Startup Funding
Reading Time: 3 minutes

Startup Funding

सध्या युवावर्गाला ९ ते ७ च्या नोकरी करण्यापेक्षा स्टार्टअपचे आकर्षण वाटते. पण अनेकदा कितीही चांगली योजना तयार असली प्रश्न असतो तो स्टार्टअप फंडींगचा (Startup Funding). आजच्या लेखात आपण स्टार्टअप आणि स्टार्टअप फंडिंगबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

  • मोदी सरकारच्या काळातील “स्टार्टअप इंडिया, स्टँटअप इंडिया” या योजनेमुळे ‘स्टार्टअप’ हा शब्द जास्त प्रचलित झाला. स्टार्टअप म्हणजे विशिष्ट कौशल्य असणा-या काही लोकांचा समूह म्हणजे उद्योजक किंवा एखादी व्यक्ती वैयक्तिक पातळीवर सुद्धा एखाद्या व्यवसायाचं मॉडेल प्रभावीपणे विकसित करण्यासाठी उद्योजकांच्या मदतीने नव्याने चालू केलेली कंपनी किंवा प्रकल्प. 
  • स्टार्टअप म्हणजे उद्योजकता. सध्या भारतात स्टार्टअप सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या पूरक वातावरण आहे. जे खरंच स्वत:चा व्यवसाय करू इच्छितात अशा लोकांसाठी सरकारने अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार,पहिल्या वर्षात ९४℅ व्यवसाय अयशस्वी होतात. कल्पनेपासून प्रत्यक्षात व्यवसाय चालू होऊन उत्पन्न मिळवणे हा दीर्घ प्रवास आहे. या प्रवासात जोडीला बक्कळ भांडवल असणं गरजेचं आहे. भांडवल किती लागेल हे पूर्णपणे व्यवसायाच स्वरूप कसं आहे यावर अवलंबून असते.व्यवस्थित नियोजन व भविष्यनिष्ठ दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. 

निधी (फंडिंग) –

  •  कोणताही छोटा किंवा मोठा व्यवसाय भांडवलाशिवाय होऊ शकत नाही. पुरेशा भांडवलाच्या जोरावरच आपण व्यवसायात उतरू शकतो. म्हणूनच निधी आणि निधी उभारणी या दोन्ही मूलभूत गोष्टी स्टार्टअपच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असतात.
  • कुठलंही झाड लावायचं असेल, तर सर्वप्रथम त्या झाडाच्या बिया असणे आवश्यक आहे. तसंच स्टार्टअपसाठी लागणारा प्राथमिक निधी म्हणजे इंग्रजीत ”सीड फंडिंग’. पुढे निधी उभारण्याची प्रक्रिया ए, बी, सी च्या मालिकेनुसार पूर्ण केली जाते. 
  • ‘सीड फंडिंग’ मध्ये प्राथमिक निधीचा समावेश असतो. तर एक, बी, आणि सी यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील स्टार्टअपच्या बांधणीसाठी लागणा-़या निधीचा समावेश असतो. तसेच, यामध्ये इच्छुक गुंतवणूकदारांचाही समावेश असतो. 
  • संपूर्ण स्टार्टअपची बांधणी, अंमलबजावणी आणि  विस्तार या तिन्ही गोष्टी निधी या विषयावर अवलंबून असतात. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

 काही यशस्वी स्टार्टअप फंडिंगचे  (निधी) पर्याय-  

१. सेल्फ फंडिंग- 

  • भारतात धंदा किंवा व्यवसाय म्हणजे मोठी जोखीम समजली जाते. व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक नफ्याच्या रूपात परत मिळेल ही प्रत्येकाची अपेक्षा असते. 
  • यादृष्टीने व्यावसायाच्या काही कल्पना व उद्दिष्टे आखावी लागतात. भांडवल उभे करावे लागते. पण जर आपली कल्पना किंवा उद्दिष्टे इतरांना किंवा सहवासातील व्यक्तींना समजावून सांगणे कठीण असेल किंवा त्यांना ते पटलं नाही, तर अशा लोकांकडून भांडवलाची अपेक्षा करणं चूक आहे. तेव्हा ‘क्राऊड फंडिंग’ चा पर्याय कामी येत नाही. अशावेळी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या आर्थिक स्रोतांच्या माध्यमातून आपण सुरूवात करू शकतो. 
  • यामध्ये स्वत:ची कल्पना सत्यात उतरवण्याची संधी मिळते व पुढील गुंतवणूकीसा़ठी गरज भासल्यास इतर गुंतवणूकदारांना आपण विश्वास देऊ शकतो. 
  • ‘बूटस्टॅपिंग’ या संज्ञे प्रमाणे आपण इथे स्वत: वित्त पुरवठा करून व्यवसायाची सुरूवात करू शकता, जो नक्कीच इतरांसाठी आदर्श ठरू शकतो. यामध्ये आपण स्वतः च स्वत:चे बॉस म्हणून काम पाहू शकता, आपला फायदा किंवा नुकसान स्वत:च पेलले तर इतर कोणाला जबाबदार राहणार नाही. 

