term insurance
term insurance
Reading Time: 2 minutes

Term Insurance Coverage

भविष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी  आर्थिक कवच म्हणून मुदत विमा योजना असणे महत्वाचे आहे. त्यामुळेच मुदत विमा योजनेस ग्राहक पसंती देत आहेत. विमा कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम पॉलिसी धारकाच्या कुटुंबास मिळते. यामुळे पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर देखील कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होते. परंतु याच बरोबर  मिळणारे विमा संरक्षण पुरेसे  आहे का नाही हे पाहणे देखील आवश्यक आहे. जीवनातील विशिष्ट टप्प्यानंतर मुदत विमा पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. कारण जसे-जसे आपले वय वाढत जाते, आयुष्य पुढे जात राहते तसे अनेक बदल घडत जातात. नवीन जबाबदाऱ्या येत राहतात. लग्न,नोकरीत बदल किंवा पालक होणे.   या सर्व नवीन जबाबदाऱ्याबरोबर आर्थिक गरजा देखील वाढत जातात. जीवनशैलीत बदल होतो याचा परिणाम आर्थिक नियोजनावर देखील होत असतो. यामुळे आधी खरेदी केलेले विमा संरक्षण शक्यता पुरेसे नसते म्हणून अशा बदलांबरोबर मुदत विम्याचे पुनरावलोकन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण पॉलिसी धारकानंतर त्याच्या कुटंबास मिळणारे विमा संरक्षण पुरेसे असणे गरजेचे आहे. जीवनातील महत्त्वाच्या घटना ज्यानंतर मुदत विमा संरक्षणाचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे ठरते:

हेही वाचा – Health Insurance vs Mediclaim: आरोग्य विमा विरुद्ध मेडीक्लेम

 

१)लग्न झाल्यानंतर – लग्न झाल्यावर जीवनाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरवात होते. याचबरोबर जीवनशैली बदलते दैनंदिन खर्चात वाढ होते. यामुळे आर्थिक नियोजन बदलते. अनेक जबाबदाऱ्या देखील वाढतात. या सर्व गोष्टींबरोबरच जोडीदाराच्या आर्थिक सुरक्षिततेची जबाबदारी देखील महत्वाची असते. यामुळे पॉलिसीधारकाने जोडीदाराच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे. जर जोडीदार पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या पॉलिसीधारकावर अवलंबून असेल, तर अनपेक्षित दुर्दैवी घटना घडल्यास जोडीदारास भविष्यामध्ये आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे विमा संरक्षण असणे महत्त्वाचे असते. पॉलिसी धारकाने लग्नाआधी घेतलेले विमा संरक्षण पुरेसे नसू शकते. यामुळे जीवन कव्हरचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते.

२) पालक झाल्यानंतर – बाळाचा जन्म हा प्रत्येक आई – वडिलांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. परंतु याचबरोबर जबाबदारी देखील वाढते. खर्चामध्ये देखील वाढ होते. बाळाचे संगोपन, शिक्षण, उच्चशिक्षण या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पुरेसे मुदत विमा संरक्षण आहे का नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतरही मुलांचे संगोपन, दैनंदिन खर्च व उच्च शिक्षण या सर्व गोष्टींसाठी मुदत विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.

३)नोकरीमध्ये बदल – नोकरीमध्ये प्रमोशन मिळते. यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते, ही आनंदाची गोष्ट आहेच. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे याचा परिणाम जीवनशैलीवर नक्कीच होतो. राहणीमान बदलते, जीवनावश्यक खर्चामध्ये वाढ होते, आर्थिक गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. व याबरोबरच विमा संरक्षणाचे पुनरावलोकन करणे देखील आवश्यक आहे. कारण पॉलिसी धारकाच्या अनपेक्षित  दुर्देवी मृत्यूनंतर कुटुंबास त्यांच्या जीवनशैलीनुसार, राहणीमानानुसार पुरेसे आर्थिक सहाय्य असणे गरजेचे आहे. जेणेकरून पॉलिसी धारकाच्या मृत्युनंतर देखील कुटुंबास त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास अडचण भासत नाही.

हेही वाचा – Term Insurance : टर्म इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे?

 

४) नवीन कर्ज घेतल्यास – नवीन घर घेण्यासाठी किंवा नवीन गाडी घेण्यासाठी किंवा अनेक वैयक्तिक कारणांसाठी नव-नवीन कर्ज घेतले जाते व यामुळे आर्थिक दायित्व देखील वाढते. परंतु कर्जाची परतफेड करण्याआधीच पॉलिसीधारकाचा अनापेक्षित दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबास कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. यामुळेच कर्ज घेतल्यानंतर विमा कव्हरेजचे पुनरावलोकन करणे गरजेचे असते. जेणेकरून पॉलिसीधारका नंतर त्याच्या कुटुंबावर कर्जाचा भार पडत नाही.

५) वाढती महागाई –  मुदत विमा योजना खरेदी केल्यानंतर मुदत विमा योजनेचे मिळणारे विमा संरक्षण आत्ता जरी पुरेसे वाटत असेल तरी तसे नसून भविष्य ते पुरेसे आहे का नाही याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण दिवसेंदिवस वाढणारी महागाई बघता भविष्यात कुटुंबाला आर्थिक गरजा भागविण्यासाठी तसेच जीवनावश्‍यक खर्चासाठी तेवढे विमा संरक्षण पुरेसे असणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात वाढणाऱ्या महागाईचा विचार करून  थोड्या-थोड्या वर्षांनंतर टर्म इन्शुरन्सचे पुनरावलोकन करणे फायदेशीर ठरते.

हेही वाचा – Life Insurance FAQ: जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्न 

 यामुळे कुटुंबाच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी जीवनातील या बदलानंतर वेळोवेळी विमा संरक्षणाचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…