालमत्ता असू शकते.यामुळे स्टार्टअप व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करतात , तसेच कर्ज परत करण्याची खात्री, कामाचा व व्यवसायाचा विशेष अनुभव या सगळ्यांची माहिती बँकेला देणे बंधनकारक असते. 
  • भारतातील जवळपास सगळ्याच बँका विविध परर्यांद्वारे एसएमई वित्त पुरवठा करतात. उदाहरणार्थ, मोठ्या बँका – बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँकांकडे मुक्त व्यवसाय कर्ज उपलब्ध आहे आणि वेगवेगळे ७ ते ८ पर्याय सुद्धा आहेत. 
  • अमेरिकेमध्ये ‘कॅब्बेज’ सारख्या साईट्स काही मिनिटात भांडवलासाठी लागणारं कर्ज मिळवण्यासाठी मदत करतात. कॅब्बेज केवळ क्रेडिट स्कोर नव्हे तर वास्तविक जीवनाचा आणि राहणीमानाचा आढावा घेऊन लहान व्यवसायासाठी लागणारे कर्ज मंजूर करते. 

सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी (One Person Company)

६. शासकीय उपक्रमांद्वारे भांडवल मिळवणे 

  • भारतातील स्टार्टअप यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्प २०१४-१५ मध्ये १०,००० कोटींचा निधी मंजूर केला आहे. 
  • नाविन्यपूर्ण व्यवसायिक कंपन्यांना चालना देण्यासाठी सरकारने ‘बँक ऑफ आयडियाज् अँण्ड इन्वोव्हेशन’ हा उपक्रम सुरू केला आहे. 
  • सरकारने ‘मुद्रा योजना ‘ राबवली आहे ज्यामध्ये सुमारे १० लाख एसएमई लाभार्थींना २०००० कोटी दिले जातील. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या व्यवसायाची योजना सादर करून कर्जासाठी अर्ज करू शकता. कर्ज मंजूर झाले की तुम्हाला एक मुद्रा कार्ड मिळेल जे क्रेडिट कार्ड सारख वापरलं जातं. कच्चा माल खरेदी किंवा इतर खर्चासाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता. 
  • छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘केरळ राज्य स्वयं उद्योजकता विकास’, ‘महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र’, ‘राजस्थान स्टार्टअप फेस्ट’ या काही योजना विविध राज्यात राबविण्यात आल्या. कर्ज मिळवण्यासाठी लागणारी पात्रता आणि नियम व अटींचे व्यवस्थित पालन केल्यास आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. शासनाकडून राबविण्यात येणा-या योजना माहित होण्यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे. 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

व्यवसायासाठी लागणारे भांडवल आपण स्वबळावर प्रत्येक वेळेस उभे करू शकत नाहीत म्हणून वर दिलेल्या पर्यायांआधारे आपण योग्य प्रक्रिया पार पाडून भांडवल मिळवू शकता. कर्ज किंवा कोणाकडून पैसे उसने म्हणून मिळवणे काहीेवेळा सुलभ होते पण व्यवसाय मालकाने आपल्याला किती आर्थिक गरज आहे याच भान ठेवूनच पावले उचलावीत. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.