.  क्राऊड फंडिंग – 

  • या पर्यायामध्ये एकापेक्षा जास्त गुंतवणूकदार एकत्र येऊन उद्योगाची कल्पना, नियोजन, प्रत्यक्षात कृती, मिळणारा नफा आणि ध्येये या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ठराविक नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात पैसे देतात. 
  • यासाठी आपल्या उद्योगाची ध्येये आणि कल्पना यावर विश्वास असणारी माणसे आपल्या सोबत असायला हवी. 
  • जेव्हा इतर काही लोक आपल्या कल्पनांवर विश्वास ठेवतात, तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआपच वाढतो. क्राऊड फंडिंग द्वारे ठाम कल्पनेच्या जोरावरच निधी मिळवता येतो, म्हणून क्राऊड फंडिंगचा पर्याय लोकप्रिय आहे. 
  • आपल्या व्यवसायाची कल्पना व उद्दिष्टांवर विश्वास ठेवणारी व निधी पुरवण्याची तयारी असणारे आपले मित्र, कुटुंबीय आणि इतर उद्योजक यांना यामध्ये समाविष्ट करता येते. या पर्यायामध्ये एकापेक्षा जास्त गुंतवणूकदार गुंतलेले असतात. याची प्रकिया म्युच्युअल फंडासारखीच असते. 
  • क्राऊड फंडिंग द्वारे पहिल्याच टप्प्यात भांडवलाची सोय होऊ शकते व आपली कल्पना प्रत्यक्ष कृतीत येऊन व्यवसाय सुरू होतो. तसेच आपल्यासोबत असणाऱ्या लोकांमुळे आपल्याला आपल्या कामाचा योग्य अभिप्राय मिळण्यास मदत होते. प्राथमिक प्रकियेत योग्य अभिप्राय मिळणे आवश्यक आहे
  • ‘क्राऊड फंडिंग’ पर्यायाने भांडवल उभी केलेली काही उदाहरणे आहेत. इंडिगोगो,विशबेरी, केट्टो,फंडालाईन अशा काही लोकप्रिय भारतीय कंपन्यांनी क्राऊड फंडिंग चा आधार घेतला आहे. 

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

३. उद्यम भांडवलदार- 

  • उद्यम भांडवलदार किंवा गुंतवणूकदार, विशिष्ट उपलब्ध गुंतवणूकीसह ठाम आणि यशस्वी भूमिका असणा-या स्टार्टअप्सच्या शोधात असतात. 
  • उद्यम भांडवलदार भांडवलासोबतच योग्य देखरेख ठेवतात. तसेच, स्टार्टअप’ साठी लागणारी कौशल्ये विकसित करतात. 
  • साधारणपणे, कंपनी मोठ्याप्रमाणात वाढली की त्याचं शेअर बाजाराच्या यादीत समावेश होतो. कंपनीचे शेअर्स त्याच्या दर्शनी किंमतीत विकत घेण्यासाठी लोकांसाठी उपलब्ध केले जातात. म्हणजे, कंपनी स्वत:चा ‘आयपीओ’ जाहीर करते, मग भांडवलदार इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात व आयपीओ जाहीर झाला की कंपनीच्या प्रक्रियेतून बाहेर पडतात. 
  • प्राथमिक फंडिंगच्या पर्यायानंतर ज्याला आपण ‘सीड फंडिंग’ म्हणतो, उद्यम भांडवलदारांकडून आर्थिक मदत घेणे हा पर्याय उपलब्ध असतो. याची पहिली फेरी ‘ए’ फेरी म्हणून ओळखली जाते. 
  • वित्त पुरवठा करणारे उद्यम भांडवलदार कंपनीची सार्वजनिकपणे शेअर्स विकण्यासाठी सक्षम झाली की गुंतवणूकीवर मिळणारा परतावा घेऊन ते बाहेर पडतात, त्यांची एक्झिट होते. 
  • उबर, फ्लिपकार्ट, शाओमी, डिडी च्युक्सिंग अशा कंपन्यांनी भांडवलासाठी उद्यम भांडवलदारांची मदत घेतली आहे. तसेच  नेक्सस व्हेंचर पार्टनर्स, हेलियन व्हेंचर्स, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर्स, कॅनान , बेसेमर व्हेंचर्स ही भारतातील काही नामांकित व्हेंचर्स कॅपिटालिस्ट आहेत. 

उर्वरित ३ पर्यायांची माहिती आपण पुढच्या भागात घेऊया – भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Download Arthasakshar App – CLICK HERE

Web search: Startup funding Marathi Mahiti, Startup funding in Marathi, Startup funding Marathi, Startup funding kase milavayche?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.